चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 6 जानेवारी 2016


  सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1 . पाकीस्तानातील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून केंद्र शासनाने कोणाची नियुक्ती केली आहे ? bambawale

A. विजय नांबीयार
B. गौतम बंबावाले
C. टी. सी . ए . राघवन
D. लक्ष्मीकांत झा


Click for answer

B. गौतम बंबावाले

बंबावाले हे पुण्याचे असून ते जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे .
2. ओआरबी इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेच्या क्रमवारीत पंतप्रधान मोदींना कितवे स्थान बहाल करण्यात आले आहे ?

A. पहिले
B. तिसरे
C. सातवे
D. तेरावे


Click for answer

C. सातवे
ओबामा ह्या यादीत अग्रभागी असून त्यानंतर एंजेला मार्केल आणि डेव्हीड कॅमरून यांना दुसरे व तिसरे स्थान देण्यात आले आहे .
3. " डीडीसीए " मधील कथित भ्रष्टाचारात केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे नाव आल्याने हे प्रकरण चर्चेत होते . या प्रकरणात दिल्ली राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन केला होता ?

A. गोपाल सुब्रहमण्यम
B. अरविंद सुब्रमण्यम
C. अरविंद पनगडिया
D. प्रशांत भूषण


Click for answer

A. गोपाल सुब्रहमण्यम
4 . केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्रजातीची देशातील एकूण संख्या तीनशे पेक्षा कमी आहे ?

A. फॉरेस्ट आउलेट ( घुबड )
B. इंडीयन वल्चर ( गिधाड )
C. पिंक हेडेड डक ( बदक )
D. द ग्रेट इंडीयन बस्टर्ड ( तिलोर पक्षी )


Click for answer

D. द ग्रेट इंडीयन बस्टर्ड ( तिलोर पक्षी )
5 . बराक - 8 क्षेपणास्त्राची भारताने नोव्हेंबर 2015 मध्ये यशस्वी चाचणी घेतली . हे क्षेपणास्त्र भारत कोणत्या देशाच्या भागीदारीत विकसित करत आहे ?

A. रशिया
B. अमेरीका
C. इस्त्राईल
D. जर्मनी


Click for answer

C. इस्त्राईल
6. ' नेल्सन इंडीया मार्केट ' च्या पाहणीनुसार ग्रंथ उद्योगात भारत कितव्या स्थानी आहे ?

A. पन्नासाव्या
B. सहाव्या
C. चाळीसाव्या
D. पहिल्या


Click for answer

B. सहाव्या