चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 22 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. जागतिक बँकेच्या वार्षिक 'डुइंग बिझिनेस रिपोर्ट' या सुलभ व्यापार करण्यासाठी योग्य असलेली राज्ये यांचा अनुक्रम जाहीर करणाऱ्या अहवालानुसार अशा राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे ?

A. पहिला
B. तिसरा
C. पाचवा
D. आठवा


Click for answer

D. आठवा
या यादीत गुजरात अग्रस्थानी असून आंध्रप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक सांभाळत आहेत. अरूणाचल प्रदेश शेवटच्या स्थानी आहे.
2. नासाच्या वैज्ञानिकांना नुकताच कोणत्या ग्रहावर पृष्ठभागाखाली 130 फूट जाडीचा बर्फाचा थर सापडला आहे ? NASA

A. बुध
B. मंगळ
C. शुक्र
D. गुरू


Click for answer

B. मंगळ
3. अमेरिकेच्या कोणत्या राज्यात मोठे वणवे पसरल्याने ते राज्य चर्चेत होते ?

A. टेक्सास
B. कॅलिफोर्निया
C. मिसिसिपी
D. फ्लोरिडा


Click for answer

B. कॅलिफोर्निया
4. नवी दिल्ली येथील अशोका चेंजमेकर स्कूल्स परिषदेत देशातील एकूण दहा शाळांची कल्पक शाळा (चेंजमेकर स्कूल्स) म्हणून निवड झाली. या यादीत महाराष्ट्रातील दोन शाळांचा समावेश आहे. या शाळा कोणत्या ?

A. आर.एन.पोद्दार स्कूल मुंबई व केसीटी विद्यानिकेतन, पुणे
B. सिंबायोसिस स्कूल, पुणे व राजर्षी शाहू विद्यालय, लातूर
C. जयहिंद शाळा, धुळे व सेंट मिरा स्कूल, पुणे
D. सैनिक शाळा, सातारा व भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक


Click for answer

A. आर.एन.पोद्दार स्कूल मुंबई व केसीटी विद्यानिकेतन, पुणे
शिक्षणात नवीन पध्दतींचा वापर व विद्यार्थी विकासासाठीचे प्रयत्न या निकषांवर ही निवड करण्यात आली आहे.
5. जर्मनीतील बॉन शहराच्या महापौर पदी निवड झालेली भारतीय वंशाची व्यक्ती कोण आहे ?

A. रॉबिन दत्त
B. शांता घोष
C. कमला रेड्डी
D. अशोक श्रीधरन


Click for answer

D. अशोक श्रीधरन
6. अमेरिकन ओपन स्पर्धा-2015 च्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी प्राप्त केले ?

A. सेरेना विल्यम्स
B. फ्लाविया पेनेटा
C. व्हीनस विल्यम्स
D. रॉबर्ट विंची


Click for answer

B. फ्लाविया पेनेटा
इटलीच्या फ्लाविया पेनेटाने इटलीच्याच रॉबर्ट विंचीचा अंतिम सामन्यात पराभव करत आयुष्यातील पहिली ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली, मात्र या नंतर लगेचच तिने निवृत्तीही जाहीर केली.