चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 25 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. जगातील सर्वाधिक लखपतींची असणाऱ्या देशांमध्ये भारताचा जागतिक स्तरावर क्रमांक लागतो ?

A. पाचवा
B. दहावा
C. अकरावा
D. सत्ताविसावा


Click for answer

C. अकरावा
कॅपजेमिनी आणि आरबीसी वेल्थ मॅनेजमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट -2015 च्या आकडेवारीनुसार भारतात 2014 मध्ये लखपतींची संख्या 1.98 लाखांवर पोचली आहे.
2. ग्रामीण भागाचा आर्थिक सामाजिक कायापालट घडविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या सुमारे 5142.08 कोटी रुपयांचा आराखडा असलेल्या रुर्बन अभियानाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

A. महात्मा गांधी
B. सरदार पटेल
C. अटलबिहारी वाजपेयी
D. श्यामाप्रसाद मुखर्जी


Click for answer

D. श्यामाप्रसाद मुखर्जी
3. रिओ ऑलिम्पिक-2016 तयारी व प्रशिक्षणासाठी केंद्राने 'टॉप' योजना सुरू केली आहे. 'टॉप' हे कसले संक्षिप्त स्वरूप आहे ? rio-2016

A. टार्गेट ऑलिम्पिक परफॉर्मन्स
B. टार्गेट ऑलिम्पिक पोडीअम
C. टार्गेट ऑलिम्पिक पोझिशन
D. टार्गेट ऑलिम्पिक पॉझिटिव्हली


Click for answer

B. टार्गेट ऑलिम्पिक पोडीअम
4. G-20 च्या अंकारा (तुर्कस्तान) येथे सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या बैठकीत लिंग समावेशकता येण्यासाठी 'वूमन्स-20' या गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटाच्या पहिल्या अध्यक्षा कोण आहेत ?

A. एन्ड्रू जॅकसन
B. गुल्डेन तुर्कटॅन
C. हिलरी क्लिंटन
D. लक्ष्मी पुरी


Click for answer

B. गुल्डेन तुर्कटॅन
5. ऑस्ट्रेलियातील 'द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी' स्पर्धा कोणत्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने जिंकली ?

A. अनिरुध्द काथिरवेल
B. वन्या शिवशंकर
C. गोकुळ वेंकटाचलम
D. श्रीराम हथवार


Click for answer

A. अनिरुध्द काथिरवेल
6. 2015 च्या 'नागभूषण' पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?

A. विकास आमटे
B. प्रकाश आमटे
C. नितीन गडकरी
D. मारोती चितमपल्ली


Click for answer

A. विकास आमटे
आतापर्यंत हा पुरस्कार स्व. आर. के. पाटील, नितीन गडकरी, भन्ते सुरई ससाई, जी. एम. टावरी, स्व. प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. प्रकाश आमटे व मंदाताई आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार, स्व. कवी ग्रेस, राजकुमार हिराणी, ठाकुरदासजी बंग, अँड़ व्ही. आर. मनोहर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर आदी मान्यवरांना देऊन गौरविण्यात आले आहे.
डॉ. विकास आमटे कुष्ठरोगींच्या हक्कासाठी लढणारे लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या समाजसेवेतून लाखो कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणला.