चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 ऑक्टोबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. नेपाळने 20 सप्टेंबर 2015 रोजी लोकशाही संघराज्य पद्धतीच्या घटनेचा स्वीकार करतानाच नेपाळाने स्वतःला कोणते राष्ट्र म्हणून घोषीत केले ? nepal

A. धर्मनिरपेक्ष राष्ट्र
B. हिंदू राष्ट्र
C. वैदिक राष्ट्र
D. पौराणीक राष्ट्र


Click for answer

A. धर्मनिरपेक्ष राष्ट्र

या नव्या घटनेचे 37 विभाग , 304 अनुच्छेद व 7 पूरक अंश आहेत.
67 वर्षांच्या संघर्षानंतर निर्वाचीत लोकप्रतिनिधींनी तयार केलेली ही पहिलीच घटना आहे
या घटनेने नेपाळचे सात भागात विभाजन करण्यात आले असून नेपाळचे हिंदू राजेशाहीपासून धर्मनिरपेक्ष व सांघिक लोकशाहीत झाले.
2. कोणत्या देशाने अलिकडेच एक वादग्रस्त विधेयक संमत करताना तब्बल सत्तर वर्षांनी प्रथमच आपले सैन्य परदेशात लढण्यासाठी परवानगी दिली आहे ?

A. फ्रान्स
B. नेपाळ
C. जपान
D. सौदी अरेबिया


Click for answer

C. जपान

दुसऱ्या महायुद्धानंतर जपानी सैन्याला परदेशात लढण्यासाठी जाण्याची पहिल्यांदाच मुभा दिली आहे.
3. अलीकडेच बांगलादेशातून 1964 ते 1969 या काळात भारतात आलेल्या कोणत्या आदिवासींना तीन महिन्यांत नागरीकत्व देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व अरूणाचल प्रदेश सरकारला दिला आहे ?

A. मिसमी व डफला
B. चकमा व हाजाँग
C. संथाल व बिरहोर
D. खाम्पटी व कनोटा


Click for answer

B. चकमा व हाजाँग
4. ' मायहायरिंग क्लब डॉट कॉम ' ने चालू वर्षात केलेल्या सर्वेक्षणानुसार , जगातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वात कमी वेतन मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

A. तिसरा
B. पाचवा
C. सातवा
D. सतरावा


Click for answer

C. सातवा
5. ' हॉलीवूड वाइव्हज ' व ' द स्टड ' या ख्यातनाम कादंबरीच्या कोणत्या लेखिकेचा नुकताच कर्करोगाने मृत्यू झाला ?

A. एलिझा कूक
B. जॅकी कॉलिन्स
C. एंजेला कार्टर
D. रुथ अॅडम


Click for answer

B. जॅकी कॉलिन्स
6. शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन ( International Peace Day) कधी साजरा केला गेला ?

A. 21 सप्टेंबर
B. 22 सप्टेंबर
C. 23 सप्टेंबर
D. 24 सप्टेंबर


Click for answer

A. 21 सप्टेंबर.