चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 1 ऑक्टोबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. 18 सप्टेंबर 2015 रोजी पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या शहरातून अतिशय महत्त्वाच्या अशा एकत्रित ऊर्जा विकास योजनेचा(Integrated Power Development Scheme ) शुभारंभ केला ? intergrated-power-developmet-scheme

A. गांधीनगर
B. वाराणसी
C. पुणे
D. अमेठी


Click for answer

B. वाराणसी
2. गिधाडांच्या संवर्धन व बचावकार्याला मदत करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण , वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाला कोणत्या औषधाची विक्री केवळ एका डोसपर्यंत मर्यादित ठेवण्याची विनंती केली आहे ?

A. डायक्लोफेनेक
B. रिमोनाबंट
C. फेनफ्लूरामाइन
D. अस्टेमिझोल


Click for answer

A. डायक्लोफेनेक

केंद्र सरकारने वर्ष 2006 मध्ये जनावरांच्या उपचारासाठी डायक्लोफेनेकच्या वापरावर बंदी घातली होती .
गिधाडांच्या मुत्रपिंड , यकृत यावर हे औषध विपरीत परिणाम करते .
3. 1965 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमीत्त, नवी दिल्लीतील राजपथ लॉन्स इथे कोणते स्मृती प्रदर्शन आयोजित केले होते ?

A. शौर्यांजली
B. शौर्यगाथा
C. विजयगाथा
D. रणांगण


Click for answer

A. शौर्यांजली
4. या वर्षीच्या मॅन बुकर पुरस्कारासाठीच्या अंतिम सहा नामांकनांत भारतीय वंशाचे लेखक संजीव साहोटा यांचाही समावेश आहे . कोणत्या कांदबरीसाठी त्यांना मानांकन मिळाले आहे ?

A. शिवा- ट्रॉयलॉजी
B. दी इअर ऑफ द रनवेज
C. कॅच- 22
D. अंडर द नेट


Click for answer

B. दी इअर ऑफ द रनवेज
5. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवाला नुसार तंबाखूमुळे आग्नेय आशियात दरवर्षी किती व्यक्तींचा मृत्यू होतो ?

A. 1 कोटी
B. 13 लाख
C. 25 हजार
D. 2 हजार


Click for answer

B. 13 लाख
6. बाळ पंडीत यांचे सप्टेंबर 2015 मध्ये निधन झाले . ते कोणत्या खेळाचे ख्यातनाम समालोचक होते ?

A. कब्बड्डी
B. हॉकी
C. बॅडमिंटन
D. क्रिकेट


Click for answer

D. क्रिकेट