चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 16 सप्टेंबर 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. यावर्षीचे विश्व साहित्य संमेलन ( जे 4 वर्षांच्या खंडांच्या अंतरानंतर भरले होते.) __________ यांच्या अध्यक्षतेखाली __________ येथे संपन्न झाले. त्याचे उद्‌घाटना ___________ यांच्या हस्ते झाले .

A. देवेंद्र फडणवीस, लंडन, उध्दव ठाकरे
B. ना. धों.महानोर, न्यूयार्क, राहुल शेवाळे
C. शेषराव मोरे, दुबई , अनंत गीते
D. शेषराव मोरे , पोर्ट ब्लेअर, उध्दव ठाकरे


Click for answer

D. शेषराव मोरे , पोर्ट ब्लेअर, उध्दव ठाकरे
2. 2 ऑक्टोबर 2015 म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत किती नगरपालीका हागणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्टे राज्याने समोर ठेवले आहे ? 

A. पंचवीस
B. पन्नास
C. सत्तर
D. शंभर


Click for answer

B. पन्नास
3. नेपाळ मधील चंद्र बहादूर डांगी यांचे अमेरीकन समोआ येथे निधन झाले. त्यांची गिनीज बुकात कशासाठी नोंद घेतली आहे ?

A. जगातील सर्वात उंच व्यक्ती
B. जगातील सर्वात बुटकी व्यक्ती
C. सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्टवर चढाई साठी सोबत
D. सर्वात वृध्द व्यक्ती


Click for answer

B. जगातील सर्वात बुटकी व्यक्ती
त्यांची उंची फक्त 54.6 सेमी इतकी होती.
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणत्या शहरातील मेट्रोतुन प्रवास केला ?

A. दिल्ली
B. मुबंई
C. चेन्नई
D. बेंगळूरू


Click for answer

A. दिल्ली
मोदींनी बदरपूर - फरीदाबाद मार्गाच्या उद्‌घाटनानिमीत्ताने मेट्रो तून प्रवास केला.
5. डिक कॅस्टोलो यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठीच्या शर्यतीत भारतीय अभियंत्या - व्यवस्थापक पद्मश्री वॉरियर यांचे नाव चर्चेत आहे . हे वृत्त कोणत्या कंपनीशी संबंधित आहे ? Padmasree-Warrior

A. सिस्को
B. मोटोरोला
C. गूगल
D. ट्विटर


Click for answer

D. ट्विटर
6. भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या विदेशातील संस्थात्मक गुंतवणुकदारांवर पूर्वलक्ष्मी प्रभावाने किमान पर्यायी कर (Minimum Alternate Tax - MAT ) न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने नुकतीच मान्य केली आहे. ही शिफारस कोणत्या समितीने केली होती ?

A. रघुराम राजन समिती
B. न्या. शहा समिती
C. अभिजित बॅनर्जी समिती
D. भगवती समिती


Click for answer

B. न्या. शहा समिती