चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 21 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1 . ट्विटरवर स्वतंत्र अकाऊंट असलेली भारतातील पहिली ऐतिहासिक वास्तू कोणती ? Kirti_Chakra

A. ताजमहाल
B. लाल किल्ला
C. सूर्यमंदीर, कोणार्क
D. अजिंठा लेणी


Click for answer

A. ताजमहाल
2. लेफ्टनंट कर्नल नेक्टर संजेनबम आणि नायब सुभेदार राजेशकुमार या दोघांना ह्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

A. परमवीरचक्र
B. कीर्ती चक्र
C. शौर्य चक्र
D. राष्ट्रपती पोलीस पदक


Click for answer

B. कीर्ती चक्र
3. ह्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी कोणती नवीन घोषणा ( नारा ) दिली ?

A. पढेगा इंडीया , बढेगा इंडिया
B. जागो , देशवासीयो जागो
C. टूगेदर वुई कॅन
D. स्टार्ट अप इंडीया , स्टँड अप इंडीया


Click for answer

D. स्टार्ट अप इंडीया , स्टँड अप इंडीया
4 . 11 व 12 ऑगस्ट 2015 रोजी भारत व अमेरीके दरम्यान ' सायबर सुरक्षितता व डिजीटल अर्थव्यवस्था ' या संदर्भात कोठे बैठक पार पडली ?

A. नवी दिल्ली
B. वॉशिंग्टन डी . सी .
C. हैदराबाद
D. लास वेगास


Click for answer

B. वॉशिंग्टन डी . सी .
5 . राष्ट्रीय ग्रंथालय मिशनसाठी बाराव्या पंचवार्षीक योजनेत किती खर्चाची तरतूद करण्यात आली आहे?

A. 100 कोटी रुपये
B. 200 कोटी रुपये
C. 300 कोटी रुपये
D. 400 कोटी रुपये


Click for answer

D. 400 कोटी रुपये
6. ' बँडेड टिट ' प्रजातीचे नवे फुलपाखरू संशोधकांना कोणत्या राज्यात आढळून आले ?

A. महाराष्ट्र
B. अरूणाचल प्रदेश
C. कर्नाटक
D. उत्तराखंड


Click for answer

B. अरूणाचल प्रदेश
7 . जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2014 मध्ये भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाने ( GDP ) कोणता महत्त्वपूर्ण टप्पा पार केला ?

A. एक ट्रिलीयन डॉलर्स
B. दोन ट्रिलीयन डॉलर्स
C. पाच ट्रिलीयन डॉलर्स
D. दहा ट्रिलीयन डॉलर्स


Click for answer

B. दोन ट्रिलीयन डॉलर्स
भारताचा जीडीपी एक ट्रिलीयन पर्यंत पोहचण्यास 60 वर्षे लागली, तर पुढील एक ट्रिलीयनचा टप्पा केवळ 7 वर्षात गाठण्यात यश मिळाले .
8. देशातील वडीलांनी मुलीसोबत सेल्फी काढून ती # Selfie With Daughter या हॅशटॅगद्वारे सोशल मिडीयावर शेअर करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते . ही संकल्पना मूलतः कोणी मांडली होती ?

A. सुनील जगलान, बिबीपूर ( हरीयाणा )चे सरपंच
B. छावी राजपूत , सरपंच , हरीयाणा
C. अमित शहा
D. स्वत: पंतप्रधान मोदी


Click for answer

A. सुनील जगालान , बिबीपूर ( हरीयाणा ) चे सरपंच
9 . आर्थिक , सामाजिक आणि जातीनिहाय जनगणनेच्या ( 2011 च्या ) जाहीर झालेल्या अहवालांनुसार खेडयातील दर किती कुटूंबामागे एक कुटूंब भूमिहीन आहे ?

A. दर दोन कुटूंबापैकी एक
B. दर तीन कुटूंबापैकी एक
C. दर पाच कुटूंबापैकी एक
D. दर दहा कुटूंबापैकी एक


Click for answer

B. दर तीन कुटूंबापैकी एक
10. शंभर वर्षांहून अधिक जुने असलेल्या महाविदयालयांचा वारसा जपण्यासाठी आणि संवधर्नासाठी देशातील 19 शैक्षणिक संस्थांना वारसा महाविदयालय म्हणून मंजूरी दिली आहे . या यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या महाविदयालयाचा समावेश नाही ?

A. स्पाइसर कॉलेज , पुणे
B. फर्ग्यूसन कॉलेज , पुणे
C. सेंट झेवियर्स कॉलेज , मुंबई
D. हिस्लॉप कॉलेज , नागपूर


Click for answer

A. स्पाइसर कॉलेज , पुणे