चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018


मे 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. राष्ट्रपिता म. गांधीजी यांना दक्षिण आफ्रिकेत ‘केवळ गौरवर्णीयासाठी राखीव असलेल्या रेल्वे डब्यातून खाली उतरविण्यात आले होते त्या घटनेला येत्या 7 जून रोजी किती वर्षे पूर्ण होत आहेत ?

A. 75 वर्षे
B. 100 वर्षे
C. 125 वर्षे
D. 150 वर्षे


Click for answer

C. 125 वर्षे

राष्ट्रपिता म. गांधीजी यांना दक्षिण आफ्रिकेत 'केवळ गौरवर्णीयासाठी' राखीव असलेल्या रेल्वे डब्यातून खाली उतरविण्यात आले होते त्या घटनेला 125 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील राजकीय नेत्यांसह 300 मान्यवर सुषमा स्वराज यांच्यासह पेन्ट्रिच स्थानक ते पीटरमारित्झबर्ग स्थानक असा प्रतीकात्मक प्रवास करणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील भारतीय उच्चायुक्त रुचिरा कम्बोज.

2. "मॅक्स थंडर" हा कोणत्या देशांच्या हवाई दलाचा संयुक्त लष्करी सराव अलीकडेच चर्चेत होता ?

A. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया
B. अमेरिका आणि दक्षिण कोरिया
C. जपान आणि दक्षिण कोरिया
D. चीन आणि जपान


Click for answer

B. अमेरिका आणि दक्षिण कोरिया

परस्परांचे शेजारी आणि पक्के वैरी असणारे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांदरम्यान होणारी उच्चस्तरीय बैठक उत्तर कोरियाने रद्द केल्याचे वृत्त आहे. यामागे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये होणाऱ्या 'मॅक्स थंडर' या दोन्ही देशांच्या हवाई दलाचा संयुक्त लष्करी सराव कारणीभूत मानले जात आहे.

3. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री पदाचा पदभार कोणाकडे सुपूर्त करण्यात आला आहे ?

A. स्मृती इराणी
B. प्रकाश जावडेकर
C. अरूण जेटली
D. राज्यवर्धन राठोड


Click for answer

D. राज्यवर्धन राठोड

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचे खाते काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी राज्यवर्धन राठोड यांची वर्णी लागली आहे. राज्यवर्धन राठोड हे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत. त्यांची वर्णी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रीपदी लागली आहे. त्यांच्याकडे क्रीडा खात्यासह माहिती आणि प्रसारण खात्याचा पदभार देण्यात आला आहे.

तर स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खातेच राहणार आहे.

याशिवाय, राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांना बढती देण्यात आली आहे. पेयजल व स्वच्छता या खात्याच्या कार्यभारातून त्यांना मुक्त करण्यात आले असून, माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

अल्फॉन्स कन्ननथनम यांच्याकडील इलेक्‍ट्रॉनिक्‍स खाते काढून घेण्यात आले असून, ते आता केवळ पर्यटन मंत्री असतील.

4. अर्थमंत्री अरूण जेटलींकडून अर्थ खाते तात्पुरते काढण्यात आले असून अर्थ खात्याची जबाबदारी तूर्तास कोणाकडे देण्यात आली आहे ?

A. नितीन गडकरी
B. निर्मला सितारामन
C. पियुष गोयल
D. प्रकाश जावडेकर


Click for answer

C. पियुष गोयल

अर्थमंत्री अरूण जेटलींकडून अर्थ खाते तात्पुरते काढण्यात आले असून अर्थ खात्याची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत पियुष गोयल सांभाळणार आहेत. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेले जेटली मागील एक महिन्यांपासून डायलिसिसवर आहेत. त्याचमुळे अर्थ खात्याची जबाबदारी आता रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत पियुष गोयल अर्थ खात्याचा पदभार सांभाळतील.

5. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली ?

A. शरद पवार
B. शशांक मनोहर
C. रवी शास्त्री
D. सौरभ गांगुली


Click for answer

B. शशांक मनोहर

आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. 2016 साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती, यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.

6. पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू मन्सूर अहमद यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या खेळाशी सबंधित होते ?

A. क्रिकेट
B. हॉकी
C. फुटबॉल
D. कुस्ती


Click for answer

B. हॉकी

हृदय प्रत्यारोपणासाठी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी करणारे पाकिस्तानचे माजी दिग्गज हॉकी खेळाडू मन्सूर अहमद यांचे नुकतेच निधन झालं. 1994 मध्ये पाकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा राहिलेले मन्सूर अहमद उपचारासाठी भारताकडे विनंती केली होती.

7. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’त यंदा देशभरातील शहरांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराने पटकावला ?

A. भोपाळ
B. मुंबई
C. परभणी
D. इंदूर


Click for answer

D. इंदूर

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’त यंदा देशभरातील शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूरने प्रथम, भोपाळने दुसरा क्रमांक, तर चंदिगडने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तर राज्यांच्या राजधान्यांच्या श्रेणीमध्ये मुंबईने आघाडीचे स्थान मिळविले आहे.

भारतातील मोठय़ा स्वच्छ शहराचा मान आध्र प्रदेशमधील विजयवाडा शहराला मिळाला आहे.

नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद देणाऱ्या शहरांमध्ये राजस्थानमधील कोटा, महाराष्ट्रातील परभणीने, नावीन्यपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट कृती श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील नागपूरने आणि गोव्यातील पणजीने, तर सौर ऊर्जा व्यवस्थापन श्रेणीत नवी मुंबई, तिरुपतीने आघाडीचे स्थान पटकावले आहे.

8. जागतिक संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो ?

A. 2 मे
B. 8 मे
C. 12 मे
D. 18 मे


Click for answer

D. 18 मे

9. गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये निघालेली सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली कोणती शिडाची बोट जगभ्रमंती करुन येत्या सोमवारी 21 मे रोजी गोव्यात परतणार आहे ?

A. आयएनएसव्ही तारीणी
B. आयएनएसव्ही म्हादेई
C. आयएनएसव्ही कदाम्बिनी
D. आयएनएसव्ही भवानी


Click for answer

A. आयएनएसव्ही तारीणी

या प्रवासात महिला नौदल अधिकारी 21600 सागरी मैल अंतर पार करणार आहेत. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलाच प्रयत्न असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. महिला अधिकाऱ्यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.

आयएनएसव्ही चे पूर्ण रूप= "Indian Navy sailing vessel"

10. लोकपाल निवड समितीमध्ये नुकतीच कोणाची ख्यातनाम विधिज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे ?

A. मुकुल रोहतगी
B. टी आर अंध्यारुजिना
C. राम जेठमलानी
D. श्रीहरी अणे


Click for answer

A. मुकुल रोहतगी

लोकपाल निवड समितीमध्ये ख्यातनाम विधिज्ञाबरोबर, भारताचे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता, लोकसभेच्या सभापती अशा सदस्यांचा समावेश असतो.

यापुर्वी ख्यातनाम विधिज्ञ या पदावर असणारे पी. पी. राव यांचे 11 सप्टेंबर 2017 रोजी निधन झाल्याने ते पद रिक्त होते. हे पद रिक्त असल्यामुळे लोकपाल निवडीसाठी विलंब होत होता.

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सत्तेत आल्यानंतर 2014 साली रोहतगी यांची नेमणूक महान्य़ायवादी (अॅटर्नी जनरल) पदावर करण्यात आली होती. मात्र जून 2017मध्ये रोहतगी यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 ते 18 मे 2018