Thursday, July 7, 2011

एमपीएससी प्रश्नमंजुषा -54

एमपीएससी प्रश्नमंजुषा -54
1.'महाराष्ट्र मानव विकास मिशन' मुख्यालय ____________ येथे आहे.

A. नाशिक
B. मुंबई
C. गडचिरोली
D. औरंगाबाद

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. औरंगाबाद

2. राजीव गांधी यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासन ______________म्हणून साजरा करते.

A. विज्ञान तंत्रज्ञान दिन
B. माहीती तंत्रज्ञान दिन
C. जैव तंत्रज्ञान दिन
D. लोकशाही  दिन

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. माहीती तंत्रज्ञान दिन

3.  नागपूर विद्यापीठाला ________________ यांचे नाव देण्यात आले आहे.

A. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
B. संत गाडगे महाराज
C. महात्मा फुले
D. डॉ.बाबासाहेब आंबडेकर

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


4. संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)  ने  1975  हे वर्ष ____________म्हणून साजरे केले.

A. बालक वर्ष
B. महिला वर्ष
C. बालिका वर्ष
D. युवक वर्ष

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. महिला वर्ष

5. जिल्हा परिषदेची कृषी समिती ही पूर्वी ____________ म्हणून ओळखली जात असे.

A.  कृषी व सहकार
B.  कृषी विकास
C.  कृषी आणि संलग्न व्यवसाय
D.  शेतकरी विकास

उत्तरासाठी क्लिक  करा 
A.  कृषी व सहकार

6. तर्कशास्त्राचा पाया____________यांनी घातला.

A. आर्किमिडीज
B. न्युटन
C. ऍरीस्टाटल 
D. प्लेटो

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. ऍरीस्टाटल

7. खालीलपैकी कोणते शास्त्र नैसर्गिक शास्त्र नाही?

A.  रसायनशास्त्र
B.   राज्यशास्त्र
C.  भौतिकशास्त्र
D.   वरील सर्व

उत्तरासाठी क्लिक  करा 
B.   राज्यशास्त्र

8. लोकलेखा समिती आपला अहवाल कोणाला सादर करते?

A. पंतप्रधान
B. राज्यसभा अध्यक्ष 
C. राष्ट्रपती
D. लोकसभा सभापती

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. लोकसभा सभापती


9. महाराष्ट्र  ग्राम पोलीस अधिनियम राज्यात कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आला?

A. 5 जून 1968
B. 5 जून 1969
C. 5 मे  1968
D. 5 जानेवारी  1970

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 5 जून 1968

10. मेटालर्जी  हे कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे?

A. धातू
B. जमीन
C. हवामान
D. संख्या

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. धातू

एमपीएससी प्रश्नमंजुषा -53

एमपीएससी  प्रश्नमंजुषा -53
1. महाराष्ट्रात _____________ यांचा जन्मदिवस 'बालिका दिन 'म्हणून साजरा केला जातो.

A. सावित्रीबाई फुले
B. राजमाता जिजाबाई 
C. आनंदीबाई जोशी
D. ताराबाई शिंदे

Click for answer 
A. सावित्रीबाई फुले

2. भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हणतात ?

A. नॉर्मन बोरलॉग
B. डॉ.स्वामीनाथन
C. डॉ.वर्गीस कुरियन
D. पंडित नेहरू

Click for answer 
B. डॉ.स्वामीनाथन


3. जगात सर्वप्रथम ___________ ह्या देशाने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरु केला.

A. चीन
B. अमेरीका
C. भारत
D. रशिया

Click for answer 
C. भारत

4. ग्रामगीता हा ग्रंथ ___________ यांनी लिहिला.

A. महात्मा गांधी
B. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
C. जगतगुरू तुकाराम महाराज
D. साने गुरुजी

Click for answer 
B. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

5. रेटीनॉल म्हणजेच जीवनसत्व ___________ होय.

A. अ
B. ब १
C. क
D. ड

Click for answer 
A. अ

6. ग्रामपंचायतीचे आर्थिक वर्ष _________ ला सुरु होते.

A. 1 मे
B. 31 मार्च
C. 1 एप्रिल
D. 1 ऑगस्ट

Click for answer 
C. 1 एप्रिल

7. सतीबंदी कायदा___________ह्या वर्षी करण्यात आला.

A. 1829
B. 1856
C. 1947
D. 1960

Click for answer 
A. 1829

8. विदर्भात _____________ प्रकारची जंगले आढळतात .

A. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले
B. उष्णकटिबंधीय निम सदाहरित जंगले
C. उष्णकटिबंधीय पानझडीची जंगले
D. खुरटी जंगले

Click for answer 
C. उष्णकटिबंधीय पानझडीची जंगले

9. भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी ________________इतका काळ लागला.

A. २ वर्षे १० दिवस
B. २ वर्षे ११ दिवस
C. २ वर्षे ११ महिने
D. २ वर्ष ११ महिने १८ दिवस

Click for answer 
D. २ वर्ष ११ महिने १८ दिवस

10. चितगाव कटात कोणती महिला क्रांतिकारक शहीद झाली?

A. कुणीही नाही
B. कल्पना दत्त
C. प्रीतीलता वड्डेदार
D. सुनिता चौधरी

Click for answer 
C. प्रीतीलता वड्डेदार

Wednesday, July 6, 2011

महाराष्ट्र : सर्वसामान्य माहिती

# असा हा महाराष्ट्र #

 क्षेत्रफळ : 307,713 km2      (भारतात तिसरा क्रमांक )
लोकसंख्या: (२००१ ची जनगणना )      
                                          96,752,247   (भारतात २ रे )     
(२०११ ची जनगणना :हंगामी आकड्यांनुसार ) :
                                         112,372,972 (भारतात २ रे )     


राज्याचे गीत: "जय जय महाराष्ट्र माझा "

राजभाषा: मराठी

राज्याचा प्राणी (State Animal): शेकरू ( मोठी खार: भीमाशंकरच्या जंगलात आढळते.)

 राज्य वृक्ष: आंबा


 राज्य पक्षी: हरीयाल(हिरव्या रंगाचा कबुतरासारखा दिसणारा   पक्षी )

राज्याचा खेळ : कब्बड्डी

राज्य  नृत्य : लावणी


प्रश्नमंजुषा -52

प्रश्नमंजुषा -52

1. ई- वेस्ट धोरण अंमलात आणणारे भारतातले पहिले राज्य___________ हे ठरले.

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. कर्नाटक
D. तामिळनाडू

Click for answer 
D. तामिळनाडू

2. पहिले विश्व मराठी नाट्‍‌य संमेलन ___________ येथे पार पडले.

A. दुबई
B. सनफ्रान्स्कीस्को
C. न्यूयॉर्क
D. न्यूजर्सी

Click for answer 
D. न्यूजर्सी3. नॅक(NAAC)चे अध्यक्ष __________ हे आहेत.

A. डॉ.राम ताकवले
B. सुखदेव थोरात
C. भालचंद्र मुणगेकर
D. डॉ.रघुनाथ माशेलकर

Click for answer 
A. डॉ.राम ताकवले

4. 'आर.के लक्ष्मण 'हे नामांकित _______________ आहेत.

A. साहित्यिक
B. व्यंगचित्रकार
C. उद्‌योजक
D. दिग्दर्शक

Click for answer 
B. व्यंगचित्रकार

5. 'सारे जहाँ सें अच्छा 'या गीताचे लेखक कोण आहेत?

A. महंमद इक्बाल
B. कवी प्रदीप
C. रवींद्रनाथ टागोर
D. गुलजार

Click for answer 
A. महंमद इक्बाल

6. भारतातून ____________ हे वृत्त जाते.

A. कर्कवृत्त
B. मकरवृत्त
C. विषुववृत्त
D. कोणतेही जात नाही.

Click for answer 
A. कर्कवृत्त

7. भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रात __________ आरे आहेत.

A. 24
B. 36
C. 48
D. 12

Click for answer 
A. 24

8. 'शाकुंतल 'ह्या नाटकाचे नाटककार कोण आहेत?

A. कालिदास
B. आर्यभट्ट
C. बाणभट्ट
D. कुसुमाग्रज

Click for answer 
A. कालिदास

9. 'द व्हाईट टायगर' हे पुस्तक कोणत्या भारतीय लेखकाने लिहिले आहे?

A. सलमान रश्दी
B. अनिता देसाई
C. अरविंद अडिगा
D. विक्रम सेठ

Click for answer 
C. अरविंद अडिगा

10. आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कुठे आहे?

A. जिनिव्हा
B. हेग
C. पॅरीस
D. न्यूयॉर्क

Click for answer 
B. हेग

Tuesday, July 5, 2011

प्रश्नमंजुषा -51 


1.उस्ताद अल्लारखा खान हे  कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?

A. सितार
B.  सनई
C.  तबला
D. शास्त्रीय गायन

Click for answer 
C.  तबला


2. भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कायमस्वरूपी भूकंपमापन केंद्र (seismological observatory ) स्थापण्यात आले आहे?

A. पुणे
B. थुंबा
C. लातूर
D. दिल्ली

Click for answer 
C. लातूर

3. भारतातील कोणते राज्य मिठाच्या एकूण उत्पादनापैकी 60% उत्पादन करते?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. केरळ
D. पश्चिम बंगाल

Click for answer 
B. गुजरात

4. कारगील मधील विजयाची स्मृती 'कारगील विजय दिवस 'म्हणून केव्हा साजरा केला जातो?

A. 16 डिसेंबर
B. 31 ऑक्टोबर
C. 14 जानेवारी
D. 26 जुलै

Click for answer 
D. 26 जुलै

5. आयातुल्ला फदल्लाह हे कोणत्या देशातील धार्मिक गुरु होते?

A. इराण
B. इराक
C. संयुक्त अरब अमीरात
D. अफगाणिस्तान

Click for answer 
A. इराण


6. सरत फोन्सेका ह्या ______________ देशाच्या माजी लष्करप्रमुखांचे 'कोर्ट मार्शल' झाले.

A. भूतान
B. श्रीलंका
C. मालदीव
D. इंडोनेशिया

Click for answer 
B. श्रीलंका

7. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच निकाल दिलेला 'अरुणा शानबाग खटला' कशाशी संबंधित होता?

A. मुलभूत हक्क
B. माहितीचा अधिकार
C. दयामरण किंवा इच्छामरण
D. राज्यघटनेच्या कलम 356 चा गैरवापर

Click for answer 
C. दयामरण किंवा इच्छामरण

8. पंडित भीमसेन जोशींचा जन्म ___________ ह्या राज्यात झाला होता.

A. गोवा
B. कर्नाटक
C. मध्यप्रदेश
D. महाराष्ट्र

Click for answer 
B. कर्नाटक

9. आय.सी.सी. (International Cricket Council) च्या 'हॉल ऑफ फेम 'मध्ये समावेश करण्यात आलेल्या पहिली महिला खेळाडू कोण?

A. झुलन गोस्वामी
B. रेचेल हॅहोए फ्लिंट
C. मिथिल राज
D. कोणीही नाही.

Click for answer 
B. रेचेल हॅहोए फ्लिंट

10. साखर उद्योगाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भारत सरकारने कोणती समिती नेमली?

A. विजय केळकर समिती
B. नरेन्द्र जाधव समिती
C. बिमल जालन समिती
D. न्या.श्रीकृष्ण समिती

Click for answer 
A. विजय केळकर समिती

Sunday, July 3, 2011

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा तयारी भाग -1

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा तयारी भाग -1
( 'महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा तयारी ' ह्या शीर्षकाखाली जे घटक PSI मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात नाहीत त्यांची तयारी करू यात .  PSI  मुख्य मधील सामायिक घटकांसाठी PSI  मुख्य परीक्षेशी संदर्भातील  post  पहा.)

हा प्रश्नसंच खालील उपघटकावर आधारित आहे:

------------------------------------------------------------------------------------------
1. एक किलोबाईट =______________बाईट

A.  10000
B.  1024
C.  100
D.  2048

Click for answer 
B.  1024

2. 'जॉयस्टिक ' ह्या साधनाचा उपयोग ____________ साठी होतो.

A.  संगणकातील खेळ खेळण्यासाठी  
B.   पेपर स्कॅन करण्यासाठी
C.   'आउट-पुट डीव्हाइस' म्हणून  
D.   वरील सर्व बाबींसाठी

Click for answer 
A.  संगणकातील खेळ खेळण्यासाठी  

3. 'लिनक्स (LINUX)' काय आहे? 

A. ऑपरेटिंग सिस्टीम
B.  इनपुट  डीव्हाइस
C.  आउटपुट डीव्हाइस
D.  बारकोड रीडर चे सॉफ्टवेअर 

Click for answer 
A. ऑपरेटिंग सिस्टीम

4. एका शहरातील संगणकांचे परस्परांशी जोडलेले जाळे म्हणजेच ____________________

A. लोकल एरिया नेटवर्क
B. वाईड एरिया नेटवर्क
C. मेट्रोपोलिटिअन एरिया नेटवर्क
D. वरील सर्व

Click for answer 
C. मेट्रोपोलिटिअन एरिया नेटवर्क

5. कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे आणि आदेश देणारे ___________ हे उपकरण आहे.

A. मॉनिटर
B. प्रिंटर
C. की-बोर्ड
D. वरील सर्व

Click for answer 
C. की-बोर्ड

6. Internet म्हणजे ______________

A. इंटरडिव्हिजनल नेटवर्क ऑफ कोंम्प्युटर्स
B. इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ कोंम्प्युटर्स
C. इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कोंम्प्युटर्स
D. इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ सर्व्हर्स

Click for answer 
C. इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कोंम्प्युटर्स

7. प्रोग्राम आणि डाटा तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी ____________ चा वापर होतो.

A. RAM
B. ROM
C. CD
D. DVD

Click for answer 
A. RAM

8. आय.सी.टी.म्हणजे _____________________

A. इन्फोर्मेशन ऍन्ड कोंम्प्युटर टेक्नॉलॉजी
B. इंटर कनेक्टेड टेक्नॉलॉजी
C. इन्फोर्मेशन कॉमन टेक्नॉलॉजी
D. इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी

Click for answer 
D. इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी

9. डॉस (DOS) म्हणजे ______________

A. डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम
B. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम
C. डबल ऑपरेटिंग सिस्टीम
D. डेस्क ऑपरेटिंग सिस्टीम

Click for answer 
B. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम

10. माहीती तंत्रज्ञानात खालील बाबींचा समावेश असतो.
I. माहिती मिळवणे
II. माहितीवर प्रक्रिया करणे.
III. प्रक्रिया केलेली माहिती साठविणे.
IV. पाहिजे त्याला ती उपलब्ध करून देणे.

A. I,II,III आणि IV
B. I,II आणि III
C. II आणि III
D. II आणि IV

Click for answer 
A. I,II,III आणि IV

PSI /STI/ASST मुख्य परीक्षेची तयारी -1

पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) मुख्य परीक्षेची / विक्रीकर निरीक्षक (STI) /सहाय्यक (Asst)मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी?

                     माझे जे मित्र/मैत्रिणी ह्या परीक्षांना नवीन आहेत त्यांना कदाचित दोन्हीही वेगवेगळ्या परीक्षा (PSI आणि STI/ASST) एकत्र पाहून काहीतरी गोंधळ  होत आहे असे वाटले असेल. अर्थात ते सहाजिकच आहे. ज्यांनी आधी परीक्षा दिली आहे त्यांच्या चेह‍र्यावर हलकेसे परिचयाचे हास्यही आले असेल. असो, मुख्य मुद्दा एवढाच आहे कि ह्या दोनही परीक्षांच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम एकच आहे. त्यामुळे गांभीर्याने केलेली तयारी दुसर्‍या परीक्षेलाही तेवढीच उपयोगी ठरेल. अंतिम यादी बनविताना सहाय्यक पदासाठी मुलाखत आणि शारिरीक क्षमता परीक्षा (Physical Exam) नसते ,म्हणजेच ती यादी केवळ मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम होते तर विक्रीकर निरीक्षक ह्या पदासाठी मुलाखत असते परंतु शारिरीक क्षमता परीक्षा (Physical Exam) नसते अंतिम यादी मुख्य परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीतील गुण या आधारे होते आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत आणि शारिरीक क्षमता परीक्षा हे दोन्ही असतात हाच काय तो फरक.
            किंबहुना  ह्या मुख्य परीक्षेत आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात बरेच अभ्यास घटक (Units) सारखे आहेत हा जास्तीचा फायदा सांगता येईल.
             आता आपण पोलीस उप-निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू. नंतर यातील प्रत्येक घटक वेगवेगळा अभ्यासू.
ह्या  400  गुणांपैकी  जास्तीत जास्त गुण घेणे आवश्यक ठरते, कारण तुम्ही जर 'कट ऑफ  ' च्या पेक्षा फारच थोडे गुण घेवून मुलाखतीला पत्र झालात तर मुलाखतीच्या टप्प्यात तुम्हाला ज्यांना लेखी परीक्षेत जास्त गुण आहेत त्यांच्या मुलाखतीच्या गुणांपेक्षा थोडे जास्तच गुण घेणे क्रमप्राप्त ठरते. तेव्हा सर्व तयारीनिशी आतापासून नियमितपणे मुख्य परीक्षेची तयारी सुरु करा. घटकवार ही तयारी कशी कराल ह्या विषयी मी लवकरच सविस्तरपणे लिहीन.

Saturday, July 2, 2011

महत्त्वाची सूचना

महाराष्ट्र कृषी सेवा ( पूर्व ) परीक्षा आणि पी.एस.आय. मुख्य परीक्षेसाठी विशेष सदर लवकरच सुरु करणार आहोत.
धन्यवाद !!!Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत