चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 26 नोव्हेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . देशात पडून राहीलेले सोने चलनात आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी सुवर्ण ठेव , सुवर्ण रोखे आणि सोन्याची नाणी या तीन योजनांचा शुभारंभ कधी केला ?

A. 2 ऑक्टोबर 2015
B. 31 ऑक्टोबर 2015
C. 5 नोव्हेंबर 2015
D. 11 नोव्हेंबर 2015, धनत्रयोदशी


Click for answer

C. 5 नोव्हेंबर 2015
2. नेपाळच्या राष्ट्राध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची निवड झाली , कोणत्या साम्यवादी नेत्या या पदावर विराजमान झाल्या आहेत ? nepal

A. सरोज कोईराला
B. विद्यादेवी भंडारी
C. अवंतिका शर्मा
D. साधना थापा


Click for answer

B. विद्यादेवी भंडारी
3. मूकी व बहिरी असलेली भारतीय मुलगी गीता पंधरा वर्षानंतर पाकीस्तानातून भारतात परतली . या प्रकरणात पंतप्रधान मोदींनी दहा वर्षे सांभाळ केल्याबद्दल देऊ केलेली एक कोटी रुपयांची देणगी पाकीस्तानातील कोणत्या सेवाभावी संस्थेने नम्रपणे नाकारली ?

A. सेवा फाउंडेशन
B. एधी फाउंडेशन
C. ग्रीनपीस
D. सेजल


Click for answer

B. एधी फाउंडेशन

प्रसिद्ध समाजसेवक अब्दुल सत्तार एधीचे संस्थापक आहेत , त्यांनी मोदींचे आभार मानत ही देणगी नम्रपणे नाकारली आहे . ' बजरंगी भाईजान ' या चित्रपटामुळे या गीताची कहाणी जगासमोर आली .
4 . 18 नोव्हेंबर 2015 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्याने जनलोकपाल विधेयक मंजूर केले ?

A. महाराष्ट्र
B. दिल्ली
C. गोवा
D. तामिळनाडू


Click for answer

B. दिल्ली
5 . पॅरिस हल्ल्यानंतर लगेचच माली ( Mali) देशाच्या राजधानीत बामाको शहरात दहशतवाद्यांनी एका पंचतारांकित हॉटेलमधील 20 जणांना ओलीस ठेवले होते . तब्बल नऊ तासांच्या कारवाईनंतर ओलिसांना मुक्त करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले . हा देश कोणत्या खंडात आहे ?

A. द. अमेरीका
B. युरोप
C. आफ्रीका
D. आशिया


Click for answer

C. आफ्रीका
6. बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नुकतीच निवड करण्यात आली ?

A. नितीश कुमार
B. लालूप्रसाद यादव
C. तेजप्रताप यादव
D. तेजस्वी यादव


Click for answer

D. तेजस्वी यादव