चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 27 नोव्हेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. 26 जानेवारी 2016 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला फ्रान्स्वॉ ओलांद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत ?

A. फ्रान्स
B. स्पेन
C. पोर्तुगाल
D. इटली


Click for answer

A. फ्रान्स
2. कोणत्या देशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध करणारा ठराव नोव्हेंबर 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने विक्रमी मतांनी मंजूर केला ?

A. इराण
B. सिरीया
C. श्रीलंका
D. उत्तर कोरीया


Click for answer

D. उत्तर कोरीया
3. दिल्ली प्रौदयोगिक विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणारा कोणता विद्यार्थी गूगलने त्याला दिलेल्या तब्बल 1.27 कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे चर्चेत होता ?

A. सतीश त्रिवेदी
B. चेतन कक्कड
C. अरूप सहा
D. सुजित राजपूत


Click for answer

B. चेतन कक्कड
4 . अशोक सिंहल यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने निधन झाले . ते कोणत्या संघटनेचे / पक्षाचे नेते होते ?

A. भाजपा
B. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
C. बजरंग दल
D. विश्व हिंदू परीषद


Click for answer

D. विश्व हिंदू परीषद
5 . ' इफ्फी ' या गोवा येथे संपन्न होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2015 मध्ये फोकस देश कोणता आहे ? iffi

A. स्पेन
B. अमेरीका
C. सिंगापूर
D. अर्जेंटिना


Click for answer

A. स्पेन
6. लॅटिन अमेरीकेतील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अर्जेंटिना देशात बारा वर्षांपासून सत्तेत असलेल्या अध्यक्षा क्रिस्टिना क्रिचनर यांना पराभूत करत कोण अध्यक्षस्थानी विराजमान झाले आहे ?

A. डॅनियल मिओली
B. मॉरिसिओ मॅक्री
C. जेकब जुमा
D. दिलमा रोसे


Click for answer

B. मॉरिसिओ मॅक्री