चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 21 डिसेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1 . केंद्र सरकारने नुकताच वन रँक वन पेन्शनच्या ( OROP ) समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोग स्थापन केला आहे ?

A. न्या . मेहता
B. न्या . रेड्डी
C. न्या . सिंग
D. न्या . ठाकूर


Click for answer 

B. न्या . रेड्डी

सरकारने न्यायमूर्ती एल . नरसिंहा रेड्डी यांची नियुक्ती केली आहे .
2. यावर्षीचा पु. ल . स्मृती पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

A. प्रशांत दामले
B. दिलीप प्रभावळकर
C. विजया मेहता
D. मोहन आगाशे


Click for answer 

B. दिलीप प्रभावळकर
3. नुकताच कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्यास पद्मविभूषण पुरस्काराने त्यांच्या निवासस्थानी गौरविले ?

A. मनोजकुमार
B. दिलीपकुमार
C. अमिताभ बच्चन
D. अनुपम खेर


Click for answer 

B. दिलीपकुमार
4 . खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच ' शाहीन - 3 ' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

A. इराण
B. पाकीस्तान
C. सौदी अरेबिया
D. इराक


Click for answer 

B. पाकीस्तान

शाहीन - 1 ची मारक क्षमता 900 किमी , शाहीन - 2 ची 1500 किमी तर शाहीन - 3 ची 2750 किमी आहे .
5 . दिल्लीच्या लोकायुक्त म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली ?

A. रेवा खेत्रपाल
B. विरेन्द्र सिंह
C. व्ही.के.सिंह
D. वाय. भास्कर राव


Click for answer 

A. रेवा खेत्रपाल
6. खादीच्या उत्पादनांची विक्री ऑनलाइन करणारे पहिले राज्य कोणते ठरले ?

A. उत्तरप्रदेश
B. मध्यप्रदेश
C. केरळ
D. गुजरात


Click for answer 

A. उत्तरप्रदेश