भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-8


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती या अभ्यास घटकावर आधारित.

1. राज्य शासनाला कायदे विषयक बाबींवर सल्ला देण्याचे काम खालील पैकी कोणाचे असते ?

A. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
B. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
C. महान्यायवादी
D. महाधिवक्ता


Click for answer

D. महाधिवक्ता

2. भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी कोण ?

A. महाधिवक्ता
B. महान्यायवादी
C. कायदामंत्री
D. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश


Click for answer

B. महान्यायवादी

3. भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली कशास म्हणतात ?

A. घटनेचा सरनामा
B. राज्याची मार्गदर्शक तत्वे
C. मूलभूत हक्कांविषयी कलमे
D. घटनात्मक संरक्षण उपायाची कलमे


Click for answer

A. घटनेचा सरनामा

4. नियंत्रक आणि महालेखापाल यांची नेमणूक कोणाव्दारे करण्यात येते ?

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. अर्थमंत्री
D. विरोधी पक्षनेते


Click for answer

A. राष्ट्रपती

5. राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो ?

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. संसदीय कामकाजमंत्री
D. महसूलमंत्री


Click for answer

B. मुख्यमंत्री

6. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणासमोर शपथ घ्यावी लागते ?

A. राज्यपाल
B. मुख्य न्यायमूर्ती
C. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
D. राज्याचे महाधिवक्ता


Click for answer

A. राज्यपाल

7. राज्याचे अंदाजपत्रक कोणत्या सभागृहात मांडले जाते ?

A. लोकसभा
B. राज्यसभा
C. विधानसभा
D. विधान परिषद


Click for answer

C. विधानसभा

8. बालकामगार अधिनियम 1986 नुसार किती वर्षांखालील वयाच्या मुलांचा बाल कामगार म्हणून उल्लेख होतो ?

A. 10 वर्षे
B. 12 वर्षे
C. 14 वर्षे
D. 18 वर्षे


Click for answer

C. 14 वर्षे

9. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे ?

A. 2 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे
D. 6 वर्षे


Click for answer

D. 6 वर्षे

10. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वात संस्था कोणती ?

A. संसद
B. सर्वोच्च न्यायालय
C. विधी मंत्रालय
D. महान्यायवादी


Click for answer

A. संसद