Friday, May 6, 2011

संकीर्ण चालू घडामोडी भाग-1

  • महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने महसूल विभागाकडून राबविण्यात येणारे अभियान : सुवर्ण जयंती राजस्व अभियान .
  • महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य सचिव : रत्नाकर गायकवाड
  • जगभरातील ‘वनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकास’ याबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2011 हे वर्ष ‘जागतिक वन वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे.
  • राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येते.
  • ग्रामीण भागात स्वच्छता आणि आरोग्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरु केले.
  • संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्मल 19 फेब्रुवारी 2011 (छत्रपती शिवाजी महाराज  जयंती) रोजी पासून राज्यात निर्मल स्व-राज्य मोहिम राबविली . समारोप : 14 एप्रिल 2011 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती).
  • आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर)च्या स्थापनेस 100 वर्ष पूर्ण . स्थापना: 1911 इंडियन रिसर्च फंड एसोसिएशन (आईसीएमआर) ह्या नावाने. 1949 मध्ये भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर) असे नामकरण.
  • भारतातील पहिल्या 'हवाई टपाल सेवे'स 100 वर्ष पूर्ण.  18 फेब्रुवारी 1911 रोजी अलाहाबाद ते नैनी दरम्यान पहिली सेवा सुरु. 

Tuesday, May 3, 2011

सज्ज व्हा !!!

नजिकच्या काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांना नजरे समोर ठेवून पुन्हा एकदा आपल्या सेवेत हजर !!! एक नम्र विनंती : हा उपक्रम जर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपण पोहचवलात तर मी आणि माझी टीम आपली ऋणी राहील.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत