संक्षिप्त चालू घडामोडी 7 जानेवारी 2016


 • ब्रेल लिपीद्वारे दृष्टिहीनांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे लुई ब्रेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 4 जानेवारी 2016 रोजी "जागतिक ब्रेल दिवस" पाळण्यात आला.mpsc

 • म्हैसूर येथे 3 ते 7 जानेवारी 2016 या काळात 103 वे भारतीय सायन्स कॉंग्रेस सुरू आहे.

 • राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोचण्याची शक्‍यता लक्षात घेता माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) सर्व सरकारी अधिकाऱ्यांचे ई-मेल आयडी उघड केले जाऊ शकत नसल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे.

 • उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) आता दर महिन्याला उपग्रह सोडण्याचा विचार करीत आहे.
  • शिवाय, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी बंगळूरजवळील आयटी हबजवळील शंभर एकर जागेत  "स्पेस पार्क" उभारणार .
  • या ठिकाणी कंपन्यांना उपग्रह निर्मितीचे काम दिले जाईल आणि इस्रो त्यावर देखरेख ठेवेल.
  • सध्या या कंपन्या छोटे छोटे तुकडे करीत आहेत. मात्र, स्पेस पार्कमुळे या कंपन्यांना सर्व गोष्टी एकाच छताखालीच उपलब्ध होतील.

 • देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दोन्ही निमलष्करी दलांत कॉन्स्टेबल पदासाठीच्या 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार असून, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस दलामध्ये महिलांचा वाटा 15 टक्के असणार आहे.

 • 2016 हे वर्ष "एलपीजी ग्राहक वर्ष" म्हणून साजरे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • तसेच, 2018पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न.
  • एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 60 टक्के नागरिकांपर्यंत देशातील तेल कंपन्यांकडून एलपीजीचा पुरवठा केला जातो.
  • देशातील शंभर टक्के लोकसंख्येला एलपीजी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट
  • देशात सध्या 27 कोटी एलपीजी ग्राहक असून, त्यापैकी 16.5 कोटी सक्रिय ग्राहक आहेत.

 • सातत्याने वादात सापडणाऱ्या चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे म्हणजेच सेन्सॉर बोर्डाचे स्वरूप बदलून त्याचा "मेकओव्हर" करण्याबाबत केंद्र सरकारने विख्यात दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमण्याची घोषणा केली आहे. आगामी दोन महिन्यांत ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल.
 • देशातील सर्वांत मोठ्या चोरीचा अवघ्या दहा तासांत छडा लावल्याबद्दल दिल्ली पोलिसांच्या नावाची "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंद झाली आहे. नोव्हेंबरमध्ये 22 कोटी 50 लाख रुपये असलेल्या व्हॅनसह चालक बेपत्ता झाला होता. दहा तासांत पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.
 • देशातील शास्त्रज्ञांनी संशोधन करताना "पाच ई" म्हणजेच इकॉनॉमी, एन्व्हायर्न्मेंट, एनर्जी, एम्पथी आणि इक्विटीवर भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
 • उत्तर कोरियाकडून विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 • काळा पैसा आणि करचुकवेगिरीला आळा घाळण्यासाठी 50 हजारांपेशा अधिक रोखीचा व्यवहार करणाऱ्या प्रत्येकाला पॅनकार्ड नंबर देणे 1 जानेवारी 2016 पासून बंधनकारक होणार आहे.
 • शिवाय, दोन लाखांवरील अधिक रकमेच्या व्यवहारांना, तसेच स्थावर मालमत्तेतील दहा लाखांहून अधिक रकमेच्या व्यवहारांनाही पॅनकार्ड द्यावे लागणार आहे.
 • फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी हॉलिवूडच्या विज्ञान-तंत्रज्ञान पटात दाखवलेला असतो तसा व्यक्तिगत सेवक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्राने तयार करण्याचे ठरवले असून 2016 या वर्षांत त्यांनी ते व्यक्तिगत आव्हान ठेवले आहे.
 • आता घरगुती वापराच्या गॅसप्रमाणेच केरोसिनचे अंशदानदेखील थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यावर जमा होणार असून, 1 एप्रिलपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. सुरूवातीस काही निवडक जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाईल.छत्तीसगडमधील रायपूर, दुर्ग आणि विलासपूर, हरियानातील पानिपत, पंचकुला, हिमाचल प्रदेशातील शिमला, सोलन आणि उना या शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येईल.

 • देशाच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्राला मोठा झटका बसला आहे. दोन वर्षात प्रथमच भारतीय उत्पादन खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे. पीएमआय 50 च्या खाली येत 49.1 वर पोचला आहे.
  • सलग सहाव्या महिन्यात उत्पादनात घट नोंदवण्यात आली आहे.
  • हा निर्देशांक औद्योगिक उत्पादन क्षेत्राची स्थिती दर्शवितो.
  • खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) 50 च्या वर असल्यास उत्पादन वाढत असल्याचे सूचीत करते तर 50च्या खाली असल्यास उत्पादन घटल्याचे सूचीत होते.