Showing posts with label State service prelim. Show all posts
Showing posts with label State service prelim. Show all posts

Friday, July 8, 2011

एमपीएससी प्रश्नमंजूषा - 56

एमपीएससी प्रश्नमंजूषा - 56

1. रेडक्रॉस ह्या आंतरराष्ट्रिय संस्थेचे मुख्यालय _________ आहे.

A. पॅरीस
B. हेग
C. जिनिव्हा
D. न्यूयॉर्क

Click for answer 
C. जिनिव्हा


2.________  हे भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे.

A.  दाल
B. वुलर
C. कोलेरू
D. सांभर

Click for answer 
B. वुलर

3.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना __________ वर्षी सुरु करण्यात आली.

A. 2004-05
B. 2007-08
C. 2006-07
D. 2005-06

Click for answer 
B. 2007-08

4.  पायरोमीटर  ह्या साधनाचा उपयोग _________ मोजण्यासाठी केला जातो.

A. वार्‍याचा वेग
B. उच्च तापमान
C. विद्युतप्रवाह
D. हवेतील आर्द्रता

Click for answer 
B. उच्च तापमान

5.स्वराज्य पक्षेच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा समावेश होता?

A. मोतीलाल नेहरू
B.  तांबे
C. चित्तरंजन  दास
D. वरील सर्व

Click for answer 
D.वरील सर्व

6. केंद्रीय कृषी विद्यापीठ ___________येथे  आहे .

A. नवी दिल्ली
B. पंतनगर
C. राहुरी
D. इम्फाळ

Click for answer 
D. इम्फाळ

7.ग्रामसेवकाचा पगार कशातून दिला जातो?

A. ग्रामनिधीतून
B. पंचायत समिती निधीतून
C. जिल्हा परिषद निधीतून
D. राज्य शासनाच्या निधीतून

Click for answer 
C. जिल्हा परिषद निधीतून

8. महाराष्ट्र राज्याचा पहिला वित्त आयोग केव्हा नेमण्यात आला?

A. 23 एप्रिल  1992
B. 23  एप्रिल 1994
C. 23  एप्रिल 1967
D. 23 मे  1995

Click for answer 
B. 23  एप्रिल 1994

9.  आयताकृती कागदाचे आठ समान भाग करण्यासाठी किमान किती घड्या घालणे आवश्यक आहे.

A. 3
B. 4
C. 5
D. 7

Click for answer 
A. 3

10. पृथ्वीला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा __________ ह्या प्रकाराने मिळते.

A.वहन
B.प्रारण
C.उत्कलन
D.संप्लवन

Click for answer 
B.प्रारण

Thursday, July 7, 2011

एमपीएससी प्रश्नमंजुषा -54

एमपीएससी प्रश्नमंजुषा -54
1.'महाराष्ट्र मानव विकास मिशन' मुख्यालय ____________ येथे आहे.

A. नाशिक
B. मुंबई
C. गडचिरोली
D. औरंगाबाद

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. औरंगाबाद

2. राजीव गांधी यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासन ______________म्हणून साजरा करते.

A. विज्ञान तंत्रज्ञान दिन
B. माहीती तंत्रज्ञान दिन
C. जैव तंत्रज्ञान दिन
D. लोकशाही  दिन

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. माहीती तंत्रज्ञान दिन

3.  नागपूर विद्यापीठाला ________________ यांचे नाव देण्यात आले आहे.

A. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
B. संत गाडगे महाराज
C. महात्मा फुले
D. डॉ.बाबासाहेब आंबडेकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


4. संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)  ने  1975  हे वर्ष ____________म्हणून साजरे केले.

A. बालक वर्ष
B. महिला वर्ष
C. बालिका वर्ष
D. युवक वर्ष

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. महिला वर्ष

5. जिल्हा परिषदेची कृषी समिती ही पूर्वी ____________ म्हणून ओळखली जात असे.

A.  कृषी व सहकार
B.  कृषी विकास
C.  कृषी आणि संलग्न व्यवसाय
D.  शेतकरी विकास

उत्तरासाठी क्लिक  करा 
A.  कृषी व सहकार

6. तर्कशास्त्राचा पाया____________यांनी घातला.

A. आर्किमिडीज
B. न्युटन
C. ऍरीस्टाटल 
D. प्लेटो

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. ऍरीस्टाटल

7. खालीलपैकी कोणते शास्त्र नैसर्गिक शास्त्र नाही?

A.  रसायनशास्त्र
B.   राज्यशास्त्र
C.  भौतिकशास्त्र
D.   वरील सर्व

उत्तरासाठी क्लिक  करा 
B.   राज्यशास्त्र

8. लोकलेखा समिती आपला अहवाल कोणाला सादर करते?

A. पंतप्रधान
B. राज्यसभा अध्यक्ष 
C. राष्ट्रपती
D. लोकसभा सभापती

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. लोकसभा सभापती


9. महाराष्ट्र  ग्राम पोलीस अधिनियम राज्यात कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आला?

A. 5 जून 1968
B. 5 जून 1969
C. 5 मे  1968
D. 5 जानेवारी  1970

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 5 जून 1968

10. मेटालर्जी  हे कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे?

A. धातू
B. जमीन
C. हवामान
D. संख्या

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. धातू

Sunday, July 3, 2011

PSI /STI/ASST मुख्य परीक्षेची तयारी -1

पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) मुख्य परीक्षेची / विक्रीकर निरीक्षक (STI) /सहाय्यक (Asst)मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी?

                     माझे जे मित्र/मैत्रिणी ह्या परीक्षांना नवीन आहेत त्यांना कदाचित दोन्हीही वेगवेगळ्या परीक्षा (PSI आणि STI/ASST) एकत्र पाहून काहीतरी गोंधळ  होत आहे असे वाटले असेल. अर्थात ते सहाजिकच आहे. ज्यांनी आधी परीक्षा दिली आहे त्यांच्या चेह‍र्यावर हलकेसे परिचयाचे हास्यही आले असेल. असो, मुख्य मुद्दा एवढाच आहे कि ह्या दोनही परीक्षांच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम एकच आहे. त्यामुळे गांभीर्याने केलेली तयारी दुसर्‍या परीक्षेलाही तेवढीच उपयोगी ठरेल. अंतिम यादी बनविताना सहाय्यक पदासाठी मुलाखत आणि शारिरीक क्षमता परीक्षा (Physical Exam) नसते ,म्हणजेच ती यादी केवळ मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम होते तर विक्रीकर निरीक्षक ह्या पदासाठी मुलाखत असते परंतु शारिरीक क्षमता परीक्षा (Physical Exam) नसते अंतिम यादी मुख्य परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीतील गुण या आधारे होते आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत आणि शारिरीक क्षमता परीक्षा हे दोन्ही असतात हाच काय तो फरक.
            किंबहुना  ह्या मुख्य परीक्षेत आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात बरेच अभ्यास घटक (Units) सारखे आहेत हा जास्तीचा फायदा सांगता येईल.
             आता आपण पोलीस उप-निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू. नंतर यातील प्रत्येक घटक वेगवेगळा अभ्यासू.
ह्या  400  गुणांपैकी  जास्तीत जास्त गुण घेणे आवश्यक ठरते, कारण तुम्ही जर 'कट ऑफ  ' च्या पेक्षा फारच थोडे गुण घेवून मुलाखतीला पत्र झालात तर मुलाखतीच्या टप्प्यात तुम्हाला ज्यांना लेखी परीक्षेत जास्त गुण आहेत त्यांच्या मुलाखतीच्या गुणांपेक्षा थोडे जास्तच गुण घेणे क्रमप्राप्त ठरते. तेव्हा सर्व तयारीनिशी आतापासून नियमितपणे मुख्य परीक्षेची तयारी सुरु करा. घटकवार ही तयारी कशी कराल ह्या विषयी मी लवकरच सविस्तरपणे लिहीन.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत