चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 8 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. 14 एप्रिल 2016 रोजी साजरा होणारी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती ' राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन ' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 125 व्या जयंतीचे औचित्य साधत केंद्र सरकार डॉ. आंबेडकर यांच्या स्मरणार्थ किती रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे ?

A. 5 रु
B. 10 रु
C. 100 रु
D. 125 रु


Click for answer

D. 125 रु
2. बिजींगमधील जागतिक अजिंक्यपद ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 100 मी. व 200 मी. शर्यतीचे विजेतेपद कोणी पटकावले ? running

A. गॅटलीन
B. उसेन बोल्ट
C. केस्टोन ब्लेडमन
D. असाफा पॉवेल


Click for answer

B. उसेन बोल्ट
जमैकाच्या उसेन बोल्टने 1OO मी. शर्यत 9.79 सेकंदात तर 200 मी. शर्यत 19.55 सेकंदात पूर्ण करत ही जेतेपदे मिळविली .
3. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 8 हजार धावांचा टप्पा गाठत सचिन तेंडूलकर व सौरव गांगुली यांचा विक्रम नुकताच कोणी मोडीत काढला ?

A. महेंद्रसिंग धोणी
B. एस. चंदरपॉल
C. ए. बी. डिव्हिलियर्स
D. एच.एम.आमला


Click for answer

C. ए. बी. डिव्हिलियर्स
4. गृहसचिव एल. सी. गोयल यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांच्या जागी अलिकडेच खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

A. सुनिल चटवाल
B. राजीव मेहर्षी
C. एस. के. श्रीवास्तव
D. राजेश कुमार


Click for answer

B. राजीव मेहर्षी
5. जी सॅट -6 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या प्रक्षेपकाद्वारे ( Launch Vehicle)करण्यात आले ?

A. जीएसएलव्ही-डी6
B. एसएलव्ही-3
C. पीएसएलव्ही-डी 3
D. एरियन-5G


Click for answer

A. जीएसएलव्ही-डी6
6. पहिला ' राष्ट्रीय हातमाग दिवस ' कधी साजरा करण्यात आला ?

A. 7 सप्टेंबर 2015
B. 7 ऑगस्ट 2015
C. 7 जूलै 2015
D. 7 जून 2015


Click for answer

B. 7 ऑगस्ट 2015