Wednesday 8 May 2013

प्रश्नमंजुषा - 08 मे 2013


प्रश्नमंजुषा -370

1. सांस्कृतिक स‍द्‌भावनेसाठी दिला जाणाऱ्या पहिल्या टागोर पुरस्काराने कोणास सन्मानित केले गेले ?

A. पंडित रविशंकर
B. इला भट
C. मोहन धारिया
D. अरविंद केजरीवाल

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. पंडित रविशंकर
2. 2012 च्या साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ह्या पुरस्काराने कोणत्या मराठी दिग्दर्शकाला गौरविण्यात आले ?

A. शिवाजी लोटन पाटील
B. महेश मांजरेकर
C. महेश कोठारे
D. जब्बार पटेल

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. शिवाजी लोटन पाटील
3. श्रीलंकेकडून भारतीय मच्छिमारांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने चार दशकांपूर्वी श्रीलंकेला दिलेले कोणते बेट परत ताब्यात घ्यावे, अशी केंद्र सरकारकडे मागणी करणारा दुसरा ठराव अलीकडेच तामिळनाडू विधानसभेमध्ये संमत करण्यात आला?

A. कच्छथिवू बेट
B. डिएगो गार्सिया
C. कवरत्ती
D. ग्वादर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. कच्छथिवू बेट
4. ‘मानवी संगणक’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणत्या गणितज्ञ महिलेचे नुकतेच निधन झाले ?

A. सरस्वती देवी
B. शारदा देवी
C. शकुंतला देवी
D. सारजा देवी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. शकुंतला देवी

स्पष्टीकरण :संगणकापेक्षाही वेगाने गणिताचे कोडे चुटकीसरशी तोंडी सोडविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि त्यामुळेच ‘मानवी संगणक’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या शकुंतला देवी यांचे निधन झाले. त्या ८0 वर्षांच्या होत्या.
गणिते कमालीच्या वेगाने सोडविण्याच्या अतुलनीय क्षमतेमुळे जागतिक विक्रमांच्या गिनीज बुकात त्यांची नोंद झाली होती.
‘फन विथ नंबर्स’, ‘अँस्ट्रॉलॉजी फॉर यू’, ‘पझल टू पझल यू’, ‘मॅथब्लिट’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
1977 मध्ये त्यांनी 201 अंकी आकड्याचे 23 वे वर्गमूळ कागद-पेन न वापरता काढून दाखवले होते. पण अशा अनेकानेक चमत्कारांपेक्षाही त्यांनी गणिताच्या प्रसाराला लावलेला हातभार अधिक मोलाचा होता
5. आर.पी. गोएंका यांचे अलीकडे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते ?

A. सनदी अधिकारी
B. शिक्षणतज्ञ
C. उद्योगपती
D. राजकीय मुत्सद्दी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. उद्योगपती

स्पष्टीकरण :वीजनिर्मितीपासून जगण्याला ऊर्जा देणार्‍या संगीतापर्यंत सर्व क्षेत्रात औद्योगिक दबदबा निर्माण करणारे आरपीजी समूहाचे संस्थापक उद्योगपती राम प्रसाद तथा आर.पी. गोएंका यांचे कोलकाता येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ३१ हजार कोटी रुपयांचे व्यावसायिक साम्राज्य सोडून गेलेले गोएंका वृद्धापकाळातील आजारांनी ग्रस्त होते. फिक्की तसेच सीआयआयसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अनेक वर्षे आयआयटी-कानपूरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. २000 ते २00६ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते.
6. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) अध्यक्षपद कोणाकडे आहे ?

A. शरद यादव
B. पी.सी.चाको
C. सुषमा स्वराज
D. प्रभाकर संझगिरी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. पी. सी. चाको
7. साहित्यविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ 2012 सालासाठी 86 वर्षीय साहित्यिक डॉ. रावुरी भारद्वाज यांना अलीकडेच जाहीर झाला. ते कोणत्या भाषेतील ख्यातनाम साहित्यिक आहेत ?

A. हिंदी
B. बंगाली
C. तेलगु
D. कन्नड

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. तेलगु

स्पष्टीकरण : 86 वर्षीय या साहित्यकाराच्या 37 लघुकथा आणि 17 कादंबर्‍या आहेत.
केवळ आठवी पर्यंत शिक्षण झालेल्या या प्रतिभावंत लेखकाची पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत.
8. कोणता अणू ऊर्जा प्रकल्प पूर्ण सुरक्षित असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला आहे परिणामी अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ?

A. जैतापूर
B. कैगा
C. काक्रापार
D. कुडनकुलम

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. कुडनकुलम

स्पष्टीकरण : तामिळनाडूतील कुडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्प पूर्ण सुरक्षित असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून असून कोकणातील जैतापूर प्रकल्प पुढे रेटण्यासाठीही सरकारची बाजू भक्कम झाली आहे.
9. बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कडक उपाययोजना सुचविचारे कोणत्या माजी सरन्यायाधीशांचे अलीकडेच देहावसान झाले ?

A. न्या.अजितनाथ राय
B. न्या.मिर्झा बेग
C. न्या.रघुनंदन पाठक
D. न्या.जे.एस.वर्मा

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. न्या.जे.एस.वर्मा

स्पष्टीकरण :बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कडक उपाययोजना सुचविचारे माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. वर्मा यांचे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर बलात्कार विरोधी कायदा कडक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे न्या. वर्मा अध्यक्ष होते. त्यांनी या कायद्यासाठी फाशीच्या शिक्षेसह अनेक कडक उपाययोजना सुचविल्या होत्या. याशिवाय ते न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अँथॉरिटीचेही चेअरमन होते.
10. जागतिक बँकेच्या भारताच्या विकासाबाबतच्या ताज्या माहितीत 2013-14 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर किती राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ?

A. 4.1 %
B. 5.1 %
C. 6.1 %
D. 7.1 %

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. 6.1 %
----------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------