चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 7 ऑक्टोबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1 . स्वदेशी बनावटीची आतापर्यंतची सर्वात मोठी गणली गेलेली कोणती युद्धनौका नुकतीच नौदलाच्या सेवेत दाखल झाली ? mpsc-current-affairs

A. आयएनएस विशाखापट्टणम
B. आयएनएस कोची
C. आयएनएस त्रिची
D. आयएनएस सिंधुदुर्ग


Click for answer

B. आयएनएस कोची
ही कोलकाता श्रेणीची विनाशिका आहे . 7500 टन वजनाची 164 मीटर लांबीची ही युद्धनौका 4 हजार कोटी रूपये खर्चून बनवली गेली आहे .
कोलकाता श्रेणीतील आयएनएस कोलकाता गेल्यावर्षी नौदलात दाखल झाली असून आयएनएस चेन्नई 2016 च्या अखेरीस आणि 2018 च्या अखेरीस आयएनएस विशाखापट्टणम दाखल होईल .
आयएनएस कोचीची बांधणी माझगाव डॉकयार्ड लिमिटेड या कंपनीने माझगाव गोदीत केली .
2. देशभरात राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या ' हरीत मार्ग योजनेस ' नुकताच दिल्लीत प्रारंभ झाला . या योजनेसाठी सरकारने दरवर्षी किती रकमेची तरतूद केली आहे ?

A. 1 हजार कोटी रू / वर्ष
B. 5 हजार कोटी रू / वर्ष
C. 10 हजार कोटी रू / वर्ष
D. 100 हजार कोटी रू / वर्ष


Click for answer

A. 1 हजार कोटी रू / वर्ष
या योजनेवर 5 वर्षात 5000 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत .
3. कोणत्या राज्याने नुकतेच राज्यातल्या स्वयं सहायता गटांना प्रशिक्षण देणाऱ्या महिलांसाठी ' अम्मा मोबाईल फोन प्रकल्प ' राबविण्याची घोषणा केली आहे ?

A. प . बंगाल
B. तामिळनाडू
C. कर्नाटक
D. केरळ


Click for answer

B. तामिळनाडू
4 . बिहारनंतर आता कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या राज्यासाठी 862 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे ?

A. आसाम
B. अरूणाचल प्रदेश
C. मध्यप्रदेश
D. केरळ


Click for answer

A. आसाम
5 . उत्तराखंड येथील देवसंस्कृती महाविदयालयातील आदित्य प्रकाशसिंग अलीकडे कोणत्या कारणांसाठी अलीकडेच चर्चेत होता ?

A. सर्वाधिक काळ पाण्यात प्राणायाम - लिमका रेकॉर्ड
B. सर्वाधिक काळ गायन - गिनीज रेकॉर्ड
C. सर्वाधिक काळ ऑक्सिजनशिवाय हिमालयावर स्वारी
D. सर्वाधिक काळ शिर्षासन - गिनीज रेकॉर्ड


Click for answer

D. सर्वाधिक काळ शिर्षासन - गिनीज रेकॉर्ड
6. अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या देशाकडून 2.5 अब्ज डॉलर्स किमतीच्या बोइंग कंपनीची चिनूक जातीची 15 आणि 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी मंजूरी दिली आहे ?

A. इस्राईल
B. रशिया
C. अमेरीका
D. जर्मनी


Click for answer

C. अमेरीका