चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 24 नोव्हेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांच्या पक्षाने तेथील सार्वत्रिक निवडणूकीत दणदणीत विजय मिळविला आहे . त्यांच्या पक्षाने पहिल्यांदाच निवडणूकीत सहभाग घेतला होता . अर्थात तरीही तेथील लोकशाहीकडची वाटचाल सुकर नाही . स्यू की यांच्या पक्षाचे नाव काय आहे ?

A. रिपब्लिकन पार्टी(म्यानमार)
B. नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी ( NLD )
C. डेमोक्रॅटिक फ्रंट
D. युथ फॉर डेमोक्रसी


Click for answer

B. नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी ( NLD )
2. युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडीया ( यूआयडीएआय ) या संस्थेने देशातील पहिले आधारकार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी दिले . गेल्या 5 वर्षाचा मागोवा घेताना, या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार देशातील किती टक्के प्रौढ लोकांना स्वेच्छेने आधारकार्ड देण्यात आले आहे ?

A. 100%
B. 93%
C. 85%
D. 76%


Click for answer

B. 93%
3. भारताने अग्नी-4 या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील किनारी भागात अलीकडेच घेतली. या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे ?

A. 1000 किमी
B. 2000 किमी
C. 4000 किमी
D. 10000 किमी


Click for answer

C. 4000 किमी
4 . नवी दिल्लीमध्ये ऑक्टोबर 2015 मध्ये पार पडलेल्या भारत-आफ्रिका परीषदेच्या निमीत्ताने भारत आफ्रिका खंडातील देशांना किती रकमेचे स्वस्त दराने कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे ?

A. 10 हजार कोटी रु .
B. 50 हजार कोटी रु .
C. 10 अब्ज डॉलर्स
D. 50 अब्ज डॉलर्स


Click for answer

C. 10 अब्ज डॉलर्स

भारताने या परिषदेत पुढील पाच वर्षात भारत आफ्रीका खंडातील देशांना 10 अब्ज डॉलरचे स्वस्त दराने कर्ज देईल, त्याचबरोबर आफ्रीकेला 60 कोटी डॉलर अनुदानाच्या स्वरूपात भारत देईल अशी घोषणा भारताने केली आहे .
5 . ब्राम्होस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अलीकडेच केव्हा घेण्यात आली ?brahmos-missile

A. 1 नोव्हेंबर 2015
B. 4 नोव्हेंबर 2015
C. 9 नोव्हेंबर 2015
D. 12 नोव्हेंबर 2015


Click for answer

C. 9 नोव्हेंबर 2015
6. अनिवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे पुत्र अंगद पॉल यांचे नोव्हेंबर 2015 मध्ये अपघाती निधन झाले . ते कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते ?

A. कॅपारो
B. मित्तल इस्पात
C. विक्रम इस्पात
D. टेल्को


Click for answer

A. कॅपारो