चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 24 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. आंध्रप्रदेश सरकारने कोणत्या नदीजोड प्रकल्पाचे अलीकडेच लोकार्पण केले ?

A. कृष्णा-गोदावरी
B. कृष्णा-कावेरी
C. गोदावरी-कावेरी
D. पेन्नार-तुंगभद्रा


Click for answer


A. कृष्णा-गोदावरी
या दोन नद्यांचे मिलन नदीजोड प्रकल्पात देशाला मिळालेले पहिले यश म्हणून पाहिले जात आहे.
2. कोणत्या भारतीय चित्रकाराच्या 100 व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना 17 सप्टेंबर 2015 रोजी खास डूडल द्वारा मानवंदना दिली ?husain-doodle

A. एम.एफ.हुसेन
B. अमृता शेर-गिल
C. मनजित बावा
D. अक्कीथम नारायणन


Click for answer

A. एम.एफ.हुसेन
3. 'नासा'च्या कॅसिनी मोहिमेतील संशोधनात शनीच्या कोणत्या चंद्रावर बर्फाच्या शिखराखाली द्रव स्वरूपातील पाण्याचा महासागर अलीकडेच आढळून आला ?

A. मिमास
B. एनसेलॅडस
C. फोबे
D. टायटन


Click for answer

B. एनसेलॅडस
4. इंडियन आयडॉल ज्युनियरच्या दुसऱ्या पर्वाची विजेती कोण आहे ?

A. अन्यना नंदानी
B. नाहीद आफरीन
C. नित्याश्री वेंकटरमणन
D. निहारिका नाथ


Click for answer

A. अन्यना नंदानी
5. दि इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

A. पवन अग्रवाल
B. विवेक गोएंका
C. पी.व्ही.चंद्रन
D. सोमेश शर्मा


Click for answer

C. पी.व्ही.चंद्रन
6. फेसबुकवर सुरू असलेले ट्रेंड्स, फोटोज, व्हिडीओ आदींबाबत बातमीच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती देण्यासाठी फेसबुकने कोणते ऍप (App)सुरु केले आहे ?

A. मेसेंजर
B. सिग्नल
C. न्यूजमेकर
D. फोर्थ पिलर


Click for answer

B. सिग्नल