चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 2 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. सामान्य नागरीकांना महागडी औषधे स्वस्तात उपलब्ध करून देणारी कोणती योजना केंद्र सरकारने राज्य सरकारांमार्फत सुरु करण्याची तयारी चालवली आहे ? medicine

A. स्वस्त औषधी केंद्रे
B. जन औषधी केंद्रे
C. आर्युवेदिय औषधी केंद्रे
D. आयुष केंद्रे


Click for answer

B. जन औषधी केंद्रे
2. राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील सर्व समाजाच्या गरोदर व स्तनदा मातांना कुपोषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी दुपारचा मोफत आहार देण्यासाठी, राज्याचा आदिवासी विभाग कोणती योजना राबविणार आहे ?

A. महाराणा प्रताप सकस आहार योजना
B. वीर राणा सकस आहार अमृत योजना
C. अटलबिहारी वाजपेयी सकस आहार योजना
D. डॉ. अब्दुल कलाम सकस आहार अमृत योजना


Click for answer

D. डॉ. अब्दुल कलाम सकस आहार अमृत योजना
3. राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ (साखर महासंघ ) च्या अध्यक्षपदी कोणाची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली ?

A. संजीव बाबर
B. जयप्रकाश दांडेगावकर
C. विजयसिंह मोहीते पाटील
D. शिवाजीराव नागवडे


Click for answer

D. शिवाजीराव नागवडे
4. ब्रिटनमधील 'हुलयॉर्क मेडिकल स्कूल ' च्या सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार जगभरात दरवर्षी सात कोटींहून अधिक नागरिक तंबाखू सेवनाने हेाणाऱ्या विकारांमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यापैकी 75 टक्के नागरीक कोणत्या देशातील आहेत ?

A. भारत
B. व्हिएतनाम
C. अमेरीका
D. ब्रिटन


Click for answer

A. भारत
5. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO) ने त्यांनी विकसित केलेल्या आयुर्वेदिक सप्लीमेंटस व अन्न पदार्थांची देशात व परदेशात विक्री तसेच जाहीरातींसाठी खालीलपैकी कोणाच्या पतंजली आयुर्वेद कंपनीशी करार केला आहे ?

A. स्वामी चिदानंद
B. रामदेव बाबा
C. श्री. श्री. रवि शंकर
D. स्वामी सहजानंद


Click for answer

B. रामदेव बाबा
6. अलीकडेच फोर्ब्स मासीकाने जाहीर केलेल्या ' फोर्ब्स एशिया फॅबुलस 5O' या प्रतिष्ठीत कंपनीच्या यादीत यावर्षा किती भारतीय कंपन्यांनी स्थान पटकावले आहे ?

A. चार
B. दहा
C. सोळा
D. पंचवीस


Click for answer

B. दहा
या यादीत एचडीएफसी, अरबिंदो फार्मा , एचसीएल , लुपिन , मदरसन सुमी सिस्टीम , सन फार्मास्युटिकल्स, टाटा कन्सलटन्सी सव्हिर्सेस, टाटा मोटर्स , टेक महिन्द्रा आणि टायटन या कंपन्यांचा समावेश आहे .