चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 10 सप्टेंबर 2015


 2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. माता व बालमृत्यू संदर्भातील ' ग्लोबल कॉल टू ऍक्शन समिट ' पहिल्यांदाच अमेरीकेबाहेर 2015 साली खालीलपैकी कोठे संपन्न झाली ?

A. कोलंबो
B. ढाका
C. नवी दिल्ली
D. म्युनिच


Click for answer

C. नवी दिल्ली
2. राणी गाइदिन्ल्यू ( Rani Gaidinliu ) यांचे 2015 हे जन्मशताब्दी वर्ष आहे . भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या धाडसी तरूणीला 1932 साली वयाच्या 16 व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा झाली होती . तुरुंगातून त्यांची मुक्तता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच झाली . स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ' पद्मभूषण ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते . त्यांना राणी ( Queen ) ही उपाधी पंडीत नेहरूंनी दिली होती . त्यांचा जन्म व मृत्यू कोणत्या पूर्वोत्तर राज्यात झाला ? Rani Gaidinliu

A. सिक्कीम
B. मणिपूर
C. नागालँड
D. आसाम


Click for answer

B. मणिपूर
3. 1965 च्या कोणादरम्यान लढल्या गेलेल्या युध्दास यावर्षी 50 वर्षे पूर्ण झाली ?

A. भारत-श्रीलंका
B. भारत-पाकीस्तान
C. भारत-चीन
D. भारत-नेपाळ


Click for answer

B. भारत-पाकीस्तान
4 . भारतीय महानिबंधक ( रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडीया ) च्या कार्यालयाने अलिकडेच प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार 2011 - 13 या कालावधीत देशात माता मृत्यू दराचे प्रमाण प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे किती होते ?

A. 577
B. 212
C. 167
D. 32


Click for answer

C. 167
2007 - 09 या कालावधीत ते 212 इतके होते .
सहस्त्रकातील विकास उद्दीष्टांनुसार (MDG) हे प्रमाण 140 पर्यंत येणे अपेक्षित आहे . 8 राज्यांनी हे उद्दीष्ट गाठले आहे - केरळ ( 61) , महाराष्ट्र ( 68 ), तामिळनाडू ( 79 ) , आंध्रप्रदेश (92) , गुजरात (112) , पश्चिम बंगाल (113) , हरियाणा (127), कर्नाटक (133 ).
5. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 70 व्या आमसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. नरेंद्र मोदी
B. बान की मून
C. शशी थरूर
D. मॉगेन्स लिकिटॉफ्ट


Click for answer

D. मॅागेन्स लिकिटॉफ्ट
6. ' इंद्रधनुष ' हा द्विपक्षीय हवाई दल सराव कोणत्या देशांदरम्यान पार पडला ?

A. भारत - इस्त्राइल
B. भारत - अमेरिका
C. भारत - इंग्लंड
D. भारत - जर्मनी


Click for answer

C. भारत - इंग्लंड