चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 10 जानेवारी 2016


सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( IMF ) ने अलीकडेच खालीलपैकी कोणत्या चलनास पाचव्या राखीव चलनाचा दर्जा दिला ? IMF

A. भारतीय रुपया
B. चीनी युआन
C. जर्मन फ्रँक
D. सिंगापूरी डॉलर


Click for answer

B. चीनी युआन

अमेरीकेचा डॉलर , युरोपीय समुदायाचा युरो , जपानचा येन , ब्रिटनचा पाउंड ही या आधीची चार राखीव चलने आहेत.
2. बिहारमधील नितीश सरकारने अलीकडेच सम्राट अशोकाची जन्म तारीख शोधून काढली असून त्याच दिवशी राज्यभर अशोक जयंती साजरी केली जाणार आहे . त्यांनी सम्राट अशोक जयंती कधी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. 23 जानेवारी
B. 14 एप्रिल
C. 5 सप्टेंबर
D. 6 डिसेंबर


Click for answer

B. 14 एप्रिल

विशेष म्हणजे याच दिवशी भारतरत्न डॉ . आंबेडकर यांचाही जन्मदिवस आहे .
3. राज्यातील कोणत्या पक्षी अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे ?

A. माळढोक पक्षी अभयारण्य
B. कर्नाळा पक्षी अभयारण्य
C. गौताळा पक्षी अभयारण्य
D. राधानगरी पक्षी अभयारण्य


Click for answer

A. माळढोक पक्षी अभयारण्य

माळढोक पक्षांची घटणारी संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशी आधारे हा निर्णय घेण्यात आला.
या अभयारण्याचे क्षेत्र 1229 चौ . कि .मी. वरून कमी करून 400 चौ . कि .मी. वर करण्यात येणार आहे.
मात्र , दर पन्नास एकराच्या पट्टयात माळढोक पक्षांसाठी विशेष गवताळ जमीन पट्टा विकसित करण्यात येणार आहे.
असे किमान दहा ते बारा पट्टे असतील .
लोकसहभागाशिवाय या पक्षांचे संवर्धन शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला .
4 . 1 जानेवारी 2016 पासून वार्षिक करपात्र उत्पन्न किती रकमेपेक्षा अधिक असलेल्या ग्राहकांना यापुढे घरगुती वापराच्या गॅसवर अनुदान ( सबसिडी ) न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ?

A. पाच लाख रुपये
B. दहा लाख रुपये
C. तीस लाख रुपये
D. एक कोटी रुपये


Click for answer

B. दहा लाख रुपये
5 . भारत कोणत्या देशासमावेत ' कामोव्ह - 22 टी ' हेलिकॉप्टर संयुक्तपणे निर्माण करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे ?

A. इस्त्राईल
B. रशिया
C. फ्रान्स
D. कॅनडा


Click for answer

B. रशिया
6. कोणत्या क्षेत्राच्या एकात्मिक विकास आणि व्यवस्थापनासाठी एक छत्री योजना नील - क्रांती योजना राबविण्यासाठी केंद्रीय मंत्री मंडळाने पाच वर्षात 3 हजार कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे ?

A. शेती
B. रेशीम किडे पालन
C. मौल्यवान धातू
D. मत्सोदयोग


Click for answer

D. मत्सोदयोग