संक्षिप्त चालू घडामोडी 6 जानेवारी 2016


 • पंजाब येथील पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माजी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू, सुभेदारfateh मेजर (निवृत्त) फतेह सिंग यांना वीरमरण आले.
  • त्यांनी 1995 मध्ये दिल्लीत झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकाविले होते.
  • फतेहसिंग हे ‘डिफेन्स सेक्युरिटी कोअर’मध्ये लष्करासाठी सेवा बजावत होते.


 • डॉ. के. पी. विश्वनाथ यांची येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कुलगुरुपदी निवड झाली.
  • ही नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे.
  • राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित केलेल्या निवड समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली होती.


 • मुंबईचे पोलिस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. ते लवकरच नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत.
  • त्या पदावर शासनाने दत्ता पडसळगीकर यांची नियुक्ती केली आहे.


 • प्रदूषण आणि गर्दीच्या समस्येवर उतारा म्हणून दिल्लीमध्ये राबविण्यात येत असलेल्या 'विषम-सम' वाहतुकीच्या प्रयोगाची अहमदाबादमध्येही पुनरावृत्ती करण्यात येणार आहे.

 • ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अर्धेंदू भूषण ऊर्फ ए. बी. बर्धन यांचे निधन झाले.
  • 1957 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले. परंतु, लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
  • त्यानंतर ते ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ या देशातील सर्वात जुन्या कामगार संघटनेचे सचिव व अध्यक्ष बनले.
  • 1990 मध्ये ते कम्युनिस्ट पक्षाचे उपसचिव बनले.
  • 1996 इंद्रजित गुप्त यांच्या जागी त्यांची पक्षाच्या सचिवपदावर नियुक्ती झाली.


 • 1 जानेवारी पासून केंद्र सरकारच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कामगारांची भरती करण्याच्या प्रक्रियेत मुलाखतीचा समावेश असणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.
 • पाकिस्तानी गायक आदनान सामी याला 1 जानेवारी पासून भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या विनंतीनुसार मानवतावादी दृष्टिकोनातून त्याला भारतीय नागरिकत्व देण्यात आले.
 • अतिशय वेगाने माहिती वाहून नेणारा मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात आला असून या प्रकल्पात राजेशकुमार या भारतीय वंशाच्या संशोधकाचा समावेश आहे.
 • सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाने घेतला आहे.