चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 18 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसींच्या आधारे महाराष्ट्र शासनाने "दहीहंडी " खेळास साहसी क्रिडाप्रकाराचा दर्जा दिला आहे . मात्र असे करतानाच किती वर्षांखालील मुलांचा समावेश मानवी मनोरे रचताना केला जावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत ? dahi-handi

A. 8 वर्षे
B. 10 वर्षे
C. 12 वर्षे
D. 15 वर्षे


Click for answer

C. 12 वर्षे
2. टंचाईग्रस्त शहरांसाठी शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. जलमणी योजना
B. जीवन योजना
C. जलस्वराज्य योजना
D. अमृत योजना


Click for answer

D. अमृत योजना
सदर योजनेत राज्यातील 43 शहरांचा समावेश करण्यात येणार आहे .
3. नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोर ठेवलेल्या ' आंतरराष्ट्रीय योग दिना ' च्या प्रस्तावाला किती देशांनी पाठींबा दिला होता ?

A. 127
B. 177
C. 182
D. 191


Click for answer

B. 177
4. बालकवी यांच्या जयंतीचे 2015 हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे . 'बालकवी' यांचे पूर्ण नाव काय होते ?

A. विष्णू वामन शिरवाडकर
B. त्र्यंबक बापूजी ठोंबरे
C. माधव ज्यूलियन
D. माणिक गोडघाटे


Click for answer

B. त्र्यंबक बापूजी ठोंबरे
5 . भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली ?

A. नीला सत्यनारायण
B. ओमप्रकाश रावत
C. सतीश चतुर्वेदी
D. पी. कश्यप


Click for answer

B. ओमप्रकाश रावत
6. भारतीय नौदलातील कोणती युध्दनौका पुढील वर्षी निवृत्त होत आहे ?

A. आयएनएस विक्रमादित्य
B. आयएनएस विराट
C. आयएनएस विक्रांत
D. आयएनएस अरिहंत


Click for answer

B. आयएनएस विराट
7 . पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या ( FTII) संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. गजेंद्र चौहान
B. प्रशांत पाठराबे
C. डी . जे . नारायण
D. अमोल पालेकर


Click for answer

B. प्रशांत पाठराबे
गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . संचालक पदी भारतीय माहीती सेवेतील अधिकारी प्रशांत पाठराबे यांची आधीचे संचालक डी . जे . नारायण सेवानिवृत्त झाल्याने रिक्त पदावर नियुक्ती झाली .
8. भारताच्या दहा रुपयाच्या नोटेच्या मागील बाजूला असलेल्या वाघ - सिंहाच्या प्रतिमांची जागा आता कोणते स्मारक घेणार आहे ?

A. लाल किल्ला , दिल्ली
B. हंपीचा रथ
C. ताजमहाल
D. अजंठा गुंफा


Click for answer

B. हंपीचा रथ
देशात चलनात असलेला 10 ते 1000 रुपयांच्या नोटांवरील प्रतिमा बदलल्या जाणार असून त्यांवर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेली देशातील 8 स्मारके मुद्रीत केली जाणार आहेत .
2O रुपयांच्या नोटेवर राष्ट्रध्वजासह लाल किल्ला , 5O रुपयांच्या नोटेवर कोणार्कचे सुर्यमंदीर , 100 रुपयांच्या नोटेवर ताजमहल , 500 च्या नोटेवर गोव्यातील पुरातन चर्च आणि 1000 च्या नोटेवर अजिंठा गुंफा मुद्रित केली जाणार आहे .
9. सईद हैजर रझा ( एस .एच. रझा ) यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ' लिजन ऑफ ऑनर ' ने गौरविण्यात आले . ते कशासाठी जगप्रसिद्ध आहेत ?

A. तत्त्वज्ञ
B. लेखक विचारवंत
C. चित्रकार
D. अभिनेते


Click for answer

C. चित्रकार
10. दुय्यम दर्जाच्या गव्हाच्या आयातीला आळा घालण्यासाठी नुकतेच केंद्र सरकारने गव्हावर किती टक्के आयात शुल्क लागू केला आहे ?

A. 1 टक्के
B. 5 टक्के
C. 10 टक्के
D. 15 टक्के


Click for answer

C. 10 टक्के