चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 23 ऑगस्ट 2015


2015 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका 
1. नुकताच सलग 15 तास काव्यवाचनाचा नवा जागतिक विक्रम खालीलपैकी कोणी नोंदविला ?

A. सलील कुलकर्णी
B. मंगेश पाडगावकर
C. प्रविण दवणे
D. विश्वनाथ श्रीधर बापट


Click for answer

D. विश्वनाथ श्रीधर बापट
2. कोणत्या काँग्रेसी नेत्याला 2007 साली लिहीलेल्या ' रामायणा महान्वेशनम ' या कवितेसाठी 2014 च्या ' सरस्वती सन्मानाने ' सन्मानित करण्यात आले ?

A. एम. वीरप्पा मोईली
B. जनार्दन रेड्डी
C. येडूरप्पा
D. सदानंद गौडा


Click for answer

A. एम. वीरप्पा मोईली
श्री मोईली हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री होते. शिवाय त्यांनी क्रेंद्रात कॅबिनेट मंत्रीपदीही सांभाळले होते .
3. राक्सौल ते अमलेखगंज या कोणत्या दोन देशातील पेट्रोलियम पाईपलाईनला नुकतीच भारतीय कॅबिनेटने मंजूरी दिली आहे ?

A. भारत - भूतान
B. भारत - बांगलादेश
C. भारत - नेपाळ
D. भारत - म्यानमार


Click for answer

C. भारत - नेपाळ
राक्सौल (बिहार ) ते अमलेखगंज ( नेपाळ ) या दरम्यानच्या या पाईपलाईनचे बांधकाम इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन ( IOC )द्वारे करण्यात येईल.
4. केंद्र सरकारने राष्ट्रीय सौर अभियानचे उद्दीष्ट 2020 साली 20 हजार मेगावॅट वरून सुधारून किती करण्यात आले आहे ? solar-park

A. 10 हजार मेगावॅट
B. 50 हजार मेगावॅट
C. 60 हजार मेगावॅट
D. 1 लाख मेगावॅट


Click for answer

D. 1 लाख मेगावॅट
5. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे दिग्दर्शित कोणता चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे ?

A. साहेब
B. हिंदू हृदय सम्राट
C. शिवसेना : एक झंझावात
D. मराठी स्वप्न


Click for answer

A. साहेब
6. भारतीय स्पर्धा आयोग ( CCI ) ने कोणत्या वाहननिर्मीती कंपनीवर 420 कोटी रुपयांचा दंड लावला आहे ?

A. होंडा
B. ह्युंदाई
C. निसान
D. व्होल्क वॅगन


Click for answer

B. ह्युंदाई
7. संपूर्ण देशात 130 मोठ्या फुग्यांद्वारे (बलून ) 3- G इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी ' गुगल - लून ' प्रकल्पासाठी कोणादरम्यान करार झाला आहे ?

A. गुगल - नेपाळ
B. गुगल - श्रीलंका
C. गुगल - जपान
D. गुगल - बांगलादेश


Click for answer

B. गुगल - श्रीलंका
8. जागतिक व्यापार संघटना ( W TO ) चा 162 वा सदस्य कोणता देश बनला आहे ?

A. बेलारूस
B. कझाकस्तान
C. रशिया
D. आर्मेनिया


Click for answer

B. कझाकस्तान
सेशेल्स हा 16 वा सदस्य होता .
9. जागतिक व्यापार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?

A. मायकेल चँग
B. रॉबर्ट अझीविडो
C. जोसेफ स्तिगलित्झ
D. जॉन केनियस


Click for answer

B. रॉबर्ट अझीविडो
10. ऑक्टोबर 2014 मध्ये केंद्र सरकारने सुरु केलेल्या ' संसद आदर्श ग्राम योजना' (SAGY ) च्या परीक्षणासाठी केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने कोणते पोर्टल सुरु केले आहे ?

A. प्रगती
B. आश्वस्त
C. सहकार्य
D. समन्वय


Click for answer

D. समन्वय