चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 22 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1 . महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्येष्ठ नागरीकांचे वय 65 वर्षांवरून किती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे ?

A. 70 वर्षे
B. 62 वर्षे
C. 60 वर्षे
D. 55 वर्षे


Click for answer 

C. 60 वर्षे
2. नुकतेच खालीलपैकी कोणी स्वच्छ भारत मोहिमेसाठी 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज देण्यास मंजूरी दिली आहे ?

A. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
B. जागतिक बँक
C. आशियाई विकास बँक
D. जपान बँक


Click for answer 

B. जागतिक बँक
3. भारताच्या पहिल्यावहिल्या सूर्यविषयक अभियानास ( सोलर मिशन ) सन 2019 मध्ये सुरुवात होणार आहे . ह्या अभियानाचे नामकरण काय करण्यात आले आहे ?

A. चांद्रयान - 2
B. गगन
C. अदित्य एल - 1
D. मॉम


Click for answer 

C. अदित्य एल - 1
4 . माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसले धडे देण्यासाठी केंद्र सरकारने गुजरातमध्ये ' जन धन शिक्षा ' हा प्रकल्प सुरू केला आहे ?

A. स्वस्त दरात शिक्षण
B. व्यावसायिक शिक्षण
C.
D. आर्थिक साक्षरता


Click for answer 

D. आर्थिक साक्षरता

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गुजरात , महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शालेय विदयार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यात येणार आहेत .
5 . सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिल्लीत किती क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल मोटार व एसयूव्ही वाहनांच्या नोंदणीस बंदी घातली आहे ?

A. 100 सी सी क्षमता
B. 500 सी सी क्षमता
C. 1000 सी सी क्षमता
D. 2000 सी सी क्षमता


Click for answer 

D. 2000 सी सी क्षमता
6. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच कोल्लम येथे आर . शंकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले . ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. कर्नाटक
D. आंध्रप्रदेश


Click for answer 

B. केरळ