चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 18 नोव्हेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका  
1. डिसेंबर 2015 मध्ये भारताचे 43 वे सरन्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोण शपथ घेतील ?

A. न्या. टी. एस. ठाकूर
B. न्या. एच. एल. दत्तू
C. न्या. आर. एम. लोढ़ा
D. न्या. एच. लक्ष्मीनारायणस्वामी


Click for answer

A. न्या. टी. एस. ठाकूर

न्या. ठाकूर हे न्या. दत्तू यांची जागा घेतील. त्यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निकाल दिला होता. तसेच ते शारदा चिटफंड प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ते प्रमुख होते. शिवाय त्यांनी दिल्ली आणि पंजाब हरियाणा या दोन्हीही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे.
2. केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर 2015 पासून सेवाकरावर (Service Tax)किती 'स्वच्छ भारत उपकर' आकारणे चालू केले आहे ?

A. पाव टक्का
B. अर्धा टक्का
C. पाऊण टक्का
D. एक टक्का


Click for answer

B. अर्धा टक्का

सेवाकराचा त्या पूर्वीचा दर 14 टक्के इतका होता. 15 नोव्हेंबर 2015 पासून स्वच्छ भारत उपकरासह सेवाकराचा दर 14.5% इतका आहे. मार्च 2016 अखेर सरकारला यातून 400 कोटी रुपये इतका उपकर अपेक्षित आहे.
3. कोणत्या राज्यात पोलीस उपनिरीक्षकपदी देशात पहिल्यांदाच तुतीयपंथीयाची नेमणूक करण्यात आली ?

A. दिल्ली
B. तामिळनाडू
C. मध्यप्रदेश
D. आसाम


Click for answer

B. तामिळनाडू

मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार के. प्रिथीका याशिनी हीची नियुक्ती करण्यात आली आहे.
4. नेपाळच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे. ही महिला कोण ? vidya-devi

A. ओंसारी घारती मागर
B. अनिता यादव
C. विद्या देवी भंडारी
D. सुशीला कोईराला


Click for answer

C. विद्या देवी भंडारी

सभागृहातील एक तृतीयांश सदस्य महिला असाव्यात किंवा अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष पदी महिला असावी, असे नेपाळच्या नवीन राज्यघटनेनुसार बंधन घालण्यात आले आहे.
5. मुंबईतील कुख्यात गुंड छोटा राजन ह्याला कोणत्या देशाकडून भारताने ताब्यात घेतले आहे ?

A. थायलंड
B. इंडोनेशिया
C. पाकिस्तान
D. सिंगापूर


Click for answer

B. इंडोनेशिया
6. छोटा राजन नंतर भारताला गुन्हेगार प्रत्यार्पणात मिळालेले यश म्हणून युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) संघटनेचा नेता अनुप चेटीया याला कोणत्या देशाने भारताकडे सुपूर्त केले ?

A. बांगलादेश
B. पाकिस्तान
C. म्यानमार
D. कॅनडा


Click for answer

C. म्यानमार