चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 17 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. भारत - पाकीस्तान दरम्यानच्या 1965 मधील युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने किती रुपयांचे नवे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A.5 रूपये
B.10 रूपये
C.125 रूपये
D.1000 रूपये


Click for answer

A.5 रूपये
2. ' स्मार्ट सिटी ' योजनेंतर्गत आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने 96 शहरांसाठी एकूण किती निधी दिला आहे ?

A. 96 कोटी रुपये
B. 125 कोटी रुपये
C. 148 कोटी रुपये
D. 194 कोटी रुपये


Click for answer

D. 194 कोटी रुपये
98 पैकी दिल्ली आणि चंदीगड या उर्वरित दोन शहरांना गृह मंत्रालयातर्फे लवकरच निधी वितरण केले जाणार आहे.
3. एकही मानवरहित क्रॉसिंग नसणारा रेल्वेचा पहिला विभाग कोणता विभाग ठरला आहे ?

A. पश्चिम विभाग
B. पश्चिम मध्य विभाग
C. उत्तर पूर्व विभाग
D. दक्षिण पूर्व विभाग


Click for answer

B. पश्चिम मध्य विभाग
4. पंतप्रधान मोदींच्या नमामी गंगे प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची देणगी दिल्यामुळे चर्चेत आलेली आध्यात्मिक विभूती कोण ?

A. बाबा रामदेव
B. प्रमुख स्वामीजी महाराज
C. श्री श्री रविशंकर
D. माता अमृतानंदमयी देवी


Click for answer

D. माता अमृतानंदमयी देवी
5. पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ' स्वच्छ भारत ' प्रकल्पाच्या प्रमुख असलेल्या खालीलपैकी कोणी पदाचा राजीनामा दिला ? स्वच्छ भारत

A. रजनी पाटील
B. विजयालक्ष्मी जोशी
C. चंद्रकला सक्सेना
D. अजित सक्सेना


Click for answer

B. विजयालक्ष्मी जोशी
6. माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसूझा यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते कोणत्या राज्याचे तीन वेळेस मुख्यमंत्री होते ?

A. केरळ
B. नागालँड
C. तामिळनाडू
D. गोवा


Click for answer

D. गोवा