चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 17 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. ' गुगल ' कंपनीने व्यवसाय विस्तार करताना कोणत्या 'पालक कंपनी ' (Parent Company) च्या खाली गुगल यापुढे उपकंपनी म्हणून काम पाहणार आहे ?

A. एबीसी
B. सुपर गुगल
C. हॉरीझोन
D. अल्फाबेट इंक (Alphabet Inc )


Click for answer

D. अल्फाबेट इंक (Alphabet Inc )
2. गुगलचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. सत्या नादेला
B. सुंदर पिचई
C. संजय झा
D. शंतनू नारायणन


Click for answer

B. सुंदर पिचई
3. जैन धर्मियांमधील उपोषण करून देहत्याग करण्याच्या कोणत्या विधीवर बंदी घालण्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे ?

A. परिनिर्वाण
B. संथारा
C. संयम
D. तप


Click for answer

B. संथारा
4 . भारतीय हॉकी संघात गटबाजी आणि दुफळी माजविण्याच्या आरोपावरून हॉकी इंडीयाने संघातील कोणत्या वरीष्ठ खेळाडूस नऊ महिन्यांकरीता निलंबित केले आहे ?

A. गुरबाज सिंग
B. हरविंदर सिंग
C. सत्यजितसिंह
D. शीतल मल्होत्रा


Click for answer

A. गुरबाज सिंग
5. आधार कार्ड सक्तीचे नसल्याचा प्रचार करण्याचे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. मात्र असा निकाल देत असतानाच कोणत्या दोन योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे असेल , असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे ?

A. निवडणूक लढविणे व बँक खाते उघडणे
B. मालमत्ता खरेदी व गुन्हेगारी कृत्ये कमी करण्यासाठी
C. अनुदानित धान्य वाटप व घरगुती वापराचा गॅस
D. सर्व प्रकारच्या सरकारी अनुदाने व बँक खाते उघडणे


Click for answer

C. अनुदानित धान्य वाटप व घरगुती वापराचा गॅस
6. शशांक उदापूरकर यांची मध्यवर्ती भुमिका असलेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर बेतलेला कोणता हिंदी चित्रपट सध्या निर्मीती प्रक्रीयेत आहे ?

A. दीपस्तंभ
B. आँधी
C. अण्णा
D. भ्रष्टाचार के खिलाफ एक जंग


Click for answer

C. अण्णा
7 . निवडणुक आयोगाने अलिकडेच प्रकाशित केलेल्या आकडेवाडीनुसार भारतात एकूण किती नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत ?

A. 2581
B. 1866
C. 901
D. 56


Click for answer

A. 1866
यातील अवघे 56 पक्ष हे राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेले पक्ष आहेत .
सध्या निवडणुक चिन्ह म्हणून वापरात येतील अशी 84 चिन्हे आयोगाकडे आहेत.
8. हिमाचलप्रदेशच्या राज्यपाल पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. रामनाथ कोविंद
B. आचार्य देवव्रत
C. कल्याणसिंग
D. केसरीनाथ त्रिपाठी


Click for answer

B. आचार्य देवव्रत
9. कोणत्या भारतीय उद्योगपतीने नुकतेच स्वतःच्या नावाचे आणखी 18 टक्के शेअर्स म्हणजे 53,284 कोटी रू . दान करत तब्बल एकूण 39 टक्के शेअर्स दान केले आहेत ?

A. नारायण मुर्ती
B. अझीम प्रेमजी
C. रतन टाटा
D. नवीन जिंदाल


Click for answer

B. अझीम प्रेमजी
10 . उद्योगपती विजय मल्ल्यांच्या प्रसिद्ध बिअर ब्रँड ' किंगफिशर ' ची मालकी आता कोणत्या उद्योग समूहाकडे गेली आहे ?

A. किंगफिशर इंटरनॅशनल
B. सुला वाइन्स
C. युनिक ब्रिवरेजेस
D. हाइंकेन इंटरनॅशनल


Click for answer

D. हाइंकेन इंटरनॅशनल