विक्रीकर निरीक्षक (पूर्व) व कर सहाय्यक परीक्षा 2014 सराव प्रश्नसंच-2


विक्रीकर निरीक्षक(पूर्व) व कर सहाय्यक परीक्षा-2014 साठी विशेष प्रश्नसंच-2
1. खालील विधानांचा काळजीपूर्वक अभ्यास करा .

I.भारतीय महिला बँकेची स्थापना 19 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई येथे झाली.bhartiy mahila bank
II. भारतीय महिला बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून बँकेच्या पहिल्या अध्यक्षा उषा अनंतसुब्रमण्यम या आहेत.
III.महिला बँकेची स्थापना करणारा भारतात हा जगातला तिसरा देश ठरला.
IV. 21 मे 2014 रोजी भारतीय महिला बँकेची नोंद भारतीय रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या अनुसूचीत केली.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने असत्य आहे/त ?

A. फक्त A
B. A आणि D
C. C आणि D
D. कोणतेही नाही


Click for answer

D. कोणतेही नाही
2. मंत्रा डॉट कॉम या ई-कॉमर्स मधील कंपनीला कोणत्या कंपनीने विकत घेतले ?

A.फ्लिपकार्ट
B.स्नॅपडील
C.अमेझॉन
D.ई-बे


Click for answer

A.फ्लिपकार्ट
3. जैवविविधतेतील उल्लेखनीय कार्य आणि हिमालयातील हवामान बदलाबद्दल केलेल्या संशोधनाबद्दल कोणत्या भारतीय संशोधकाला अमेरिकेचे प्रतिष्ठेचे 'मिडोरी' पारितोषिक मिळाले?

A. कमल बावा
B. रजत कपूर
C. अनिरुध्द कुलकर्णी
D. ऐश्वर्या बॅनर्जी


Click for answer

A.कमल बावा
4. खालील विधानांचा काळजीपूर्वक अभ्यास करा .

I.देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.
II. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे आजवरचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे/त ?

A. फक्त I
B. फक्त II
C. दोन्हीही सत्य
D. दोन्हीही असत्य


Click for answer

A. फक्त I

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे तरुण मुख्यमंत्री आहेत. आजही राज्याचे सर्वाधिक तरूण मुख्यमंत्री पदाचा किर्तीमान शरद पवार यांच्याकडेच आहे.
5. खालील विधानांचा काळजीपूर्वक अभ्यास करा .

I.2014 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या 13 व्या विधानसभा निवडणुकीत 63.1% मतदान झाले.
II. तेराव्या विधानसभा निवडणुकीत 20 महिला विधानसभेवर निवडून आल्या. ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे.
III.तेराव्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा(122) तसेच सर्वाधिक मते(27.8%) प्राप्त केली.

वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?

A. फक्त I,II
B. फक्त II,III
C. सर्व सत्य
D. सर्व असत्य


Click for answer

C. सर्व सत्य
6. केंद्र सरकारने भारत पोलीओ मुक्त झाल्याची घोषणा कधी केली ?

A. 13 जानेवारी 2014
B. 1 एप्रिल 2014
C. 15 ऑगस्ट 2014
D. 2 ऑक्टोबर 2014


Click for answer

A. 13 जानेवारी 2014
7. सत्या नादेला यांची कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे?

A. मायक्रोसॉफ्ट
B. याहू
C. गुगल इंडिया
D. पेप्सिको


Click for answer

A. मायक्रोसॉफ्ट
8. ऑगस्ट 2014 मध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जुन्या पर्यावरण विषयक कायद्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय स्थापन केली?

A. माधव गाडगीळ
B. टी.एस.आर. सुब्रमण्यम
C. कस्तुरीरंगन
D. जयराम रमेश


Click for answer

B. टी.एस.आर. सुब्रमण्यम
9. 6 ते 9 सप्टेंबर 2014 या कालावधीत ' जागतिक आयुर्वेदीक संमेलन ' कोठे पार पडले?

A. नवी दिल्ली
B. हैद्राबाद
C. बेंगळूरू
D. मुंबई


Click for answer

A. नवी दिल्ली
10. पंडित मदनमोहन मालवीय हे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाचे संस्थापक आहेत ?

A. लाहोर विद्यापीठ
B. अलीगड विद्यापीठ
C. बनारस हिंदू विद्यापीठ
D. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ


Click for answer

C. बनारस हिंदू विद्यापीठ