भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-9


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.

1. पक्षांतर कायद्या संबंधीची घटना दुरुस्ती कोणती ?

A. 61 वी घटनादुरुस्ती
B. 91 वी घटनादुरुस्ती
C. 42 वी घटनादुरुस्ती
D. 24 वी घटनादुरुस्ती


Click for answer

B. 91 वी घटनादुरुस्ती

2. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची निर्मिती होते ?

A. कलम 256
B. कलम 280
C. कलम 119
D. कलम 360


Click for answer

B. कलम 280

3. भारताचे महानियंत्रक आणि महालेखानिरीक्षक यांच्याकडे एक राज्य वगळता सर्व राज्यातील राज्य सरकारच्या खात्यांची देखभाल सोपविण्यात आली आहे. कोणत्या एका राज्याचा यामध्ये समावेश नाही ?

A. सिक्कीम
B. गोवा
C. अरुणाचल प्रदेश
D. मिझोराम


Click for answer

A. सिक्कीम

4. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींची संख्या किती ?

A. 20
B. 23
C. 15
D. 19


Click for answer

D. 19

5. भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदार असतात ?

A. लोकसभेचे निर्वाचित सदस्य
B. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
C. विधानसभेचे निर्वाचित सदस्य
D. वरील सर्वच


Click for answer

D. वरील सर्वच

6. सनदी सेवकांना __________________ बनण्याची परवानगी नाही.

A. संसद सदस्य
B. मुख्य निर्वाचन आयुक्त
C. विद्यापीठाचे कुलगुरू
D. चौकशी आयोगाचे प्रमुख


Click for answer

A. संसद सदस्य

7. आपल्या राज्यघटनेतील सत्तेच्या विभागणीमुळे ______________________ निर्माण झाले आहे.

A. समर्थ केंद्रशासन
B. दुबळे केंद्रशासन
C. समर्थ केंद्र शासन व समर्थ घटक राज्ये
D. दुबळे केंद्रशासन व दुबळी घटक राज्ये


Click for answer

A. समर्थ केंद्रशासन

8. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण आहे ?

A. भारतीय संसद
B. राष्ट्रपती
C. भारताचे सर्वोच्च न्यायालय
D. वरील सर्व


Click for answer

C. भारताचे सर्वोच्च न्यायालय

9. भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे ?

A. कलम 227
B. कलम 368
C. कलम 370
D. कलम 352


Click for answer

B. कलम 368

10. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान खालीलपैकी कोण भूषवितो ?

A. राज्यसभा अध्यक्ष
B. लोकसभेचे सभापती
C. पंतप्रधान
D. भारताचे राष्ट्रपती


Click for answer

B. लोकसभेचे सभापती