चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 30 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. खालीलपैकी कोण यावर्षीची ' मिस वर्ल्ड ' च्या मुकूटाची मानकरी ठरली ? miss-world-2016

A. झी लिन झांग ( चीन )
B. मिरीया लालगुना ( स्पेन )
C. आजरा अकीन ( तुर्कस्तान )
D. तताना कुचारोवा ( झेक गणराज्य )


Click for answer

B. मिरीया लालगुना ( स्पेन )

या स्पर्धेत मिस रशिया दुसऱ्या तर मिस इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर राहील्या .

या स्पर्धेत भारताचे नेतृत्व आदिती आर्या करत होती , ती 65 व्या क्रमांकावर राहीली .
2. खुल्या शोध क्षेत्रातील असामान्य जागतिक नेता म्हणून कोणत्या भारतीय नेतृत्वास यावर्षीचा ' गारवूड पुरस्कारा ' ने सन्मानित करण्यात आले ?

A. मनमोहन सिंग
B. नरेंद्र मोदी
C. सोनिया गांधी
D. प्रणव मुखर्जी


Click for answer

D. प्रणव मुखर्जी

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया - बर्कले हास्क स्कूल ऑफ बिझनेस तर्फे हा पुरस्कार दिला जातो .
3. नुकताच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने खालीलपैकी कोणत्या देशात शांतता प्रस्थापित करण्याबाबतचा ठराव मंजूर केला ?

A. सिरीया
B. अफगाणिस्तान
C. पॅलेस्टाइन
D. युलेन


Click for answer

A. सिरीया
4 . उत्तरप्रदेशाच्या लोकायुक्तपदी सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली ?

A. वीरेंद्र सिंह
B. ए . के . गोयल
C. उदय ललित
D. सच्चिदानंद गुप्ता


Click for answer

A. वीरेंद्र सिंह
5 . खालीलपैकी कोणत्या चित्रकाराच्या एका चित्रास नुकतेच ' ख्रिस्तीज ' ने आयोजित केलेल्या लिलावात तब्बल 29 कोटी 30 लाख रुपये मिळाले ?

A. फ्रान्सीस न्यूटन सूजा
B. दिलीप चित्रे
C. वासूदेव गायतोंडे
D. मारीओ मिरांडा


Click for answer

C. वासूदेव गायतोंडे
6. अमेरीकेतील अध्यक्षीय शर्यतीत असलेल्या डेमोक्रॅटीक पक्षाच्या कोणत्या उमेदवाराने प्रचारात डिजीटल माहीती साठयाचा वापर करण्यास आडकाठी आणल्याच्या प्रकरणी स्वतःच्याच पक्षावर खटला भरला म्हणून ते चर्चेत आहेत ?

A. बेनी सँडर्स
B. हिलरी क्लिंटन
C. डोनाल्ड ट्रम्प
D. मार्टीन मॅले


Click for answer

A. बेनी सँडर्स