चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 4 जानेवारी 2016


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. ' अॅपल ' कंपनीच्या ' सीओओ ' ( चीफ ऑपरेटिंग ऑफीसर ) पदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? mpsc-state-service-2016

A. टीम कुक
B. जेफ विल्यम्स
C. फिल शिलर
D. जॉनी स्त्रॉजी


Click for answer

B. जेफ विल्यम्स
2. भारत कोणत्या देशाकडून एस - 400 ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे विकत घेणार आहे ?

A. चीन
B. इस्त्राइल
C. रशिया
D. अमेरीका


Click for answer

C. रशिया
3. ' ग्लोबलायझेशन अॅण्ड कॉम्पिटीशन : दी न्यू वर्ल्ड ऑफ सिटीज ' या अहवालानुसार भारतातले कोणते शहर हे जगातले चौथे उदयोन्मुख शहर ठरले आहे ?

A. बेंगळूरू
B. मुंबई
C. दिल्ली
D. हैद्राबाद


Click for answer

B. मुंबई

या सर्वेक्षणानुसार शांघाय , बिजींग आणि दुबईनंतर मुंबई हे व्यापाराच्या दृष्टीने जगातील चौथे शहर ठरले आहे .
4 . नुकतेच कोणत्या स्वातंत्र्यसैनिकास लंडनच्या ऑनरेबल सोसायटी ऑफ इनर टेम्पल द्वारा पुन्हा मरणोत्तर बहाल करण्यात आलेले ' बार ' प्रमाणपत्र पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना सूपूर्त केले ?

A. सरदार वल्लभभाई पटेल
B. विठ्ठलभाई पटेल
C. श्यामजी कृष्ण वर्मा
D. राशबिहारी बोस


Click for answer

C. श्यामजी कृष्ण वर्मा
5 . नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे एनओएए या संस्थेने त्यांच्या मासिक अहवालात नमूद केल्यानुसार खालीलपैकी कोणता महिना गेल्या 136 वर्षांतला सर्वात उष्ण ठरला आहे ?

A. जानेवारी 2015
B. जून 2015
C. ऑगस्ट 2015
D. नोव्हेंबर 2015


Click for answer

D. नोव्हेंबर 2015
6. भूतानमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. पवन वर्मा
B. दलिप मेहता
C. सुधीर व्यास
D. जयदीप सरकार


Click for answer

D. जयदीप सरकार