चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 21 ऑक्टोबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. 96 व्या अ . भा . मराठी नाटय संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ? maharashtra

A. रत्नाकर मतकरी
B. गंगाराम गवाणकर
C. प्रेमानंद गज्वी
D. विश्वास मेहेंदळे


Click for answer

B. गंगाराम गवाणकर
त्यांची वस्त्रहरण, वात्रट मेले, दोघी ही नाटके विशेष गाजली.
2. फिलीपिन्स देशाला नुकताच खालीलपैकी कोणत्या चक्रीवादळाने तडाखा दिला ?

A. कोपू
B. झांबी
C. सैलाब
D. फायकून


Click for answer

A. कोपू
3. बालहक्कांसाठी काम करणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेत्या कैलाश सत्यार्थी यांना नुकतेच अमेरीकेतील कोणत्या विदयापीठाने मानाच्या ' मानवता पुरस्कारा ' ने सन्मानित केले ?

A. हार्वर्ड विदयापीठ
B. येल विदयापीठ
C. कोलंबिया विद्यापीठ
D. स्टॅनफोर्ड विद्यापीठ


Click for answer

A. हार्वर्ड विदयापीठ
हा पुरस्कार मिळविणारे सत्यार्थी पहिले भारतीय आहेत .
4 . यावर्षी राज्यातील किती गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे ?

A. 4018
B. 14708
C. 24122
D. 27580


Click for answer

B. 14708
5. फेब्रुवारी 2016 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नौदल संचलन ( International Fleet Review ) होणार आहे ?

A. मुंबई
B. कोची
C. विशाखापट्टणम
D. मार्मागोवा


Click for answer

C. विशाखापट्टणम
यापूर्वी 2001 मध्ये असे संचलन मुंबईत अरबी समुद्रात झाले होते .
2016 च्या संचलनास 45 पेक्षा जास्त देशांच्या युध्दनौका सहभागी होणार आहेत .
6. राज्याचे महाधिवक्ता ( Advocate General ) म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. सुनील मनोहर
B. गुलाम वहानवटी
C. श्रीहरी अणे
D. उज्ज्वल निकम


Click for answer

C. श्रीहरी अणे