चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 11 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1 . ' मनरेगा ' योजनेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मजूरी थेट बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे . त्याची सुरुवात म्हणून प्रायोगिक तत्त्वावर 1 जानेवारी 2016 पासून या योजनेची अंमलबजावणी कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ?MNREGA

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. आसाम
D. केरळ


Click for answer

D. केरळ

ही योजना प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतली आहे. यशस्वी झाल्यानंतर ती संपूर्ण देशात लागू केली जाईल.
मनरेगामध्ये अनेक गैरव्यवहार होत आहेत. त्यामुळे सरकारचा निधी वाया जातो. यामुळे या योजनेत अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यात ‘ई-मस्टर’ योजना लागू केली आहे. आता मजुरांना सुरळीतपणे मजुरीचे वाटप करण्यासाठी थेट बँकेत मजुरीची योजना आखली आहे.
2. इंग्लंडमधील स्वयंसेवी संस्था ' ऑक्सफाम ' ने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगातील 10 टक्के श्रीमंत देश वातावरणात किती टक्के कार्बन सोडतात ?

A. 20 टक्के
B. 50 टक्के
C. 70 टक्के
D. 90 टक्के


Click for answer

B. 50 टक्के
3. प्रसिद्ध वडाक्कूनाथन मंदीराला उत्तम कामगिरीसाठी '' युनेस्को " चा पुरस्कार मिळाला आहे . हे मंदीर कोणत्या राज्यात आहे ?

A. केरळ
B. तामिळनाडू
C. ओडीशा
D. राजस्थान


Click for answer

A. केरळ

हा पुरस्कार मिळविणारे वडाक्कूनाथन मंदिर दक्षिण भारतातील पहिलेच मंदिर ठरले आहे. भारतात चौथ्यांदा हा पुरस्कार आला आहे.
4 . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार " क " प्रतीचा लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी " ई - लिलाव " प्रक्रीया राबविणारे कोणते राज्य पहिलेच राज्य ठरणार आहे ?

A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. केरळ
D. मध्यप्रदेश


Click for answer

B. कर्नाटक


ही प्रक्रीया सुरू करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2016 ही तारीख निश्चीत केली आहे .
5 . अमेरीकेतील ' इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक व पीस ' या संस्थेच्या अहवालानुसार ' जागतिक दहशतवाद निर्देशांक 2014 ' नुसार दहशतवादाचा फटका सहन करणाऱ्यांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

A. पहिल्या
B. सहाव्या
C. तेराव्या
D. सत्तराव्या


Click for answer

B. सहाव्या
6. ' मुंबई - अहमदाबाद ' बुलेट ट्रेनसाठी खालीलपैकी कोणत्या देशाने भारताला 8 अब्ज डॉलर्सचे कर्ज देऊ केले आहे ?

A. जर्मनी
B. जपान
C. फ्रान्स
D. अमेरीका


Click for answer

B. जपान