चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 13 ऑक्टोबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे भारतातले कितवे राज्य ठरले आहे ? Aaple_sarkar

A. पहिले
B. दुसरे
C. पाचवे
D. सातवे


Click for answer

A. पहिले
2. महाराष्ट्र सरकारने 2 ऑक्टोबर 2015 रोजी ' आपले सरकार ' या वेबपोर्टल द्वारा किती सेवा साठी सेवा हमी कायद्याद्वारे ऑनलाइन सेवा उपलब्ध केल्या आहेत ?

A. 12
B. 46
C. 97
D. 125


Click for answer

B. 46
3. राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ' अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉमॅशन ( अमृत) ' या महत्त्वाकांक्षी अभियानात राज्यातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे ?

A. 43
B. 23
C. 13
D. 07


Click for answer

A. 43
सन 2015 - 16 ते 2019 - 20 या काळात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
4. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ कम्युनिकेशन चे विभागीय केंद्र ( IIMC ) 2011-12 पासून कोणत्या विद्यापीठात सुरू झालेले असून अलीकडेच शासनाने त्यास शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेतल्याने ते चर्चेत होते ?

A. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
B. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव
C. मुंबई विद्यापीठ
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद


Click for answer

A. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
सदर केंद्र 2011-12 पासून विद्यापीठाच्या परिसरात तात्पुरत्या स्वरुपात सुरू होते . त्या केंद्रासाठी बडनेरा , अमरावती येथे जागा देण्यात आली आहे .
5. मंगळयानाच्या मंगळ परिभ्रमणास कोणत्या दिवशी एक वर्ष पूर्ण झाले ?

A. 24 ऑगस्ट 2015
B. 24 सप्टेंबर 2015
C. 29 सप्टेंबर 2015
D. 4 ऑक्टोबर 2015


Click for answer

B. 24 सप्टेंबर 2015
एक वर्ष पूर्ण झाल्या निमीत्ताने इस्त्रोने ' मार्स ऍटलास ' प्रसिद्ध केले.
6. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान बदल संमेलन COP-21 या वर्षा अखेरीस कोठे होणे नियोजित आहे ?

A. नवी दिल्ली , भारत
B. पॅरीस , फ्रान्स
C. न्यूयॉर्क , अमेरीका
D. नैरोबी , केनिया


Click for answer

B. पॅरीस , फ्रान्स