चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 8 जानेवारी 2016


सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. कसोटी, एकदिवसीय व टी-20 क्रिकेट सामने एकत्रित केल्यानंतर कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 1000 शतक झळकवणारी पहिला संघ हा मान पटकावला ?

A. भारत
B. ऑस्ट्रेलिया
C. दक्षिण आफ्रीका
D. पाकीस्तान


Click for answer

B. ऑस्ट्रेलिया
2. बीसीसीआय ( BCCI) चा यावर्षीचा सीके नायडू पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ? bcci

A. सुनिल गावसकर
B. रवी शास्त्री
C. सैय्यद किरमाणी
D. चंदू बोर्डे


Click for answer

C. सैय्यद किरमाणी
3. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले ?

A. नेपाळ
B. इराक
C. सौदी अरेबिया
D. अफगाणिस्तान


Click for answer

D. अफगाणिस्तान
4 . मार्च 2016 पर्यंत कोणते राज्य वगळता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी अन्नसुरक्षा कायदा लागू करण्याची तयारी दर्शविली आहे ?

A. तेलंगणा
B. तामिळनाडू
C. आसाम
D. राजस्थान


Click for answer

B. तामिळनाडू
5 . खालीलपैकी कोणत्या उद्योगसमूहाने 370 कोटी रूपयांना इटलीची पिनिनफॅरीना ( Pininfarina ) कंपनी ताब्यात घेतली आहे ?

A. टाटा ग्रुप
B. महिंद्रा ग्रुप
C. बजाज ग्रुप
D. होंडा ग्रुप


Click for answer

B. महिंद्रा ग्रुप
6. खालीलपैकी कोणास केंद्र सरकारने योग रिसॉर्ट तयार करण्यासाठी बेट ( आइलँड ) देऊ केले आहे ?

A. श्री श्री रवी शंकर
B. बाबा रामदेव
C. स्वामी असिमानंद
D. स्वामी श्रध्दानंद


Click for answer

B. बाबा रामदेव