चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -15 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. 2018 ची विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीची विजेती कोण आहे ?
MPSC Current Affairs

A. अँजेलिक कर्बर
B. सेरेना विल्यम्स
C. व्हिनस विल्यम्स
D. येलेना ओस्तापेन्को


Click for answer

A. अँजेलिक कर्बर

कर्बरचे कारकिर्दीतील हे पहिलेच विम्बल्डन जेतेपद आहे.

स्टेफी ग्राफनंतर विम्बल्डन 'किताब पटकावणारी कर्बर ही पहिली जर्मन टेनिसपटू ठरली आहे.

2. बेबी पावडर वापरल्यानंतर कॅन्सर होत असल्याचा आरोप जगभरातील 9 हजार महिलांनी केल्यानंतर कोणत्या कंपनीला 4.69 अब्ज डॉलरची भरपाई द्यावी, असा आदेश अमेरिकेतील न्यायालयाने दिला आहे ?

A. चिक्कू
B. जॉन्सन अँड जॉन्सन
C. ओरीफ्लेम
D. हिमालय


Click for answer

B. जॉन्सन अँड जॉन्सन

अमेरिकेतील सेंट लुइस कोर्टाने हा निकाला दिला. तसेच कोर्टाने 9 हजार पैकी 22 महिलांचा दावा खरा असल्याचे मानत या महिलांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

याआधीही जॉन्सन अँड जॉन्सन उत्पादनाच्या गुणवत्तेला अनुसरून 4 खटल्यात जवळपास 20 अब्जचा दंड कंपनीला लागला आहे.

3. आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत ?

A. मुकेश अंबानी
B. जॅक मा
C. नवीन जिंदाल
D. नारायण मूर्ती


Click for answer

A. मुकेश अंबानी

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान मिळवलाय. त्यांनी अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांना अंबानी यांनी मागे टाकलंय.

4. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने नुकत्याच एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 10,000 धावा पूर्ण केल्या, असा करणारा तो चौथाच भारतीय फलंदाज ठरला ?

A. महेंद्रसिंग धोनी
B. विराट कोहली
C. सुरेश रैना
D. शिखर धवन


Click for answer

A. महेंद्रसिंग धोनी

भारतीय खेळाडूंपैकी वनडे सामन्यात 10 हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर(18426), सौरव गांगुली(11363) आणि राहुल द्रविड(10889) या दिग्गजांचा समावेश आहे.

या 10 हजार धावांबरोबर वनडेत अशी कामगिरी करणारा धोनी जगातील 12 वा खेळाडू ठरला आहे.

5. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने क्रिकेट तसेच राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे ?

A. इशांत शर्मा
B. रोहित शर्मा
C. अजिंक्य रहाणे
D. मोहम्मद कैफ


Click for answer

D. मोहम्मद कैफ

6. राष्ट्रपतींकडून खालीलपैकी कोणाची अलिकडेच राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली ?

A. कपिलदेव, अनुपम खेर, अक्षयकुमार , रजत शर्मा
B. रेखा, सचिन तेंडुलकर, अनु आगा, के. परासन
C. राकेश सिन्हा, राम शकल, रघुनाथ मोहपात्रा, सोनल मानसिंग
D. पंकज अडवाणी, शारदा सिन्हा, अरविंद पारीख, लक्ष्मण पै


Click for answer

C. राकेश सिन्हा, राम शकल, रघुनाथ मोहपात्रा, सोनल मानसिंग

राज्यसभेवरील अभिनेत्री रेखा, 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर, अनु आगा, के. परासन यांच्या कार्यकाळ संपल्याने रिकाम्या झालेल्या जागांवर स्तंभलेखक राकेश सिन्हा (बिहार), शेतकरी नेते राम शकल (उत्तर प्रदेश), शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा (ओडिशा), शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग (महाराष्ट्र) या चौघांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे.

राष्ट्रपती 12 सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात. त्यात 12 पैकी चार जागा जागा रिकाम्या झाल्या होत्या त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज निवड केली आहे.

7. फिफा विश्वचषकात तिसरे स्थान कोणत्या संघाने पटकाविले ?

A. फ्रान्स
B. क्रोएशिया
C. बेल्जियम
D. इंग्लंड


Click for answer

C. बेल्जियम

8. भारत एस-400 क्षेपणास्त्र कोणत्या देशाकडून विकत घेणार आहे ?

A. रशिया
B. अमेरिका
C. इस्त्राईल
D. चीन


Click for answer

A. रशिया

9. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली ?

A. नोजोमी ओकुहारा
B. पी व्ही सिंधू
C. सायना नेहवाल
D. आश्विनी पोन्नपा


Click for answer

A. नोजोमी ओकुहारा

थायलंड ओपन जिंकून सायना नेहवालच्या 2012 च्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे पी व्ही सिंधूचे स्वप्न रविवारी भंगले. जपानच्या नोजोमी ओकुहाराने थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत सिंधूला 21-15, 21-18 असे पराभूत केले.

10. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत अमेरिकेचे स्थान कोणी घेतले आहे ?

A. भारत
B. इस्त्राईल
C. कॅनडा
D. आइसलँड


Click for answer

D. आइसलँड

मानवाधिकार परिषदेत शुक्रवारी आइसलँडची पहिल्यांदाच निवड झाली. अमेरिकेने मागील महिन्यात इस्रायलसोबत पक्षपात होत असल्याचा आरोप करत मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

47 सदस्यीय परिषदेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. आइसलँडचा कार्यकाळ त्वरित लागू झाला असून तो 31 डिसेंबर 2019 पर्यंत चालणार आहे.
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून जगातील पहिले मोफत टायफॉइड लसीकरण अभियान कोणती महापालिका राबविणार आहे ?
MPSC Online Current Affairs

A. नवी मुंबई महानगरपालिका
B. पुणे महानगरपालिका
C. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
D. नागपूर महानगरपालिका


Click for answer

A. नवी मुंबई महानगरपालिका

दोन टप्प्यात शहरातील 9 ते 15 वर्षे वयोगटातील तब्बल चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. 14 जुलैपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून महानगरपालिकेने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाला केंद्र व राज्य सरकारने तांत्रिक मान्यता दिली आहे.

2018 व 2019 मध्ये दोन टप्प्यात 22 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

दोन वर्षांत चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी उत्पादक कंपनीकडून पहिला डोस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, उर्वरित 3 लाख डोसेस प्रति डोस 200 रुपये दराने मनपा विकत घेणार आहे. या अभियानासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

2. मुंबईच्या रणजी क्रिकेट टीमचे प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

A. समीर दिघे
B. विनायक सामंत
C. उन्मेश खानविलकर
D. रमेश पोवार


Click for answer

B. विनायक सामंत

विनायक सामंत हे मुंबईचे माजी यष्टीरक्षक होते.

3. यापुढे बलात्कार आणि छेडछाड प्रकरणातील आरोपींना न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सरकारी योजनांचा लाभ रद्द करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ?

A. महाराष्ट्र
B. पंजाब
C. हरियाणा
D. उत्तराखंड


Click for answer

C. हरियाणा

अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कायदे करणाऱ्या हरयाणा सरकारनं आता आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील दोषींना वृद्धापकाळात मिळणारं निवृत्ती वेतन, दिव्यांग म्हणून केलं जाणारं अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. याशिवाय आरोपीचा वाहन आणि शस्त्र परवानासुद्धा रद्द केला जाईल.

मात्र संबंधित आरोपीची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यास त्याला पुन्हा सर्व योजनांचा लाभ दिला जाईल.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

4. पहिले राज्यस्तरीय 'एलजीबीटीआय' साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

A. मुंबई
B. औरंगाबाद
C. पुणे
D. नागपूर


Click for answer

C. पुणे

लेस्बियन-गे (समलिंगी), तृतीयपंथी, बायसेक्शुअल (उभयलिंगी), इंटरसेक्स या घटकांना त्यांचे विचार, वेदना, आशा-आकांक्षा आणि जगणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ म्हणून हे साहित्य संमेलन उपयुक्त ठरेल.

5. फोर्ब्सच्या सेल्फ मेड वूमनच्या यादीत अमेरिकेत स्वत: च्या कर्तृत्वावर ठसा उमटवणार्‍या 60 श्रीमंत महिलांचा समावेश आहे. ह्या यादीत कोणत्या दोन भारतीय वंशांच्या महिलांचा समावेश आहे ?

A. अनु नटराजन आणि सुनेत्रा गुप्ता
B. डॉ. उमा राजन आणि निता सेन गुप्ता
C. शिवानी पंड्या आणि तुलसी गबार्ड
D. जयश्री उल्लाल आणि निरजा सेठी


Click for answer

D. जयश्री उल्लाल आणि निरजा सेठी

या यादीत जयश्री उल्लाल या 18व्या स्थानावर आहेत. तर निरजा सेठी या 21 व्या क्रमांकावर आहेत.

जयश्री उल्लाल (वय 57) यांचा जन्म लंडन येथे झाला, पण त्यांचे पालन-पोषण भारतात झाले आहे. अरिस्टा नेटवर्क या कॉम्प्युटर नेटवर्किंग फर्ममध्ये त्या 2008पासून कार्यरत आहेत. जयश्री यांची एकूण संपत्ती 8800 कोटी रुपये (1.3 अरब डॉलर) आहे.

निरजा सेठी (वय 63) सिन्टेल या कंपनीत कार्यरत आहेत. ही कंपनी आऊटसोर्सिंग आणि आयटी विषयक कन्सल्टिंगचे व्यवहार करते. या कंपनीची स्थापना निरजा आणि त्यांचे पती भरत देसाई यांनी 1980मध्ये केली होती. निरजा यांची संपत्ती एकूण 6800 कोटी रुपये (1 अब्ज डॉलर) आहे.

6. कोणत्या मादाम तुसां म्युझियममध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा उभारण्यात येत आहे ?

A. सिंगापूर
B. दिल्ली
C. लंडन
D. पॅरीस


Click for answer

A. सिंगापूर

7. कोणत्या देशाने डिसेंबर महिन्यामध्ये चांद्रमोहीम सुरु करत असल्याची घोषणा केली आहे ?

A. इस्रायल
B. कॅनडा
C. जर्मनी
D. पाकिस्तान


Click for answer

A. इस्रायल

या मोहिमेत इस्रायल एक मानवरहित यान चंद्रावर पाठवणार असून त्याचे वजन 585 किलो असेल. हे यान 13 फेब्रुवारी 2019 रोजी चंद्रावर पोहोचेल असे इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. अमेरिकन अंतराळ उद्योजक एलन मस्कच्या स्पेसेक्स मार्फत हे पाठवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मदतीने हे यान अंतराळात पाठवले जाईल. चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यासही या मोहीमेत केला जाणार आहे.

इस्रायलमधील स्पेसआयएल या संस्थेने इस्रायली सरकारच्या ताब्यातील एरोस्पेस इंडस्ट्रीज या संस्थेबरोबर एकत्र काम करत चांद्रमोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

8. कोणता दिन हा मलाला दिन म्हणून साजरा केला गेला ?

A. 2 जुलै
B. 6 जुलै
C. 8 जुलै
D. 12 जुलै


Click for answer

D. 12 जुलै

नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसूफझाई हिने महिलांच्या शिक्षणासाठी स्वात खोऱ्यामध्ये जागृती मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी तिला 2012 साली डोक्यात गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली.

जगभरातील मुलींना शिक्षणाची संधी मिळायला हवी, असे आवाहन तिने आपल्या 16 व्या वाढदिवशी म्हणजे 12 जुलै 2013 रोजी केले होते. त्यामुळे 12 जुलै हा मलाला दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले होते.

9. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्याच्या किंवा त्यांच्या शिक्षणात अडथळे आणण्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ______________चा फटका बसत असल्याचे जागतिक बँकेने मलाला दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

A. 15 ते 30 ट्रिलियनअमेरिकन डॉलर्स
B. 1.5 ते 3.0 ट्रिलियनअमेरिकन डॉलर्स
C. 15 ते 30 मिलियन अमेरिकन डॉलर्स
D. 1.5 ते 3.0 मिलियन अमेरिकन डॉलर्स


Click for answer

A. 15 ते 30 ट्रिलियनअमेरिकन डॉलर्स

जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तिना जॉर्जिएव्हा

10. मलाला युसूफझाई हिच्या आयुष्यावर आधारित कोणता चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे ?

A. आय मलाला
B. माय स्टोरी
C. गुल मकई
D. मलाला - अ जर्नी


Click for answer

C. गुल मकई

नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -13 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक पटकाविले ?
current affairs app

A. नीरज चोप्रा
B. सीमा अन्टील
C. नवजीत कौर धिल्लन
D. हिमा दास


Click for answer

D. हिमा दास

अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला .जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. फिनलंडमधील टाम्पेरे येथे झालेल्या IAAF वर्ल्ड अंडर अॅथएलेटीक्स स्पर्धेत तिने हा इतिहास रचला.

आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर 20 मध्ये सहाव्या स्थानावर राहिली होती.

2. रामाशी निगडित असणाऱ्या धार्मिक स्थळांना भेटी देणे सोपे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने 'रामायण एक्स्प्रेस' या नावाने नवी रेल्वे सुरु केली आहे. 14 नोव्हेंबर रोजी ही रेल्वे कोठून रवाना होणार आहे ?

A. दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकावरुन
B. उत्तरप्रदेशातील अयोध्या रेल्वे स्थानकावरून
C. तामिळनाडूतील कन्याकुमारी रेल्वे स्थानकावरून
D. महाराष्ट्रातील नाशिक रेल्वे स्थानकावरून


Click for answer

A. दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकावरुन

सुरुवातीला आयोध्या, हनुमान गढी, रामकोट आणि कनक भवन मंदिर या ठिकाणी रेल्वे जाईल. त्यानंतर रेल्वे नंदिग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग श्रृंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वर याठिकाणी जाईल. त्यानंतर ज्यांना श्रीलंकेतील रामाची स्थळे पाहायची आहेत त्यांना विमानाने त्याठिकाणी नेण्यात येईल.

3. 'सूरमा' हा चित्रपट कोणत्या खेळाडूच्या आयुष्यावर बेतलेला आहे ?

A. गौतम गंभीर
B. संदीप सिंह
C. प्रकाश पदुकोण
D. विश्वनाथन आनंद


Click for answer

B. संदीप सिंह

भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात दिलजीत दोसांज, तापसी पन्नू, अंगद बेदी मुख्य भूमिकेत आहेत.

4. प्रसिद्ध पत्रकार मोहनदीप यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर _______________________ नावाचे पुस्तक लिहीले आहे ?

A. EUREKHA
B. I REKHA
C. REKHA - AN ERA
D. REKHA - THE LIVING LEGEND


Click for answer

A. EUREKHA

5. क्रोएशियाच्या अध्यक्षा कोण आहेत ?

A. डोरिस लिउथार्ड
B. कोलिंडा ग्रेबर कितारोविक
C. लॉरा चिनचिया मिरांदा
D. अमीना गुरीब-फकीम


Click for answer

B. कोलिंडा ग्रेबर कितारोविक

50 वर्षीय कोलिंडा क्रोएशियाच्या चौथ्या राष्ट्राध्यक्षा आहेत. जानेवारी 2015 मध्ये त्या क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या. नाटोमध्ये त्यांनी असिस्टेंट सेक्रेटरी जनरलचं पद देखील सांभाळलं आहे.

कोलिंडा यांना क्रोएशियन शिवाय इंग्लिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेचं देखील ज्ञान आहे. याशिवाय त्या फ्रेंच, जर्मन आणि इटली भाषा देखील बोलतात.

6. योग्य व्हीसा नसल्याचे कारण देत भारताने ब्रिटीश खासदार लॉर्ड अलेक्झांडर कॅरलिल यांना दिल्ली विमानतळावरून परत पाठविले. ते कोणाचे वकील म्हणून काम पाहत आहेत ?

A. तस्लिमा नसरीन
B. खालिदा झिया
C. नवाझ शरीफ
D. परवेझ मुशर्रफ


Click for answer

B. खालिदा झिया

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बीएनपी पक्षाच्या अध्यक्षा खालिदा झिया सध्या तुरुंगात आहेत. लॉर्ड कॅरलिल त्यांचा खटला चालवत असून त्या खटल्याबाबत पत्रकार परिषद घेण्यासाठी ते भारतात आले होते. मात्र त्यांच्याकडे योग्य व्हीसा नसल्याचे सांगत विमानतळावरूनच माघारी जाण्यास सांगण्यात आले.

7. अमेरिकेतील मिशिगन राज्याने गुरुदेव श्री श्री रवि शंकर ह्यांच्या प्रति विशेष आदर व्यक्त करीत, त्यांच्या नावे _________हा दिवस दरवर्षी 'श्री श्री रवि शंकर दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

A. 2 जुलै
B. 7 जुलै
C. 10 जुलै
D. 12 जुलै


Click for answer

B. 7 जुलै

लक्षावधी लोकांना योग आणि ध्यानाद्वारे जीवनात आनंद फुलविण्याच्या कार्याप्रति आदर व्यक्त करीत डेट्रॉईटच्या महापौरांनी ही घोषणा केली. अमेरिका आणि कॅनडाच्या पंचवीसहून अधिक शहरे यामध्ये सहभागी झाली आहेत. श्री श्री रविशंकर यांच्या सन्मानाप्रति त्यांना तीन देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेला आहे.

8. चीनने एक संतती धोरण कोणत्या वर्षी स्वीकारले होते ?

A. 1965 साली
B. 1971 साली
C. 1979 साली
D. 2016 साली


Click for answer

C. 1979 साली

त्यामुळे देशात युवकांची संख्या कमी होऊन वृद्ध लोकांची संख्या वाढत होती. हे धोरण 2016 रद्द केले होते, मात्र पती - पत्नीला केवळ दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली.चीन सरकारने स्वीकारलेल्या संतती नियोजनाच्या धोरणामुळे 2050 पर्यंत देशाची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या केवळ 65 टक्के एवढी असेल, असा इशारा देताना चीनमधील युनिव्हर्सिटी ऑफ व्हिस्कॉन्सिन - मॅडिसन येथील संशोधक यी फुजियान यांनी हे वादग्रस्त धोरण रद्द करण्याचे आवाहन केले आहे.

9. श्रीनिवास शिंदगी यांचे 12 जुलै रोजी निधन झाले. ते ___________________चे जनक म्हणून ओळखले जातात.

A. संगीत रंगभूमी
B. प्रायोगिक रंगभूमी
C. बाल रंगभूमी
D. व्यावसायिक रंगभूमी


Click for answer

C. बाल रंगभूमी शिंदगी

याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी 'बालरंगभूमीचे जनक ' अशी उपाधी दिली होती. अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी शिंदगी यांच्या अनेक बालनाट्याचे प्रयोग सादर करण्यात आले आहेत. श्रीनिवास शिंदगी यांनी आजवर 20 नाटके लिहिली त्यापैकी 15 बालनाट्ये आहेत. त्यांचे पुंगीवाला हे नाटक अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केले. शिंदगी यांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक बालनाट्ये गाजली. शिंदगी यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत 'भूमिपुत्रांचे वनपूजन' हे संगीतमय बालनाट्य लिहिले. या बाल नाट्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.

10. जगातील सर्वात कमी वयाचा स्वकमाई तून झालेला/ली अब्जाधीश कोण आहे ?

A. मार्क झुकरबर्ग
B. केली जेनर
C. अलेक्झांडर आंद्रेसन
D. जॉन कॉलीसन


Click for answer

B. केली जेनर

फेसबुकचा निर्माता आणि सीईओ मार्क झुकरबर्ग हा 23 व्या वर्षी अब्जाधीश झाला होता. पण वयाच्या विसाव्या वर्षी केली जेनर हिने अब्जाधीश होण्याचा मान पटकावलाय.

केलीची सध्याची संपत्ती ही 61 अब्ज 74 कोटींच्या घरात असल्याचे ‘फोर्ब्स’ मासिकानं म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी केलीने सुरू केलेल्या ‘केली कॉस्मेटिक्स’या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनी च्या यशाने हे साध्य झाले आहे.

केली ही मॉडेल, अभिनेत्री किम कार्दाशिअन हिची सावत्र बहीण आहे.

आतापर्यंत मार्क हा सर्वात कमी वयात अब्जाधीश झाला होता.
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -12 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. "An Uncertain Glory: India and its Contradictions"(भारत आणि त्याचे विरोधाभास ) ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
MPSC Result

A. अमर्त्य सेन आणि जीन ड्रेझ
B. संजीव वर्मा
C. सत्या नादेला
D. यशवंत सिन्हा आणि विनय श्रीवास्तव


Click for answer

A. अमर्त्य सेन आणि जीन ड्रेझ

अमर्त्य सेन यांच्या 'भारत और उसके विरोधाभास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पडला. यावेळी बऱ्याच गोष्टी चुकीच्या वळणावर गेल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारच्या काळात शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेशी तजवीज झाली होती, असे नव्हे. मात्र, 2014 पासून ही दोन क्षेत्रे कमालीच्या वेगाने चुकीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सेन यांनी सांगितले.

2. तब्बल 66 वर्षानंतर नखे कापण्यामुळे चर्चेत आलेले गृहस्थ कोण ?

A. श्रीधर चिल्लाल
B. श्रीधर देशपांडे
C. श्रीधर जोग
D. श्रीधर कुलकर्णी


Click for answer

A. श्रीधर चिल्लाल

श्रीधर चिल्लाल असे या गृहस्थांचे नाव असून त्यांचे वय आता 82 वर्षे आहेत. त्यांनी शेवटची नखे कापली 1952 साली. नखे कापण्याचा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये होणार आहे. त्यांच्या नखांमुळे त्यांची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे.

श्रीधर चिल्लाल हे मूळचे पुण्याचे आहेत. ही नखे कापल्यानंतर रिप्लेज संग्रहालयातच ठेवण्यात येणार आहेत.

3. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2017 मध्ये जगात कितव्या स्थानी होती ?

A. दुसऱ्या
B. पाचव्या
C. सहाव्या
D. सातव्या


Click for answer

C. सहाव्या

अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटन पहिल्या पाच स्थानावर आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकत सहावे स्थान पटकाविले. सन 2018-19 वर्षासाठी भारताचा जीडीपी 7.3% राहील, असा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज नोंदवला गेला आहे.

फ्रान्सला मागे टाकत भारताने जगातली सगळ्यात मोठी सहावी अर्थव्यवस्था असं स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षीसाठी म्हणजे 2017 साठीचे अद्ययावत आकडे जागतिक बँकेने जाहीर केले असून यानुसार फ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असून भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी रुपये आहे.

4. राज्यसभेतील खासदारांना येत्या पावसाळी अधिवेशनापासून किती भाषांचा वापर करता येईल ?

A. 18
B. 20
C. 22
D. 8


Click for answer

C. 22

डोगरी, काश्मीरी, कोकणी, संथाळी आणि सिंधी या पाच भाषांच्या अनुवादाची सोय केली असल्याने आता या भाषा बोलणाऱ्या खासदारांना आपल्या मातृभाषेत सभागृहात बोलता येईल. आता राज्यघटनेच्या 8 व्या सूचीत नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये खासदार बोलू शकतील.

सूचिमध्ये समाविष्ट असणाऱ्या 22 भाषांपैकी 12 भाषांमध्ये तात्काळ अनुवादाची सोय आहे. यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषांचा समावेश आहे.

5. पद्मनाभस्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे ?

A. केरळ
B. तामिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. तेलंगणा


Click for answer

A. केरळ

तिरूवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिना एका हायटेक संग्रहालयात मांडण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. मात्र केरळचे माजी राजे असलेल्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.

6. जगभरात गाजलेल्या केंब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणात कोणत्या कंपनीला ब्रिटनच्या सूचना रेग्युलेटरीकडून तब्बल $664,000 म्हणजे जवळपास 4.56 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे ?

A. गुगल
B. मायक्रोसॉफ्ट
C. वोडाफोन
D. फेसबुक


Click for answer

D. फेसबुक

जवळपास 5 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती.

7. 2018 चा फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या संघांत होणार आहे ?

A. फ्रान्स आणि इंग्लंड
B. क्रोएशिया आणि इंग्लंड
C. फ्रान्स आणि क्रोएशिया
D. इंग्लंड आणि क्रोएशिया


Click for answer

C. फ्रान्स आणि क्रोएशिया

क्रोएशिया या लहान देशाने सर्वाना चकित केले आहे. क्रोएशिया- लोकसंख्या 4,154,200 क्षेत्रफळ - 56,594 चौ.किमी(तुलनात्मक विचार - महाराष्ट्र - लोकसंख्या 112,372,972 क्षेत्रफळ 307,713 चौ.किमी)

8. 'क्राय' या सामाजिक संस्थेने भारतातील 15 ते 18 वयोगटातील मुलांबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार या वयोगटात देशात किती बालकामगार आहेत ?

A. 2.3 कोटी
B. 3.2 कोटी
C. 4.5 कोटी
D. 1.2 कोटी


Click for answer

A. 2.3 कोटी

2015-16 च्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो आणि 2016 चा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवातील आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

देशातील 23 दशलक्ष बालकामगारांपैकी 19 दशलक्ष जणांवर केवळ शिक्षण आणि नोकरी या दोन्हीचा ताळमेळ साधता न आल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये लहान मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले असून अपहरण झालेल्या मुलींमधील 60 टक्के मुली 15 ते 18 वयोगटातील आहेत. तर 25 टक्के बलात्काराच्या घटनांमधील पीडित या वयोगटातील आहेत.

9. स्त्री आणि पुरुष यांच्यात बाहेरख्याली पणात भेदाभेद करणाऱ्या कोणत्या कलमाविषयी निवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा खटला घटनापिठाकडे वर्ग केला आहे ?

A. इंडियन पीनल कोड मधील कलम 497
B. भारतीय राज्यघटनेतील कलम 497
C. क्रिमिनल प्रोसिजर कोड मधील कलम 497
D. सिविल प्रोसिजर कोड मधील कलम 497


Click for answer

A. इंडियन पीनल कोड (भारतीय दंड संहिता) मधील कलम 497

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात या याचिकेला विरोध केला असून ती फेटाळून लावण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे. IPC मधील 497 कलमामुळे देशातील लग्नसंस्था टिकून आहेत, हे कलम नसेल तर लग्नसंस्था कमकुवत होतील, असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे.

विवाहबाह्य संबंधांत दोषी आढळल्यास पुरुषांना शिक्षा देण्यात येते तर महिलांना मात्र शिक्षा होत नाही. म्हणून हा कायदा भेदभाव करणारा आहे. आणि या कायद्याला असंविधानिक असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांने याचिकेत केली आहे.

10. पाकिस्तानसाठी दोन उपग्रहांचे प्रक्षेपण कोणत्या देशातून केले गेले ?

A. चीन
B. इराण
C. रशिया
D. भारत


Click for answer

A. चीन
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -11 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. श्रीलंकेत जन्मलेले कॅनेडियन कवी आणि कादंबरीकार मायकल ओंडाटेस यांच्या _________या कादंबरीला गोल्डन बुकरने सन्मानित करण्यात आले.
MPSC Current Affairs

A. द इंग्लिश पेशंट
B. लिंकन इन द बार्डो
C. वुल्फ हॉल
D. इन ए फ्री स्टेट


Click for answer

A. द इंग्लिश पेशंट

जागतिक प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांमध्ये सामील मॅन बुकर पुरस्काराच्या 50 व्या वर्धापनदिनी 'द इंग्लिश पेशंट'ला गोल्डन बुकरने सन्मानित करण्यात आले. या कादंबरीला 1992 मध्ये बैर अन्सवर्थच्या 'सेपेड हंगर'सोबत बुकर पुरस्कार मिळाला होता. दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यावर एका विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या युवकावर कादंबरीची कथा आधारित आहे.

परीक्षकांनी प्रत्येक दशकातील सर्वश्रेष्ठ बुकर विजेता निवडला आहे. यात 'इन ए फ्री स्टेट', 'मून टायगर', 'द इंग्लिश पेशंट', 'वुल्फ हॉल' आणि 'लिंकन इन द बार्डो' यांचा समावेश होता.

यानंतर वाचकांनी मत मांडून 'द इंग्लिश पेशंट'ची गोल्डन बुकर विजेता म्हणून निवड केली आहे.

1996 मध्ये या कादंबरीवर बेतलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासमवेत 9 ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.

2. भारताने इंग्लंडविरूद्धच्या टी-20 मालिकेत तिस-या आणि निर्णायक सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या शेवटच्या सामन्याचा शतकवीर रोहित शर्मा या विजयाचा शिल्पकार ठरला.रोहितने हे शतक जगातील अखेरच्या पांढ-या गेंड्याला समर्पित केले. ह्या गेंड्याचे नाव काय होते ?

A. जिमी
B. दुरीआ
C. सुदान
D. पंपान


Click for answer

C. सुदान

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात प्रत्येकी तीन शतक करणारा रोहित हा पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने हे शतक जगातील अखेरच्या पांढ-या गेंड्याला समर्पित करून जगाला मोलाचा सल्ला दिला. सुदान असे या गेंड्याचे नाव असून मार्च 2018 मध्ये त्याचा मृत्यु झाला होता.

3. ब्रिटनने नवे परराष्ट्रमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

A. डॉमिनिक राब
B. जेरेमी हंट
C. बोरिस जॉन्सन
D. डेव्हिड डेव्हिस


Click for answer

B. जेरेमी हंट

पंतप्रधान मे यांनी विद्यमान आरोग्यमंत्री जेरेमी हंट यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

ब्रिटनचे मावळते परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ब्रिटनचे ब्रेक्‍झिट विभागाचे मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी पद सोडल्यानंतर जॉन्सन यांनीही राजीनामा सादर करत खळबळ उडवून दिली होती.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे

4. थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी एक छोटी पाणबुडी बनविल्याने स्पेसएक्‍स ही कंपनी चर्चेत आली होती. ह्या कंपनी कोणाच्या मालकीची आहे ?

A. लॅरी एलिसन
B. एलॉन मस्क
C. डेव्हिड कोच
D. जेफ बेसोज


Click for answer

B. एलॉन मस्क

दरम्यान गेले 2 आठवडे थायलंडच्या गुहेत अडकून पडलेल्या 12 मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. थायलंडमधील बचाव अभियानात जगभरातील तज्ञांनी सक्रीय सहभाग घेतला.

याच अभियानात महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीचे पंप आणि पथक यांनी सक्रीय सहभाग घेतला.

5. जागतिक बॅंक आणि औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने जारी केलेल्या अभ्यास अहवालानुसार इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये (उद्योगस्नेही वातावरण) महाराष्ट्राचे देशातील स्थान कितवे आहे ?

A. पहिले
B. पाचवे
C. तेरावे
D. विसावे


Click for answer

C. तेरावे

आंध्र प्रदेश दुसऱ्यांदा प्रथम स्थानी आले आहे. आंध्र प्रदेश शेजारील तेलंगणा दुसऱ्या स्थानी आहे. तर हरयाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांचा क्रम लागतो.

जागतिक बँकेने काढलेल्या इज ऑफ डुइंग बिझनेसच्या यादीतही भारताची स्थिती सुधारली आहे. 190 देशांमध्ये भारत 100 व्या स्थानी आहे.

6. ऑपरेशन 'मुस्कान' आणि 'स्माईल' कशाशी संबंधित आहेत ?

A. वृद्धाश्रमातील आणि अनाथाश्रमातील व्यक्तींच्या कल्याणासाठी
B. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना मदत करण्यासाठी
C. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी
D. हरवलेल्या मंगळसूत्र आणि सोनसाखळीचा शोध घेण्यासाठी


Click for answer

C. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी

7. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोन्लाडोने कोणत्या फुटबॉल क्लब कडून यापुढे खेळणार आहे ?

A. मॅनचेस्टर युनाइटेड
B. रियाल माद्रिद
C. युव्हेंट्स
D. चेल्सा


Click for answer

C. युव्हेंट्स

रोनाल्डोने रियाल माद्रिद क्लबला सोडचिठ्ठी असून इटालियन क्लब युव्हेंट्सची 88 मिलियन पौंडची म्हणजेच भारतीय रकमेत 800 कोटी रूपयांची ऑफर स्वीकारली.

2009 साली रियाल मॅद्रिदने रोनाल्डोला विश्वविक्रमी 728 कोटी रुपयात मॅनचेस्टर युनाइटेडकडून आपल्याकडे खेचले होते.

त्याला आता चार वर्षांसाठी युव्हेंट्सकडून 4.55 लाख रूपये प्रती आठवड्याला मिळणार आहेत.

रोनाल्डोने नऊ वर्षांत माद्रिदसोबत चॅम्पियन्स लीगची चार जेतेपद नावावर केली आहेत. यापलिकडे त्याने या नऊ वर्षांत अनेक विक्रम नोंदवले आहेत.

8. नोएडा येथे कोणत्या कंपनीच्या मालकीच्या जगातल्या सर्वात मोठ्या मोबाईल फोन निर्मिती कारख्यानाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले ?

A. अॅपल
B. सॅमसंग
C. ओप्पो
D. झिओमी


Click for answer

B. सॅमसंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे -इन यांनी नोएडामध्ये सोमवारी सॅमसंग कंपनीच्या नव्या मोबाईल निर्मितीच्या कारखान्याचे उद्‍घाटन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नोएडामधील सेक्टर ८१ मध्ये हा कारखाना असून मोबाईल निर्मितीचा जगातला सर्वात मोठा कारखाना आहे.

9. 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. ह्या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना (Theme) काय आहे ?

A. कुटुंब नियोजन हा एक मानवी हक्क आहे.
B. छोटे कुटुंब सुखी कुटुंब
C. हम दो हमारे दो
D. कुटुंब नियोजन - विकासाची गुरुकिल्ली


Click for answer

A. कुटुंब नियोजन हा एक मानवी हक्क आहे. (Family Planning is a Human Right)

10. समलैंगिकता हा गुन्हा मानणाऱ्या ___________________च्या 377 कलमास घटनाबाह्य ठरविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ह्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे.

A. भारतीय राज्यघटना
B. इंडियन पीनल कोड
C. सिविल प्रोसिजर कोड
D. क्रिमिनल प्रोसिजर कोड


Click for answer

B. इंडियन पीनल कोड (IPC)
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -10 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. केंद्र सरकारने किती उच्च शैक्षणिक संस्थांना 'इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स' ( 'प्रतिष्ठित संस्थां') चा दर्जा दिला आहे ?
MPSC current affairs

A. सहा
B. आठ
C. दहा
D. पंधरा


Click for answer

A. सहा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तीन सार्वजनिक आणि तीन खासगी उच्चशिक्षण संस्थांची ‘श्रेष्ठत्व’ दर्जासाठी निवड केली आहे. या 'श्रेष्ठत्व' दर्जा मिळालेल्या संस्थांना पुढील पाच वर्षांत 1 हजार कोटींचा विशेष निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

केंद्र सरकारने ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’साठी शिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली आणि बंगळूरुतील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ या सरकारी संस्था असून ‘जिओ’सह मणिपाल अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन आणि पिलानी येथील बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स या खासगी संस्था आहेत.

या सहाही शिक्षण संस्था देशातील अन्य शिक्षण संस्थांपेक्षा शैक्षणिक दर्जाच्या दृष्टीने श्रेष्ठ मानल्या गेल्या.

यात रिलायन्स फाऊंडेशनच्या अजून अस्तित्वात न आलेल्या ‘जिओ इन्स्टिटय़ूट’चाही समावेश आहे.

2. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (NCLT)टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देत खालीलपैकी कोणाची याचिका फेटाळून लावली आहे ?

A. पलोनजी मिस्त्री
B. सायरस मिस्त्री
C. नोएल मिस्त्री
D. जिग्नेश मिस्त्री


Click for answer

A. सायरस मिस्त्री

टाटा समूहाच्या चेअरमन पदावरुन मिस्त्री यांना हटविण्यात आले होते. त्याविरोधात मिस्त्री यांनी एनसीएलटीकडे अपील केले होते. त्यावर सुनावणी करताना, एनसीएलटीने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देत मिस्त्री यांना धक्का दिला. तसेच पदावरुन हटविण्याचे अधिकार बोर्डाला असल्याचे आपल्या आदेशात म्हटले.

3. युएस न्यूज अँड वर्ल्डने नुकतीच जगातील सर्वात शक्तिशाली 25 देशांची यादी जाहीर केली आहे . या यादीत भारताचे स्थान कितवे आहे ?

A. चौथे
B. आठवे
C. पंधरावे
D. बाविसावे


Click for answer

C. पंधरावे

संबंधित देशाची अर्थव्यवस्था, दुसऱ्या देशावर या देशाचा पडणारा प्रभाव, लष्कर आणि नेतृत्वाच्या आधारावर हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकासह सर्वात शक्तिशाली देश ठरला आहे. दुसऱ्या स्थानावर रशिया तर तिसऱ्यावर चीन आहे.

भारत पंधराव्या स्थानी आहे. इराण तेराव्या तर पाकिस्तान बाविसाव्या आणि सिंगापूर चोविसाव्या स्थानी आहे.

4. कोणत्या देशाचे अध्यक्ष असलेले मून जेई-इन सध्या भारत दौऱ्यावर आहेत ?

A. दक्षिण कोरिया
B. जपान
C. व्हिएतनाम
D. सिंगापूर


Click for answer

A. दक्षिण कोरिया

अध्यक्ष म्हणून मून यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

5. भारतात आल्यानंतर मून-जे-इन यांची पत्नी किम जोंग सुक यांनी अभिनेता आमिर खानचा 'दंगल' चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट ज्याच्या आयुष्यावर बेतलेला आहे त्या ___________ कुटुंबीयांना त्यांनी चहाचे आमंत्रण दिले आहे.

A. कोम
B. यादव
C. तोमर
D. फोगट


Click for answer

D. फोगट

हा चित्रपट गीता आणि बबीता फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे.

6. कोणत्या देशात सातत्याने कोसळणारा मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे ?

A. जपान
B. कॅनडा
C. इंडोनेशिया
D. सिरीया


Click for answer

A. जपान

दरम्यान याच कालावधीत कॅनडाला उष्ण लहरींपासून त्रास होत आहे .

7. सांसद, मंत्री आणि राज्यपाल म्हणून उल्लेखनीय योगदान दिलेले एम.एम. जाकोब यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते ?

A. मेघालय
B. ओडिशा
C. पंजाब
D. गुजरात


Click for answer

A. मेघालय

8. _________________ येथे 9 ते 13 जुलै दरम्यान होणाऱ्या 17 व्या जागतिक संस्कृत परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले.

A. कंबोडियातील नामपेन्ह
B. कॅनडातील व्हॅनकुवर
C. अमेरिकेतील लास वेगास
D. नवी दिल्ली


Click for answer

B. कॅनडातील व्हॅनकुवर

9. कोणत्या हिंदी पार्श्वगायिकेला नुकतेच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्यावतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले ?

A. अनुराधा पौडवाल
B. लता मंगेशकर
C. सुनिधी चौहान
D. श्रेया घोषाल


Click for answer

A. अनुराधा पौडवाल

त्यांच्यासोबत कुमार सानू यांचाही गौरव करण्यात आला.

10. सब टीव्ही वरील कोणत्या लोकप्रिय मालिकेतील डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचे निधन झाले ?

A. यस बॉस
B. जिजाजी छत पर है
C. लापतागंज
D. तारक मेहता का उलटा चष्मा


Click for answer

A. तारक मेहता का उलटा चष्मा

या मालिकेला लवकरच दहा वर्ष पूर्ण होणार आहेत.
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -9 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. तुर्कीच्या मर्सिन शहरात झालेल्या एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेतील व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदक कोणी पटकाविले ?
MPSC All In One

A. दीपा कर्माकर
B. रुचा दिवेकर
C. अरुणा रेड्डी
D. पूजा धांडा


Click for answer

A. दीपा कर्माकर

दुखापतीमुळे तब्बल दोन वर्षांची विश्रांती घेतलेली भारताची जिमनॅस्टपटू दीपा कर्माकरने रविवारी जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेतील व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.

गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा वॉल्ट प्रकारात चौथ्या स्थानावर राहिली होती.

या स्पर्धेतील दीपाचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.

2. खरीप ज्वारीचे देशातील पहिले जैवसमृद्ध वाण विकसित वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. या वाणाचे नाव काय ठेवण्यात आले आहे ?

A. परभणी मोती
B. परभणी श्वेता
C. परभणी ज्योती
D. परभणी शक्ती


Click for answer

D. परभणी शक्ती

कुपोषण दूर करण्यासह बहुपयोगी असलेले खरीप ज्वारीचे जैवसमृद्ध वाण 'परभणी शक्ती' ( पीव्हीके 1009) या नावाने विकसित करण्यात आले आहे़

लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेले हे देशातील पहिलेच वाण असून, 5 जुलै रोजी हैदराबाद येथे त्याचे प्रसारण करण्यात आले़ येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्धकोरवाडवाहू उष्णकटीबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रीसॅट) यांच्या संशोधनातून हे वाण विकसित करण्यात आले आहे

.या संशोधित वाणामध्ये लोह प्रतिकिलो 44 ते 46 मिलीग्रॅम आणि जस्त प्रतिकिलो 32 ते 33 मिलीग्रॅम असून, भाकरीची प्रत चांगली आहे़ कडबाही उच्चप्रतीचा असून, उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी 36 ते 38 क्विंटल व कडब्याचे उत्पादन 105 ते 110 क्विंटल आहे़ खोडमाशी, खोडकिड व काळ्या बुरशी या रोगास हा वाण प्रतिकारकक्षम आहे़.

3. जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या नोबेलपुरस्काराला लैंगिक छळाच्या आरोपांचा फटका बसल्यानंतर स्वीडनमधील विचारवंतांनी आता नोबेलला पर्याय म्हणून स्वतःचा पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय आहे ?

A. प्रति नोबेल
B. आबेल
C. दि न्यू अॅकॅडमी
D. दि न्यू थॉट


Click for answer

C. दि न्यू अॅकॅडमी

स्वीडीश अकादमी ही संस्था नोबेल पुरस्कार प्रदान करते. मात्र या पुरस्कार समितीत अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेली एक व्यक्ती असल्याचे आरोप झाल्यामुळे यंदा हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.

त्यामुळे निषेध म्हणून हा नवा पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. दि न्यू अॅकॅडमी असे नव्या संस्थेचे नाव असणार असून त्यात अनेक लेखक, कलाकार आणि पत्रकारांचा समावेश आहे. 107 विद्वानांनी एकत्र येऊन या संदर्भात निवेदन जारी केले आहे.

नोबेल पुरस्काराच्याच दिवशी म्हणजे 10 डिसेंबर रोजी तो देण्यात येईल. हा नवीन पुरस्कार - एक दशलक्ष क्रोनोर (सुमारे 1,13,000 डॉलर) रकमेचा असून तो जनसहभागातून देण्यात येईल. नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा होते तेव्हाच म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी या पर्यायी पुरस्काराचा विजेता जाहीर केला जाईल आणि नोबेल पुरस्काराच्याच दिवशीच म्हणजे 10 डिसेंबर रोजी तो देण्यात येईल.

नोबेल पुरस्कारांच्या साहित्यविषयक समितीच्या सदस्य असलेल्या कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचे पती आणि प्रसिद्ध छायाचित्रकार जीन क्लॉड अर्नॉल्ट यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप 18 महिलांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये जाहीरपणे केला होता. त्यामुळे सुमारे 70 वर्षांत प्रथमच नोबेल साहित्य पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.

4. टी-20 मध्ये तीन शतके ठोकणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?

A. विराट कोहली
B. रोहित शर्मा
C. पृथ्वी शॉ
D. हार्दिक पांड्या


Click for answer

B. रोहित शर्मा

ब्रिस्टल येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडवर भारताने 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 7 चेंडू शिल्लक असतानाच भारताने हा सामना जिंकला.

5. इंग्लंडमधील ईस्ट अँग्लिया प्रांतातील हे नॉरफॉक येथील थेटफोर्ड हे गाव शिख साम्राज्याचे शेवटचे राजे असलेल्या महाराजा दुलीपसिंग यांची125वी पुण्यवर्ष साजरे करत असून यानिमित्त हे शहर भारतातल्या कोणत्या शहराचे भगिनी शहर होणार आहे ?

A. अमृतसर
B. जालंधर
C. मोगा
D. पतियाळा


Click for answer

A. अमृतसर

महाराजा दुलीपसिंग यांच्या स्मरणार्थ इंग्लंडमध्ये दोन आठवड्यांचा पंजाबी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दुलीपसिंग हे महाराजा रणजित सिंग यांचे सर्वात धाकटे मुलगे होते. ब्रिटीशांनी त्यांना सक्तीने हद्दपार केले होते आणि 1849 मध्ये ते ब्रिटनमध्ये आले होते.

ब्रिटिशांनी त्यांच्याकडून कोहिनूर हिरा मिळविला होता.

6. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा जगातील सर्वात मोठा मोबाईल उत्पादन कारखाना कोठे सुरू होत आहे ?

A. शांघाय, चीन
B. नोएडा
C. बेंगळूरू
D. पुणे


Click for answer

B. नोएडा

सॅमसंगने 1990 च्या दशकात भारतात पहिले इलेक्ट्रोनिक उत्पादन केंद्र सुरु केले होते.

नोयडा येथील सेक्टर 81मध्ये सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सच्या भव्य कारखान्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि द.कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन याच्या उपस्थितीत होत असून सॅमसंगचा हा जगातील सर्वात मोठा मोबाईल उत्पादन कारखाना आहे.

35 एकर जागेत तो उभारला गेला असून यात मोबाईल बरोबर फ्रीज, टीव्ही व अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणे बनविली जाणार आहेत.

मून जे इन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

7. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार शाळांमधून कोणती गोष्ट वगळण्याबाबत निर्णय घेतला आहे ?

A. छडी
B. फळा
C. डस्टर
D. हजेरी पुस्तक


Click for answer

A. छडी

शिक्षण बाल हक्क कायद्यानुसार कोणत्याही मुलाला शारीरिक किंवा मानसिक छळाला सोमोरे जाऊ नये अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता राष्ट्रीय बालहक्क आयोगाने शाळांमध्ये छडीची शिक्षा वगळण्याबाबत निर्णय घेतला. याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सूचना केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना सर्व माध्यमांना, शाळांना, व्यवस्थापन संस्थांना देण्यात आल्या आहेत.

8. कोणत्या देशाने सरकारी नोकरीमधील तब्बल 18 हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले आहे ?

A. इराण
B. सुदान
C. तुर्की
D. पाकिस्तान


Click for answer

C. तुर्की

राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात काम करणे आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

2016 पासून तुर्कीतील तब्बल 1 लाख 10 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तुर्कीच्या धोरणांवर टीका करणाऱ्या आणखी हजारो नागरिकांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाखाच्या आसपास आहे.

9. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शेअरधारकांनी पुढील पाच वर्षांसाठी कोणाला मुदतवाढ दिली आहे ?

A. मुकेश अंबानी
B. अनिल अंबानी
C. कोकिळाबेन अंबानी
D. ईशा अंबानी


Click for answer

A. मुकेश अंबानी

मुंबई येथे 5 जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

10. अपर्णा बालन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. बुध्दिबळ
B. लॉन टेनिस
C. महिला क्रिकेट
D. बॅडमिंटन


Click for answer

D. बॅडमिंटन

भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री हिची आशियाई खेळांसाठी भारतीय बॅडमिंटन संघात निवड करण्यात आली आहे. या संघातून अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अपर्णा बालन हिला वगळण्यात आले होते

. या संबंधी अपर्णा हिने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बाई) आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, कन्या गायत्री गोपीचंद आणि आकर्षि कश्यप यांच्याविरोधात केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आपली कन्या गायत्री हिला संघात स्थान मिळावे, या कारणास्तव मला या संघातून वगळण्याचा निर्णय पुलेला गोपीचंद यांनी घेतला असल्याचेही आरोप तिने या याचिकेत केले आहेत.
Read More »

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -8 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. बँकांच्या प्रचंड तुंबलेल्या अनुत्पादित मालमत्ता (एनपीए)चे वेगाने निराकरण करण्यासाठी विविध कर्जदात्या संस्थांमध्ये प्रभावी समन्वय आणि आदानप्रदानासाठी 'आंतर-कर्जदाता सामंजस्य' आकृतीबंधाला बँकप्रमुखांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष सुनील मेहता यांच्या समितीच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत शिफारसींनुसार हा आकृतीबंध बँकांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर या महिनाअखेपर्यंत आकाराला येणे अपेक्षित आहे ?
MPSC Current Affairs

A. प्रोजेक्ट पुनर्निर्माण
B. प्रोजेक्ट सशक्त
C. प्रोजेक्ट जीवन
D. प्रोजेक्ट अमृत


Click for answer

A. प्रोजेक्ट सशक्त

सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा तिढा सोडविण्यासाठी स्वतंत्र सरकारी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापण्याची सूचना केली आहे.

मेहता समितीने सादर केलेल्या आराखडय़ात 50 कोटी रुपयांपर्यंत, 50 ते 500 कोटी रुपयांपर्यंत तसेच 500 कोटी रुपयांवरील थकित कर्जे अशी वर्गवारी करताना त्यासाठी विविध उपाय सुचविले आहेत.

2. भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना किती वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे ?

A. 7 वर्षे
B. 10 वर्षे
C. 5 वर्षे
D. 3 वर्षे


Click for answer

ब. 10 वर्षे

लंडन येथील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा देण्यात आली. याव्यतिरिक्त त्यांची मुलगी मरियम शरीफ हिला 7 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. तर मुलाला एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

तसेच न्यायालयाने नवाज शरीफ यांना 80 लाख पाउंड आणि मरियम शरीफ हिला 2 लाख पाउंड दंड सुनावला आहे. लंडन मधील एवनफिल्ड हाऊस मध्ये 4 घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे.

पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले.

3. महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा निर्णयापाठोपाठ आता कोणत्या राज्याने 15 जुलै पासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याची घोषणा केली आहे ?

A. उत्तरप्रदेश
B. कर्नाटक
C. पश्चिम बंगाल
D. गुजरात


Click for answer

A. उत्तरप्रदेश

4. 'नीट' आणि 'जेईई' ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. ह्या परीक्षा अनुक्रमे कोणत्या विद्याभ्यासाच्या शाखांत प्रवेश मिळविण्यासाठी द्याव्या लागतात ?

A. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र
B. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय
C. वैद्यकीय आणि औषधनिर्माण
D. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी


Click for answer

D. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी

या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार आहेत.

5. 'ओम शिनरिकयो' या अघोरी पंथाची स्थापना करणाऱ्या शोको असहारा या व्यक्तीला कोणत्या देशाने नुकतेच फासावर लटकवले ?

A. उत्तर कोरिया
B. दक्षिण कोरिया
C. सिंगापूर
D. जपान


Click for answer

D. जपान

20 मार्च 1995 साली त्याने मेट्रो ट्रेनमध्ये सरीन नावाचा विषारी वायू सोडला, ज्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला तर 6 हजार जण अत्यवस्थ झाले होते. सुदैवाने त्याचा कट फसला अन्यथा जपानमधल्या हजारो लोकांचा जीव गेला असता.

असहारा अंध होता.

6. वर्ल्ड चॉकलेट डे कधी साजरा करण्यात आला ?

A. 4 जुलै
B. 5 जुलै
C. 6 जुलै
D. 7 जुलै


Click for answer

D. 7 जुलै

दरवर्षी 7 जुलै हा दिवस वर्ल्ड चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो

7. जस्टिन ट्रुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ?

A. कॅनडा
B. इटली
C. जपान
D. स्वीडन


Click for answer

A. कॅनडा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे एका महिला पत्रकाराची छेड काढल्याच्या आरोपावरून वादात सापडले आहेत. 2000 साली एका स्थानिक वृत्तपत्राबरोबर काम करताना या महिला पत्रकाराबरोबर ही घटना झाल्याचं वृत्त अलीकडेच आलं होतं.

ट्रुडोंनी महिला पत्रकाराच्या विनयभंगाचा आरोप फेटाळला आहे.

8. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रामध्ये ____________ लोक मराठी भाषा तर 13 टक्के लोक हिंदी बोलतात.

A. 100 टक्के
B. 87 टक्के
C. 69 टक्के
D. 43 टक्के


Click for answer

C. 69 टक्के

9. सर्वात धनाढ्य उद्योजकांच्या यादीत वॉरन बफे यांना पिछाडीवर टाकत फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग जगातले कितव्या क्रमांकाचे धनाढ्य व्यक्ती बनले आहेत ?

A. चौथ्या
B. तिसऱ्या
C. दुसऱ्या
D. प्रथम


Click for answer

B. तिसऱ्या

त्यांच्या पुढे फक्त अॅमेझॉन संस्थापक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्ट फाउंडर बिल गेट्स आहेत. इतिहासात पहिल्यांदाच टॉप-3 धनाढ्य लोकांमध्ये सगळेच केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीमंत बनलेले लोक आहेत.

10. कोणत्या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही राज्यातील शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे ?

A. पवित्र
B. सारथी
C. गुरुजी
D. महा-गुरू


Click for answer

A. पवित्र

खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता 'पवित्र' या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे.
Read More »

भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-10


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.

1. भारतात कोणती राजकीय पक्ष पद्धती अस्तित्वात आहे ?
Indian-Polity-Quiz

A. एकपक्ष पद्धती
B. व्दिपक्ष पद्धती
C. अनेक पक्ष पद्धती
D. यापैकी एकही नाही


Click for answer

C. अनेक पक्ष पद्धती

2. भारतीय संघराज्यात किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

A. 25 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश
B. 27 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश
C. 29 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश
D. 29 घटक राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश


Click for answer

C. 29 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश

3. राज्यसभा हे सभागृह _______________________________________.

A. कायम स्वरूपाचे आहे.
B. पाच वर्षांकरिता आहे.
C. सहा वर्षांकरिता आहे.
D. सात वर्षांकरीता आहे.


Click for answer

A. कायम स्वरूपाचे आहे.

4. जम्मू व काश्मीर राज्याला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे विशेष दर्जा देण्यात आला आहे ?

A. कलम 370
B. कलम 144
C. कलम 281
D. कलम 376


Click for answer

A. कलम 370

5. भारतीय राष्ट्रपती पदावरील नियुक्तीसाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे ?

A. 30 वर्षे
B. 21 वर्षे
C. 60 वर्षे
D. 35 वर्षे


Click for answer

D. 35 वर्षे

6. भारतीय राज्यघटनेतील तरतूदींनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व घटक राज्यांचे राज्यपाल यांबाबत कोणते विधान बरोबर आहे ?

A. तिनही पदांसाठी निवडणूका घेतल्या जातात .
B. तिनही पदांसाठी किमान वयाची 35 वर्षे पूर्ण आवश्यक आहे .
C. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे होते तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांची निवडणूक फक्त संसदेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे केली जाते .
D. उपराष्ट्रपती यांची निवडणूक संसदेचे निर्वाचित सदस्य आणि घटक राज्यांच्या विधीमंडळांचे निर्वाचित सदस्यांद्वारे केली जाते .


Click for answer

B. तिनही पदांसाठी किमान वयाची 35 वर्षे पूर्ण आवश्यक आहे .

7. राज्यघटनेतील धनविषेयक विधेयकाशी संबंधित कलम कोणते ?

A. कलम 72
B. कलम 123
C. कलम 110
D. कलम 144


Click for answer

C. कलम 110

8. कायदयाच्या कच्च्या मसुदयाला काय म्हणतात ?

A. विधेयक (Bill)
B. प्रारूप (Draft)
C. वटहुकूम (Ordinance)
D. प्रस्ताव (Proposal)


Click for answer

A. विधेयक (Bill)

9. संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूची यांसंदर्भातील राज्यघटनेतील परिशिष्ट कोणते ?

A. परिशिष्ट 3
B. परिशिष्ट 7
C. परिशिष्ट 2
D. परिशिष्ट 4


Click for answer

A. परिशिष्ट 3

10. भारतीय शासन कोणत्या प्रकारचे आहे ?

A. अध्यक्षीय
B. संसदीय
C. एकाधिकारशाही
D. एकात्मिक


Click for answer

B. संसदीय
Read More »