डिजिटल इंडिया प्रकल्पाची 10 प्रमुख वैशिष्टये


1. देशाच्या नागरिकांना सरकारच्या सेवा प्रभावी पध्दतीने उपलब्ध  करण्यासाठी दस्ताऐवजांचे  मोठया प्रमाणावर संगणकीकरण करणारा डिजिटल इंडिया हा मंच आहे.digital-india

2. भारत नेट या अतिशय वेगवान डिजिटल महामार्ग प्रणालीद्वारे देशातील 2.5 लाख ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. ऑप्टिकल फायबरचा वापर करून जोडलेले हे जगातील सर्वात मोठे ग्रामीण ब्रॉडबॅण्ड जाळे ठरणार आहे.

3. संपर्क व्यवस्थेचा मुद्दा हाताळणारा ब्रॉड बँड महामार्ग हा डिजिटल इंडियाच्या प्रमुख स्तंभांपैकी  एक असून त्यामुळे नागरिकांना सर्व सेवा  उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा   विकास  आणि अवलंब करता येणार आहे.

4. माय जीओव्ही डॉट इनची अंमलबजावणी नागरिकांच्या प्रशासनातील सहभाग वाढवण्यासाठी केली जात आहे. त्यासाठी परस्परांमध्ये चर्चा, कृती आणि प्रसार असा दृष्टिकोन ठेवला आहे. माय जीओव्ही च्या मोबाईल ॲपमुळे ही वैशिष्ट्ये नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.

5. प्रत्यक्ष कागदपत्रांचा वापर कमी करणं आणि विविध संस्थांमध्ये ई-कागदपत्रांचा वापर वाढवण्याचा डिजिटल लॉकर प्रणालीचा उद्देश आहे. नोंदणीकृत संग्राहकांच्या माध्यमातून ई-कागदपत्रांची देवाणघेवाण केली जाणार आहे. जेणेकरून ऑनलाईन कागदपत्रांच्या वैधतेची खातरजमा होऊ शकेल.

6. ई-साईन चौकटीमुळे नागरिकांना आधारच्या अधिप्रमाणनचा वापर करून कागदपत्रांवर डिजिटल सह्या करता येतील.

7. ई-हॉस्पिटल ॲप्लिकेशनअंतर्गत ओआरएस ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रणाली सुरू केली असून त्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी, अपाँईंटमेंट घेणे, फी देणे, वैद्यकीय निदान अहवाल मागवणे, रक्ताच्या उपलब्धतेची चौकशी करणे या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

8. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्तींसाठी नोंदणी करण्यापासून शिष्यवृत्ती मिळवण्यापर्यंतच्या प्रक्रियेतले पडताळणी, मंजुरी आणि वितरण असे टप्पे रद्द करण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल उपयुक्त ठरेल.

9. नवनिर्मिती , संशोधन आणि उत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स विकास निधीची तरतूद  करुन देशांतर्गत साधनसंपत्तीचा स्रोत तयार  केला जाणार आहे. तसेच स्वयं शाश्वत  इको-प्रणाली  निर्माण होणार आहे.

10. नव्याने उदयाला येणाऱ्या फलेक्झिबल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील संशोधन नवनिर्मितीला चालना देण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर फ्लेक्झिबल इलेक्ट्रॉनिक्स. सरकारी संस्था व नॅसकॉम सारख्या खाजगी संस्थांचा सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन इंटरनेट ऑन थिंग्ज हा संयुक्त उपक्रम.