Saturday, August 7, 2010

चालू घडामोडी 7 ऑगस्ट 2010   प्रादेशिक
   • पर्यावरणसमृद्ध ग्राम योजनेत राज्यात साडेसहा कोटी झाडे लावणार.
   • पहिला 'लोकमान्य मातृभूमी पुरस्कार ' बाबासाहेब पुरंदरे यांना. 
   • जात, राष्ट्रीयत्व, अधिवास आणि इतर दाखले देण्याचा 'ठाणे पटर्न ' शासन राज्यभर राबविणार. 
    राष्ट्रीय
   • 4 नवीन IIMC (इंडिअन इंस्टीटूट ऑफ मास कमुनीकेशन ) ची स्थापना होणार - नियोजित स्थळे -ऐझवाल- मणिपूर, केरळ, विदर्भ , जम्मू आणि काश्मीर.
   • अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची युनिसेफची (युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड) नॅशनल अ‍ॅम्बेसॅडर म्हणून निवड निश्चित.
   • ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या युनिसेफच्या नॅशनल अ‍ॅम्बेसॅडर तर बिग बी अमिताभ बच्चन हे गुडविल अ‍ॅम्बेसॅडर आहेत.गुडविल अ‍ॅम्बेसॅडर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर तर नॅशनल अ‍ॅम्बेसॅडर हे राष्ट्रीय पातळीवर युनिसेफचे कार्य करतात.
   • सीएनएनने 'साँगलाइन' या संगीतविषयक मासिकाच्या जोडीने संगीत क्षेत्रातील शीर्षस्थांची यादी तयार केली. या यादीत एरेथा फ्रँकलीन, जेम्स ब्राऊन, बॉब मार्ली, सेलिया क्रूज यांच्यासह आशा भोसले यांचा पहिल्या 'टॉप २०'मध्ये सामावेश.यातूनच पहिल्या पाच जणांच्या नावांची घोषणा २५ ऑगस्टला करण्यात येणार आहे.
   • अमेरिकेत झालेल्या जागतिक मूकबधिर सौंदर्य स्पर्धेत भारताच्या करिष्मा लांबा हिचा दुसरा क्रमांक.
   आंतरराष्ट्रीय
   • अमेरिकेने 'हरकत उल-जिहाद-इ-इस्लामी (हुजी) ला आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले.
   • द. कोरियाचा पिवळ्या समुद्रात मोठा पाणबुड्याविरोधात अभ्यास सुरु.
   • ब्रोनिस्लाव कोमोरोव्स्की ( Bronislaw Komorowski ) यांचा पोलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथविधी. लेच कच्झाय्स्कीयांच्या विमान अपघातातील मृत्यूमुळे राष्ट्राध्यक्ष पद रिक्त झाले होते.
   • रशिया सध्या तोंड देतोय शतकातील सर्वात वाईट दुष्काळाला. रशियाने 15ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावाडीत पीठ आणि गहू यांच्या निर्यातीला बंदी घातली आहे.
   • पाकिस्तानच्या पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांची २० वर्षीय कन्या बख्तावर सक्रिय राजकारणात.त्याच वेळी तिचे बंधू आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल यांनी सध्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगून राजकारणात उतरण्यास नकार दिला आहे.
   • आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविल्या गेलेल्या एका प्रसिद्ध चित्रकाराच्या चित्रांच्या चोरीमध्ये मदत केल्याचा आरोप, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

    Friday, August 6, 2010

    राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा

    पुरस्कार विजेते
    राजीव गांधी खेलरत्न -
    साईना नेहवाल (बॅडमिंटन)
    अर्जुन पुरस्कार -
    जोसेफ इब्राहिम, कृष्णा पूनिया (ऍथलेटिक्‍स), दिनेश कुमार (मुष्टियुद्ध), परिमार्जन नेगी (बुद्धिबळ), झूलन गोस्वामी (महिला क्रिकेट), दीपककुमार मोंडल (फुटबॉल), संदीप सिंग, जसजीत कौर हांडा (हॉकी), दिनेशकुमार (कबड्डी), संजीव राजपूत (नेमबाजी), रेहान पोंचा (जलतरण), कपिलदेव केजे (व्हॉलिबॉल), राजीव तोमर (कुस्ती), राजेश चौधरी (नौकानयन), जगसीर सिंग (पॅरालिंपिक ऍथलेटिक्‍स)

    ध्यानचंद - सतीश पिल्ले (ऍथलेटिक्‍स), कुलदीप सिंग (कुस्ती), अनिता चानू (वेटलिफ्टिंग)

    द्रोणाचार्य - ए. के. कुट्टी (ऍथलेटिक्‍स), सुभाष अग्रवाल (बिलियर्डस, स्नूकर), एल. इबोमचा सिंह (मुष्टियुद्ध), अजय कुमार बन्सल (हॉकी), कॅप्टन चांदरुप (कुस्ती)

    खेल प्रोत्साहन - सेनादल क्रीडा मंडळाला दोन गटात, टाटा स्टील लिमिटेड आणि मध्य प्रदेश क्रीडा आणि युवा विभाग.


    पुरस्कार निवड समित्या :
    १. राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, ध्यानचंद, तसेच प्रोत्साहन पुरस्कार: पी. टी. उषा यांच्या अध्यक्षतेखालील समिती
    २. द्रोणाचार्य पुरस्कार : अशोक कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समिती.

    • 'खेलरत्न' पुरस्कार रोख साडे सात लाख आणि स्मृतिचिन्ह
    • 'अर्जुन' पुरस्कार पुरस्कार आणि अर्जुनाचा ब्रॉंझचा पुतळा.
    • 'द्रोणाचार्य' आणि ध्यानचंद पुरस्काराचे प्रत्येकी पाच लाख 

    राजीव गांधी खेलरत्न : आंतरराष्ट्रीय स्तरावरील दैदिप्यमान कामगिरीसाठी
    अर्जुन पुरस्कार: खेळाडूंच्या उत्तम कामगिरीसाठी
    ध्यानचंद पुरस्कार: जीवन गौरव पुरस्कार
    द्रोणाचार्य पुरस्कार: प्रशिक्षकांकरिता

    चालू घडामोडी 6 ऑगस्ट 2010


    राष्ट्रीय
    • 'ऑनर किलिंग' (सामाजिक प्रतिष्टा जपण्यासाठी केलेली हत्या) विरोधातील विधेयक केंद्र सरकार संसदेच्या मान्सून सत्रात मांडणार.
    • मुगल-ए-आझम' ची ५० वर्षे पूर्ण. - 'शोले' च्या निर्मितीपुर्वी सर्व रेकॉर्ड्स या चित्रपटाच्या नावावर होते.

    कृषी
    • ओक्सीटोसीन आणि इतर संप्रेरकांचा फळे आणि भाजीपाला पिके यांवर होणारा परिणाम शोधण्यासाठी सरकारकडून उच्चस्तरीय समितीची घोषणा. - शेतकरी फळे लवकर पिकवण्यासाठी यांचा वापर करतात परंतु ते आरोग्यासाठी हानिकारक असलायचा दावा केला जातो.
    आंतरराष्ट्रीय
    • बांगलादेशात आता राष्ट्रगीताचा रिंगटोन वापरणे अवैध.  
    • पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पूर परिस्थितीमुळे  40 लाख लोकांना फटका बसल्याची
      UN (संयुक्त राष्ट्रसंघाकडून ) माहिती.
    • पश्चिम रशियात लागलेला मोठा वणवा अद्याप विझला नाही.

    क्रीडा

    • विद्या स्टोक्स (वय ८२ वर्षे) या हॉकी इंडियाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा.या आधी त्याच प्रभारी अध्यक्षा होत्या.
     परंतु काही तासांतच केंद्रीय क्रीडा खात्याने हॉकी इंडियाची संलग्नता रद्द केली असल्याची घोषणा केली."हॉकी इंडिया'ने केंद्रीय क्रीडा खात्याच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास नकार दिला होता, त्या पार्श्वभूमीवर हि कारवाई.

    • टेबल टेनिस :
     शरथ कमल ह्या भारतीय खेळाडूचा जगभरातील पहिल्या 50  खेळाडूंत प्रवेश . अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय. सध्या 45 व्या क्रमांकावर. त्याने अलीकडेच टेबल टेनिस ची यु.एस. ओपन आणि इजिप्त ओपेन ह्या स्पर्धा जिंकल्या होत्या.  
    • अर्जुन,ध्यानचंद,द्रोणाचार्य तसेच खेळ प्रोत्साहन पुरस्कार जाहीर.
     - वितरण 29 ऑगस्ट रोजी होते . 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. तो हॉकीपटू ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.
    • महिला हॉकी सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी सरदा अली खान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून चौकशी समिती.
     (वादग्रस्त महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक एम. के. कौशिक)

    Thursday, August 5, 2010

    चालू घडामोडी 5 ऑगस्ट 2010

    प्रादेशिक
    •  राज्यात गावांच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना .- ग्रामविकास खाते अमलबजावणी करणार. 
    • महाराष्ट्रात आता 15 वर्षांवरील खासगी वाहने आणि 8 वर्षांवरील बस, रिक्षा, ट्रक आदी सार्वजनिक आणि मालवाहतुकीच्या वाहनांवर पर्यावरण कर (Green Tax ).
    • महाराष्ट्र शासन हेल्लो कॉलर टयून्सवर 25% करमणुककर लावण्याच्या विचारात. असे झाल्यास महाराष्ट्र हे असा कर आकारणारे भारतातील पहिलेच राज्य असेल.
    राष्ट्रीय

    • गोपाल दास यांची BSNL च्या प्रभारी चेअरमन आणि एम.डी. पदी नियुक्ती.
    • भारत आणि अर्जेन्टिना दरम्यान कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी करार. 
    • हैदराबाद मेट्रो प्रकल्पाचे काम एल. अन्ड टी कंपनी करणार . 
    आंतरराष्ट्रीय

    • जगभरातील फेव्हरिट सोशल नेटवर्किंग साइट असणा-या फेसबुकवरील10 कोटी युझर्सची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर फुटली.जून 2010 मध्ये फेसबुक युझर्सची संख्या 5० कोटीवर पोहोचली आहे.  फेसबुक चा निर्माता मार्क झुकेर्बेर्ग हा जगातील सर्वात तरुण अब्जाधीश -वय 25 वर्षे
    • श्रीलंका सप्टेंबर मध्ये  कर्जरोखे विकून पैसे उभे करणार.- लिट्टेबरोबरच्या युद्धानंतर श्रीलंकेची आर्थिक स्थिती नाजूक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी  कडे मदतीसाठी धाव घेतली होती.
    • त्रिनिदाद अन्ड टोबागोच्या  पंतप्रधान   कमला प्रसाद-बिस्सेस्सार  (त्या कॅरिबिअन देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. )


    आर्थिक

    • 'टाटा सन्स'चे  विद्यमान चेअरमन रतन टाटा यांच्या वारसाचा शोध सुरु. - रतन टाटा डिसेंबर २०१२ अखेर निवृत्त होणार.
    क्रीडा

    • वीरेंद्र सेहवागच्या  कसोटी क्रिकेट मध्ये 7००० धावा पूर्ण - ६ वा भारतीय फलंदाज
    पुस्तक
    • द  स्ट्रेटेगिक  विक्टरी : लेखक क्यूबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो

    Wednesday, August 4, 2010

    चालू घडामोडी 4 ऑगस्ट 2010

    राष्ट्रीय:

    • झारखंडच्या 3 आमदारांनी राज्यसभा निवडणुकीसाठी पैसे घेवून मतदान करण्याची तयारी दाखली होती. त्याचे स्टिंग ऑपरेशन खाजगी वाहिनीवरून प्रसारित झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून झारखंड सरकारला चौकशीचे आदेश.

    • गुजरात सरकारने शाळा व कॉलेजात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी जारी केली.


    क्रीडा:

    • न्यूझीलंडचे वयोवृद्ध कसोटपटू एरिक टिंडिल यांचे निधन
    • राष्ट्रकुल स्पर्धेचे ६ "ब्रॅंड अम्बेसिडर'
      १.ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा,
    २.बॅडमिंटन खेळाडू साईना नेहवाल,
    ३.ऑलिंपियन ब्रॉंझपदक विजेता मुष्टियोद्धा विजेंद्रसिंग
    ४.नेमबाज समरेश जंग,
    ५.ऑलिंपियन ब्रॉंझपदक विजेता कुस्तिगीर सुशीलकुमार आणि
    ६.जागतिक मुष्टियुद्ध विजेती एम. सी. मेरी कोम
    • भारताच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
     2007 राष्ट्रीय खेळ झारखंड
     2009 केरळ
     2011 गोवा
     पण अद्यापही यातील एकही स्पर्धा झालेली नाही,
    स्पर्धा - शुभंकर (Mascot)
       क्रिकेट वर्ल्ड कप -2011 (आगामी )- स्टम्पी
    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा -2010 - शेरा
    राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा -2008 -जिगर
    फिफा फुटबाल वर्ल्ड कप -2010 -झाकुमी
    बीजिंग ऑलम्पिक 2008 - फुवा
    आशियाई क्रीडा स्पर्धा (अशियाड) -1982 -अप्पू

    अंतरराष्ट्रीय:


    • दक्षिण चीनच्या गुआंगझाऊ शहरात कँटोनीज भाषा वाचविण्यासाठी हजारो नागरिकांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
    • आफ्रिका खंडातील 'मलावी' देशाने स्वतःचा राष्ट्रध्वज बदलला.
    • बांगलादेशाच्या सुप्रीम कोर्टचा ऐतिहासिक निर्णय: जातीयवादी राजकीय पक्ष बेकायदेशीर.
    • कातालोनिया (Catalonia ) या स्पेन मधील स्वायत्त प्रदेशाच्या संसदेने "बुल फायटिंग " वर बंदी आणायच्या बाजूने मतदान केले. (बुल फायटिंग - हा स्पेन चा राष्ट्रीय खेळ आहे.) 
       काही देशांचे राष्ट्रीय खेळ
    देश- राष्ट्रीय खेळ
    १. बांगलादेश - कबड्डी
    २. श्रीलंका - वोलीबॉल
    ३. अफगाणिस्तान - बुझकाशी
    ४. भारत - मैदानी हॉकी

    • रवांडाचा (आफ्रिका खंडातील ) माजी शासक डोमिनिक़ुए न्तावूकुलील्यायो (Dominique Ntawukulilyayo) याला त्याने घडवलेल्या नरसंहारासाठी अंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून २५ वर्ष कैदेची शिक्षा.

    • इंटरपोलचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी पोलीस प्रमुख जाकी सेलेबी (Jackie Selebi ), यांना भ्रष्टाचारासाठी 15 वर्षे तुरुंगवास.

    चर्चेतील पुस्तक
    1. कीपिंग द फेथ: मेमोईर्स ऑफ अ पार्लीअमेंटरिअन लेखक -सोमनाथ चटर्जी

    Tuesday, August 3, 2010

    इतर महत्त्वाचे

    •  मुंबई ग्रामपंचायत अधिनियम1958 मध्ये सुधारणा करून नवा अध्यादेश लागू. मुंबई ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश 2010 असे त्याचे नविन नाव.
    • डॉ.मंदाकिनी आमटे यांना आयएमसी (इंडियन मर्चंटस् चेंबर) लेडिज विंग 'वूमन ऑफ द ईयर' पुरस्कार मिळाला. 
    • शासनाच्या विविध विभागांच्या कामगिरीचे संनियंत्रण आणि मूल्यांकन प्रक्रिया सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. 
    • ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना "सीआयएफ चंचलानी ग्लोबल इंडियन 2010' या पुरस्काराने व्हॅनुकुअर(कॅनडा) येथे सन्मानित- "कॅनडा इंडिया फाउंडेशन'तर्फे (सीआयएफ) हा पुरस्कार देण्यात येतो. 1 कोटी रुपये + मानपत्र. 

      चालू घडामोडी 3 ऑगस्ट 2010

      • 'विप्रो' ही software कंपनी केंद्र शासनाच्या गृह विभासाठी गुन्हेगारांचा माग
              ठेवणारे software -क्राईम एंड क्रिमिनल ट्रकिंग नेटवर्क सिस्टम (CCTNS) तयार
              करणार.
      • सचिन तेंडूलकर आज सर्वाधिक (कोलंबो) कसोटी खेळण्याचा जागतिक विक्रम करणार.ही त्याची 169 वी कसोटी. या पूर्वीचा विक्रम स्टीव्ह वॉ याच्या नावावर होता (168 कसोटी )
      • लिअँडर पेसनंतर जागतिक टेनिस रँकिंगच्या अव्वल शंभरात प्रवेश करण्याचा पराक्रम करणारा सोमदेव देववर्मन पहिला भारतीय ठरला. 96 वे स्थान त्याला मिळाले.
      • चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यास शासनाची मान्यता- मुख्यालय गडचिरोली येथे .
      • चतुरंग पुरस्कारासाठी निवड झाल्येल्या भारतीय नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी `आयएनएसव्ही म्हादेई` या शिडाच्या छोट्या, परंतु अत्याधुनिक नौकेतून जगभराची सागरी परिक्रमा २७६ दिवसात यशस्वीरीत्या पूर्ण केली होती.
      • बर्लिन येथील आठव्या आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला स्पर्धेत प्रख्यात भारतीय कलाकार सुदर्शन पटनाईक यांना  प्रथम क्रमांक - जागतिक तापमानवाढीचे परिणाम दाखविणारे शिल्प.
      • राज्यातील पशुधनाची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्र ऍनिमल आयडेंटिफिकेशन ऍण्ड रेकॉर्डिंग ऍथॉरिटी'ची (मैरा) ची स्थापना केली आहे 
      • आगामी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा शुभंकर असलेल्या हत्तीला 'स्टम्पी' नाव मिळाले. (1982 आशियाड चा शुभंकर हि 'अप्पू' नावाचा हत्तीच होता. ) 
      •  लष्करातील महिला अधिकाऱ्यांना 'शिक्षण ' आणि 'न्याय- विधी ' विभागात कायमस्वरूपी नियुक्ती (पर्मनंट कमिशन) देणार.

       Monday, August 2, 2010

       इतर काही महत्त्वपूर्ण घडामोडी

       • राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांतून विद्यार्थी आणि शिक्षक यांची बायोमेट्रीक सिस्टीमच्या सहाय्याने हजेरी ठेवली जाणार आहे.
                राज्यात १ हजार १०० आश्रमशाळा आहेत.-दिवसातून तीन वेळा बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार.
       • 'महाराष्ट्र शासनाचा स्वतंत्र मराठी भाषा विभाग' स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली

       • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना डिसेंबर २०१० पर्यंत राज्यात पूर्ण करणार.
       • कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक असलेली ८६५ गावे महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्या संबंधीचा वादही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित. या प्रश्नासंबंधीचा महाजन समितीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेला नाही.

       • बाभळी बंधारा गोदावरी नदीवर नांदेड पासून ८३ कि.मी.अंतरावर प्रस्तावित आहे.बाभळी बंधार्‍याचे बांधकाम पोचमपाड धरणाच्या पश्चजलाच्या क्षेत्रामध्ये (Back Water) येत असल्यामुळे महाराष्ट्र दि. गोदावरी पाणी तंटा लवाद कराराचा भंग करत आहे असा आक्षेप आंध्रप्रदेश शासनाने घेतला आहे.

       • वर्धा जिल्ह्यात सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा प्रादूर्भाव झाला आहे.
       • विधान परिषदेच्या उपसभापतीपदी वसंत डावखरे यांची बिनविरोध निवड
       विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख
       राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरीश बापट
       •     संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमात महिला बचत गटांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय
        - २०१०-१५ या पाच वर्षात विशेषकृती कार्यक्रम राबविण्याचा राज्य शासनाचा निर्णय

       चालू घडामोडी 2 ऑगस्ट 2010

       • दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना "लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार' प्रदान .
                   - दरवर्षी हा पुरस्कार लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी (1 ऑगस्ट) ला दिला जातो.
       • ईशान्य चीनमध्ये जिलीन प्रांताला पुराचा तडाखा
       • नागपूरचा अनिरुद्ध जोशी झी मराठी वाहिनीच्या "सारेगमप'चा महाविजेता
       • अरुणाचल प्रदेशात बोडो अतिरेक्‍यांनी पळवून नेलेले पुण्यातील वरिष्ठ वन अधिकारी विलास बर्डेकर यांची तब्बल 81 दिवसांनंतर रविवारी सुटका
       • जयपूरच्या जगप्रसिद्ध "जंतर मंतर' या वास्तूचा समावेश UNESCO च्या जागतिक वारसा वास्तूंमध्ये
        - जागतिक वारसा वास्तूंमध्ये समावेश होणारी ही भारतातील 28 वी तर राजस्थानातील दुसरी site .
        - 1727 ते 1734 (18 व्या शतकात ) या काळात महाराज जयसिंग (दुसरे) यांनी जंतर मंतरची निर्मिती केली.
        -भारतात एकूण 28 sites -पैकी 23 सांस्कृतिक तर 5 नैसर्गिक.
                  -1983  ला सर्वप्रथम आग्रा फोर्ट आणि अजंठा लेणी यांचा समावेश झाला.
                  - महाराष्ट्रात 4  sites आहेत.
       १. अजंठा लेणी
       २. वेरूळ लेणी
       ३. एलेफंटा गुहा (घारापुरी लेणी ); मुंबई जवळ
       ४. छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे विक्टोरिया टर्मिनस) मुंबई
       • ऊर्जा क्षेत्रासाठी स्वतंत्र  पॅनल-
       ऊर्जा क्षेत्रातील प्रेषण आणि वितरण यासाठी दरवर्षी ४० हजार कोटी रुपये नुकसान होते,
       असे आढळून आल्यानंतर माजी कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल व्ही. के. शुंग्लू
       यांच्या नेतृत्वाखाली पॅनल स्थापन.
       • नक्षलग्रस्त भागांत जनगणनेसाठी विशेष उपक्रम- देशातील महा-जनगणना म्हणून ओळखल्या गेलेल्या २०१०-११च्या जनगणनेत नक्षलग्रस्त भागांतील फक्त ५० टक्के लोकांनीच त्यांचे नाव नोंदवून आपल्याबाबतची माहिती जमा केली आहे. अशा लोकांची नोंदणी आणि गणना करण्यासाठी सरकार पुन्हा एकदा या भागांत जनगणना मोहीम राबवणार आहे.
       • राज्यातील वन व्यवस्थापनाची जबाबदारी आता महिला बचत गटांवर सोपविण्यात येणार. राज्यातील ११ जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे.

       जुलै 2010 महत्त्वपूर्ण घडामोडी (राष्ट्रीय)

       • युनियन कॅबिनेट कडून 'नालंदा युनिव्हरसिटी बिल २०१०' संमत. या अंतर्गत 1005 कोटी रु. खर्च करून बिहार मधील राजगिर येथील प्राचीन मुळ नालंदा विद्यापिठाशेजारी नवीन नालंदा विद्यापीठ तयार केले जाईल.

       Sunday, August 1, 2010

       चालू घडामोडी 1 ऑगस्ट 2010

       • राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी  मंत्रिमंडळ सचिव श्री. चंद्रशेखर करणार.
       • सुभाष अग्रवाल यांना द्रोणाचार्य पुरस्कार  -  जागतिक बिलियर्डस विजेते आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक 
       • पाकिस्तानात खैबर - पख्तुनाख्वा , पंजाब अणि पाक-व्याप्त पाकिस्तान आदि  प्रांतात पुराचे थैमान. बळींची संख्या 800+. 
       • कोकणी साहित्यिक रविन्द्र केळेकर यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कार प्रदान. - गोव्याला प्रथमच ' ज्ञानपीठ' सन्मान.
       • नुकतेच निधन पावलेले हिंदकेसरी मल्ल मारुती माने यांचे राज्य सरकार कवठेपिरान (ता. मिरज जि. सांगली ) येथे स्मारक उभारणार.
       • 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात होणार. स्वागताध्यक्ष पदी ठाण्याचे महापौर श्री. अशोक वैती. 83 वे संमेलन पुण्यात पर पडले.
       • साहित्यिक, समीक्षक  सा.ह. देशपांडे यांचे निधन. -त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित "अमृतसिदधी" हा द्विखंडात्मक ग्रंथ संपादित केला.
       • ‘मल्याळा मनोरमा’चे मुख्य संपादक के.एम.मॅथ्यू कालवश.
       •  कमांडर दोंदे यांना चतुरंग पुरस्कार-चतुरंगचा 'अभिमानमूर्ती' पुरस्कार जाहीर
       •  चर्चेतील पुस्तके -  
        1. ‘जीना अ‍ॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ लेखक -ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी 
        2. ‘जीना- इंडिया पार्टीशन इंडेपेन्डस' लेखक -जसवंतसिंग
         

       Follow us by Email Absolutely FREE

       Share for Care

       आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
       You can share the links to this blog.

       हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत