चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 ते 16 मे 2018


एप्रिल-मे 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. भारतातील घटकराज्याचे सर्वाधीक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा बहुमान पवनकुमार चामलिंग यांनी मिळवला आहे. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

A. मणिपूर
B. मिझोरम
C. सिक्कीम
D. अरुणाचल प्रदेश


Click for answer

C. सिक्कीम

ते सिक्किम राज्याचे गेली 23 वर्षे 5 महिने इतका प्रदीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत. 16 मे 1975 साली सिक्किमचा भारतात 22वे राज्य म्हणून समावेश झाला. चामलिंग यांनी सलग पाच निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता.

29 एप्रिल रोजी त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला. त्या आधी मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहाण्याचा विक्रम ज्योती बसू यांच्या नावावर होता.

सिक्किम राज्याच्या गेल्या 43 वर्षांमध्ये 23 वर्षे एकट्या चामलिंग यांनीच मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.

सिक्किमची लोकसंख्या केवळ 6 लाख इतकी असून लवकरच या राज्यातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन होत असून त्याबरोबर 44 किमीचा रेल्वेमार्गही येत आहे. 2008 मध्येच उघड्यावर शौच करण्याची प्रथा बंद करणारे सिक्किम हे पहिले राज्य बनले. 15 वर्षांपुर्वी सिक्किमने राज्यामध्ये रासायनिक खते आणि रसायने वापरण्यावर बंदी घातली त्यामुळे आज सिक्किम पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे राज्य बनले आहे. सिक्किममध्ये चामलिंग सरकारने सर्व नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के राखीव जागा टेवल्या असून सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

2. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी मुक्तिनाथ मंदिरात पुजा केल्याने ते मंदिर चर्चेत होते. बौद्ध व हिंदुधर्मीयांसाठी सारखेच पवित्र क्षेत्रअसणाऱ्या ह्या मंदिरात प्रार्थना करणारे मोदी हे पहिलेच जागतिक नेते ठरले आहेत. मुक्तिनाथ मंदिर कोणत्या देशात आहे ?

A. भारत
B. नेपाळ
C. थायलंड
D. भूतान


Click for answer

B. नेपाळ

मुक्तिनाथ मंदिर हे 12172 फूट उंचीवर असून, ते भारत व नेपाळ यांच्यातील मोठा सांस्कृतिक दुवा आहे. या मंदिरात मानवी आकाराची विष्णूची सोन्याची मूर्ती असून तेथे मोदी यांनी प्रार्थना केली. मुक्तिनाथ मंदिर हे हिंदू व बौद्ध यांचे पवित्र क्षेत्र असून, ते मुक्तिनाथ खोऱ्यात आहे.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू असलेल्या नेपाळ दौऱ्यात कोणत्या बसमार्गांचे उद्घाटन केले ?

A. काठमांडू- गया
B. जनकपूर- अयोध्या
C. बिराटनगर- दिल्ली
D. पोखरणा- हरीव्दार


Click for answer

B. जनकपूर- अयोध्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा नेपाळ दौरा शुक्रवारपासून सुरू झाला असून, तिथे पोहोचल्यावर मोदी यांनी सीतेचे माहेर असलेल्या जनकपूरहून तिचे सासर असलेल्या अयोध्येला जाण्यासाठी विशेष बससेवेचे उद्घाटन केले. या भेटीत मोदी व नेपाळचे पंतप्रधान ओली 900 मेगावॅटच्या अरुण-३ वीज प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पामुळे दोन्ही देशांना वीज मिळेल.

4. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची पाउल असलेले, रेल्वेमध्ये विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्स असलेल्या रेल्वेच्या डब्यांचं अनावरण नुकतेच कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

A. नवी दिल्ली
B. सिकंदराबाद
C. रायबरेली
D. कोलकाता


Click for answer

C. रायबरेली

5. दीपिकाकुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. बुध्दिबळ
B. तिरंदाजी
C. कुस्ती
D. बॅडमिंटन


Click for answer

B. तिरंदाजी

तिच्यावरील 'लेडीज फर्स्ट' ही डॉक्‍युमेंटरी चांगलीच लोकप्रिय आहे. तिला निर्माते सुरेश सेठ भगत आणि दिग्दर्शक मनीष सिन्हा यांनी "बिसाही' या चित्रपटासाठी करारबद्ध केले होते. या चित्रपटात तिची प्रमुख भूमिका होती. तथापि तिने ऑलिंपिक पूर्वतयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटात काम करण्याचा करार रद्द केला आहे.

6. पुढील महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व कोणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे ?

A. महेंद्रसिंग धोणी
B. अजिंक्‍य रहाणे
C. विराट कोहली
D. सुरेश रैना


Click for answer

B.अजिंक्‍य रहाणे

इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करणार आहे.

7. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. शशी थरूर यांनी कॉंग्रेसच्या कार्यकाळात केंद्रात कोणत्या पदावर काम केले ?

A. राज्यमंत्री, मानव संसाधन विकास
B. राज्यमंत्री, परराष्ट्र व्यवहार
C. A आणि B
D. वरीलपैकी कोणतेही नाही


Click for answer

C. A आणि B

8. अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था 2020 मध्ये मंगळावर लहान हेलिकॉप्टर पाठवणार असून ते निर्मनुष्य ड्रोन सारखे असणार आहे. मंगळाच्या संशोधनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. ह्या उपकरणाचे नाव काय असणार आहे ?

A. दी मार्स हेलिकॉप्टर
B. दि. मार्स लॅण्ड रोव्हर
C. फिनिक्स
D. पाथफायंडर


Click for answer

A. दी मार्स हेलिकॉप्टर

9. ‘मिशन शौर्य’अंतर्गत कोणत्या जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर केले ?

A. नंदुरबार
B. अमरावती
C. चंद्रपूर
D. गडचिरोली


Click for answer

C. चंद्रपूर

मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूर, जिल्हा प्रशासन चंद्रपूर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत ‘मिशन शौर्य’ची आखणी केली होती.

10. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा कोणता पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे ?

A. जनता दल युनायटेड
B. जनता दल सेक्यूलर
C. राष्ट्रीय जनता दल
D. जन मोर्चा


Click for answer

B. जनता दल सेक्यूलर