चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 14 सप्टेंबर 2015


 2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. न्या. विजया कमलेश ताहिलरामानी
B. न्या. मोहीत शर्मा
C. न्या. व्ही.एम. कानडे
D. न्या. अनूप मेहता


Click for answer

A. न्या. विजया कमलेश ताहिलरामानी
2. 21 व्या भारतीय विधी आयोगाचा (Law Commission) कार्यकाळ कोणता असणार आहे ? law-commission

A. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2019
B. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2019
C. 1 सप्टेंबर 2015 ते 31 ऑगस्ट 2018
D. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2020


Click for answer

C. 1 सप्टेंबर 2015 ते 31 ऑगस्ट 2018
3. ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी इंग्लंडच्या राणीपदी सर्वाधिक काळ म्हणजे 23226 दिवसांपेक्षा जास्त काळ सम्राज्ञी पदावर राहण्याचा विक्रम केला आहे . राजे जॉर्ज सहावे यांच्या मृत्यूनंतर त्या कधी राणीपदी विराजमान झाल्या ?

A. 10 डिसेंबर 1936
B. 13 ऑक्टोबर 1940
C. 2 जून 1953
D. 31 ऑगस्ट 1977


Click for answer

C. 2 जून 1953
4. नुकतेच बीएसएनएलने सर्व लॅण्डलाईन इंटरनेट ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसाठी ब्रॉडबॅण्डची किमान गती 512 केबीपीएस वरून कितीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. एक एमबीपीएस
B. दोन एमबीपीएस
C. पाच एमबीपीएस
D. दहा एमबीपीएस


Click for answer

B. दोन एमबीपीएस
5. केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या देशाकडून दहा हेरॉन टीपी ड्रोन्सची खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे ?

A. अमेरीका
B. इस्त्राइल
C. जपान
D. इंग्लंड


Click for answer

B. इस्त्राइल
6. कॅनरा बँकेचे एमडी व सीईओपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. प्रदीप जैयस्वाल
B. के .शंकरनारायणन
C. उषा मल्होत्रा
D. राकेश शर्मा


Click for answer

D. राकेश शर्मा