मिशन राज्यसेवा- 2016


हे विशेष पोस्ट आम्ही एक महत्त्वाच्या सूचनेकरीता अपलोड करीत आहोत.thank-you
सर्वप्रथम आमच्या वाचकांचे हार्दिक आभार. आम्ही गुगल प्ले स्टोअर वर आमचे APP नि:शुल्क उपलब्ध केल्यानंतर अवघ्या काही तासात आम्हालाही अनपेक्षित धक्का आपण दिलात. अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक मित्र-मैत्रिणींनी हे APP डाऊनलोड करून त्याचा वापर ही सुरु केला.
आम्हाला ह्या ठिकाणी विशेष आभार प्रकटन करायचे आहे ते - सरिता जांभूळकर, श्रीहरी उनवणे , निखील गायकवाड, शुभम हरीम्कर, संतोष मेमणे, राकेश सोनावणे, अभिजित पाटील, प्रताप ह्या मित्र-मैत्रिणींचे. त्यांनी प्लेस्टोअर वर लिहिलेल्या अभिप्रायामुळे आमचा काम करण्याचा उत्साह खूप वाढला. याशिवायही आम्ही आभार मानू इच्छितो त्या मित्रांचे ज्यांनी आमच्यासाठी खूप चांगले रेटींग्ज दिलेत.
आम्हाला आशा आहे, आमच्या उरलेल्या मित्रांकडूनही असेच अभिप्राय आम्हाला प्लेस्टोअर वर मिळतील.
अर्थात तुम्ही नेहमीप्रमाणे भरभरून दिलेत. मग आम्हीही काहीतरी करायला हवे ना?  आम्ही आपल्या ऋणात राहत एक घोषणा येथे फार गांभीर्यपूर्वक करू इच्छितो.
आतापासून हा ब्लॉग(APP) दिवसातून शक्य तितक्या वेळेस अपडेट करण्याचा प्रयत्न असेल. केवळ चालू घडामोडींपुरते मर्यादित न राहता आम्ही इतरही विषय घटक कक्षेत आणत आहोत. शिवाय मोबाईल APP वापरणारे वाचक हे प्राधान्यक्रमावर ठेवून त्यांना सुसह्य व्हावे इतक्या मर्यादित आकाराचे मात्र अतिशय महत्त्वाचे पोस्ट्स आम्ही टाकणे सुरु करत आहोत.
तेव्हा आपण हे APP डाऊनलोड केलेले नसल्यास खालील लिंक चा उपयोग करून ते करावे. (त्यासाठी कोणतेही शुल्क नाही)
https://play.google.com/store/apps/details?id=in.blogspot.mpsccurrent.mpsccurrent
आणि आता आम्ही येथे राज्यसेवा पूर्व परीक्षा-2016 नजरेसमोर ठेवून सुरु करत आहोत- ‘मिशन राज्यसेवा- 2016’
आपण आमच्या सोबत आहात ना ?