चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 28 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . भारताने ( इस्त्रोने ) 17 डिसेंबर 2015 रोजी कोणत्या प्रक्षेपकाच्या मदतीने सिंगापूरचे सहा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले ?isro-satellite


A. PSLV C - 29
B. PSLV C - 31
C. GSLV C - 5
D. GSLV C - 21


Click for answer 

A. PSLV C - 29
2. भारतीय हद्दीत प्रवेश केलेल्या पाकीस्तानी बोटीला जलसमाधी मिळाल्यानंतर उपमहानिरीक्षक बी. के. बक्षी यांनी केलेल्या विधानांमुळे वाद झाल्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ते कोणत्या दलाशी संबंधित आहेत ?

A. सीमासुरक्षा दल
B. तटरक्षक दल
C. भारतीय स्थलसेना
D. इंडोतिबेटी सीमा पोलीस दल


Click for answer 

B. तटरक्षक दल
3. कृष्णा गोदावरी खोऱ्यातील नैसर्गिक वायूविषयी रिलायन्स इंडस्ट्रिज व ओएनजीसी यांच्यातील वादांसंदर्भात केंद्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे ?

A. दवे समिती
B. ए. पी. शाह समिती
C. चिदंबरम समिती
D. टी.नायडू समिती


Click for answer 

B. ए . पी . शाह समिती
4. खालीलपैकी कोणाची भारताच्या मुख्य माहीती आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे ?

A. आर.के. माथूर
B. सुरेश मेहता
C. आर.के. पचौरी
D. सिताराम जोशी


Click for answer 

A. आर. के. माथूर

माजी संरक्षण सचिव आर. के. माथूर यांची भारताच्या मुख्य माहीती आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे .
5. 'कोर्ट' चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?

A. विवेक गोंबर
B. चैतन्य ताम्हाणे
C. विरा साथीदार
D. प्रदीप जोशी


Click for answer 

B. चैतन्य ताम्हाणे
6. अमेरीकेची मध्यवर्ती बँक - फेडरेल रिझर्व्ह ने तब्बल दहा वर्षानंतर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. खालीलपैकी कोणती महिला या बँकेच्या अध्यक्षपदी आहे ?

A. जॅनेट येलेन
B. कारा ब्लॅक
C. हिलरी क्लिंटन
D. सामंथा फॉक्स


Click for answer 

A. जॅनेट येलेन