चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 15 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या मदतीसाठी भारताने आशियाई विकास बँकेशी किती रकमेचा ऋण करार केला आहे ? asian-development-bank

A. 100 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स
B. 200 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स
C. 300 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स
D. 400 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स


Click for answer

C. 300 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स
2. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे ?

A. डॉ. होमी भाभा
B. डॉ. विक्रम साराभाई
C. डॉ. मेघनाद सहा
D. प्रा. सतीश धवन


Click for answer

B. डॉ. विक्रम साराभाई
3. राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग दिनाच्या दिवशी ( 12 ऑगस्ट 2015) इस्त्रोचे भूस्थानिक व्यासपीठ असलेल्या कोणत्या नवीन ऍप्लिकेशन सुविधेचा शुभारंभ करण्यात आला ?

A. भुवन
B. गगन
C. आदित्य
D. शोध


Click for answer

A. भुवन
4. ओडीशा सरकारने नुकतेच कोणत्या बेटा ' कलाम बेटाचे (A P J Abdul Kalam Island) असे नामकरण केले आहे ?

A. नालाबना बेट (Island of Reeds)
B. परिकुड बेट
C. बर्डस् बेट
D. व्हिलर बेट ( Wheeler Island)


Click for answer

D. व्हिलर बेट ( Wheeler Island)
5. जपानच्या फुकुशिमामधील 2011 मध्ये आलेल्या भूकंपानंतर रिकामे करण्यात आलेल्या कोणत्या किरणोत्सग्रस्त शहरात परतण्यासाठी जपान सरकारने नागरीकांना परवानगी दिली आहे ?

A. कोबे
B. किटाक्यूशू
C. योकोहामा
D. नरहा


Click for answer

D. नरहा
6. ' नेचर ' या विज्ञानविषयक नियतकाली अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून जगभरातील एकूण वृक्षांची संख्या किती आहे ?

A. 40,000 कोटी
B. 200 लक्ष कोटी
C. 2.79 हजार कोटी
D. 3.04 हजार अब्ज


Click for answer

D. 3.04 हजार अब्ज