चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 19 नोव्हेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. स्वदेशी बनावटीची आजवरची सर्वात मोठी आणि अद्यावत अशा कोणती गस्ती नौका अलिकडेच गोव्यात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते तटरक्षक सामील करण्यात आली ? warship

A. समर्थ
B. बेतवा
C. राणा
D. ऐरावत


Click for answer

A. समर्थ

ही नौका गोव्यातीलच गोदीत बांधण्यात आलेली असून अशा प्रकारच्या 6 नौकांच्या मालिकेतील या पहिल्या नौकेचे वजन 2400 टन आहे .
2. चीनने अलीकडेच ' एक कुटूंब एक मूल ' हे धोरण रद्द केले . त्याऐवजी आता तेथील सरकारने प्रत्येक कुटूंबाला किती मुले होऊ देण्यास परवानगी दिली आहे ?

A. दोन
B. तीन
C. पाच
D. कोणतेही बंधन नाही


Click for answer

A. दोन
3. उदयोगपती ब्रिजमोहनलाल मुंजाळ यांचे अलीकडेच निधन झाले . ते कोणत्या उद्योग समूहाशी निगडीत होते ?

A. फोर्ज उद्योगसमूह
B. हिरो मोटोकॉर्प
C. बजाज मोटर्स
D. किंगफिशर कंपनी


Click for answer

B. हिरो मोटोकॉर्प
4 . मध्यप्रदेशातील नानाजी देशमुख पशु विदयापीठाने ' कडकनाथ ' व ' जबलपूर कलर ' या कोंबड्यांच्या प्रजातीच्या जनुकांचा समावेश करून भरपूर प्रथिने असलेली कोणती कोंबड्यांची रोगमुक्त प्रजाती विकसित केली आहे ?

A. यमुना
B. अंकलेश्वर
C. नर्मदा निधी
D. ग्रामप्रिया


Click for answer

C. नर्मदा निधी
5 . सरे विदयापीठाने अलीकडे प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालानुसार कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे म्हटले आहे ?

A. न्यूयॉर्क
B. बिजींग
C. इस्लामाबाद
D. दिल्ली


Click for answer

D. दिल्ली
6. फोर्ब्स नियतकालीकाने प्रकाशित केलेल्या 2015 च्या प्रभावशाली व्यक्तींच्या सूचीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कितवे स्थान देण्यात आले आहे ?

A. पहिले
B. सातवे
C. नववे
D. सतरावे


Click for answer

C. नववे

2014 मध्ये मोदी या यादीत चौदाव्या स्थानावर होते .
यावर्षी पहिल्या स्थानावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन असून त्यानंतर जर्मन चॅन्सेलर मर्केल , ओबामा , पोप फ्रान्सिस व चीनचे अध्यक्ष क्षी जीनपिंग हे अनुक्रमे दुसऱ्या , तिसऱ्या , चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत .