चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 16 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1 . गंगा शुध्दीकरण मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाने ( NGT ) 1 फेब्रुवारी 2016 पासून खालीलपैकी कोणत्या भागात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे ?

A. गोमूख ते हरीद्वार
B. विष्णूप्रयाग ते नंदप्रयाग
C. रुद्रप्रयाग ते कनौज
D. गोमूख ते अलाहाबाद


Click for answer 

A. गोमूख ते हरीद्वार
या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून प्रतिदिन पाच हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे .
2. 6 ते 11 डिसेंबर 2015 दरम्यान 74 वी आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती परिषद खालीलपैकी कोठे संपन्न झाली ?

A. नवी दिल्ली
B. मुंबई
C. पांढरकवडा , यवतमाळ
D. चेन्नई


Click for answer 

B. मुंबई
3. केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकतेच 6 नव्या आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था करण्यास मंजूरी दिली आहे . या संस्था कोणत्या राज्यात आकार घेणार आहेत ?

A. महाराष्ट्र , अरूणाचल प्रदेश , गोवा , केरळ , ओडीशा , राजस्थान
B. आंध्रप्रदेश , छत्तीसगड , गोवा , जम्मू , केरळ आणि कर्नाटक
C. मिझोराम , राजस्थान , ओडीशा , कर्नाटक , जम्मू व काश्मीर , गोवा
D. गोवा , सिक्कीम , केरळ , दिल्ली , त्रिपुरा , प. बंगाल


Click for answer 

B. आंध्रप्रदेश , छत्तीसगड , गोवा , जम्मू , केरळ आणि कर्नाटक
4 . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष समारंभाचा एक भाग म्हणून किती मूल्ये असलेली नाणी प्रकाशित करण्यात आली ?

A. 5 रुपये व 10 रुपये
B. 10 रुपये व 100 रुपये
C. 10 रुपये व 125 रुपये
D. 50 रुपये व 125 रुपये


Click for answer 

C. 10 रुपये व 125 रुपये
5 . राष्ट्रीय हरीत लवादाने कौडीयाला ते हृषीकेश या गंगेच्या काठावर असलेल्या उत्तराखंड मधील संपूर्ण पट्टयात शिबीरे आयोजित करण्यास ( कँपिंग ) बंदी घातली आहे . मात्र कोणत्या साहसी खेळास खेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे ?

A. स्विमिंग
B. सायकलिंग
C. राफ्टींग
D. कोणत्याही नाही


Click for answer 

C. राफ्टींग
6. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने अल्पसंख्यांक समुदायासाठी कोणता एकात्मिक शिक्षण आणि उपजीवीका उपक्रम सुरू केला आहे ?

A. नई दुनिया
B. नई मंझिल
C. हुनर से मंझिल
D. नया सवेरा


Click for answer 

B. नई मंझिल