संक्षिप्त चालू घडामोडी 7 जानेवारी 2015

 • जमशेदजी नौरोसजी टाटा यांच्या 175 व्या जयंतीनिमित्त सरकार त्यांच्या स्मरणार्थ नाणी जारी करणार आहे.
 • जमशेदजी टाटा हे भारतातील उद्योगांचे पिता मानले जातात.tata
 • अशा प्रकारे भारतीय उद्योजकाचा गौरव केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • आजवरचा विचार करता खालील महनीय व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ नाणी जारी करण्यात आले होते:
  • डॉ.राजेन्द्रप्रसाद
  • जवाहरलाल नेहरू
  • इंदिरा गांधी
  • राजीव गांधी
  • लाल बहादूर शास्त्री
  • होमी भाभा
  • लोकमान्य टिळक
  • मदर टेरेसा
  • भगत सिंग
  • रवींद्रनाथ टागोर
  • सी.नटराजन अण्णादुराई- तामीळनाडू चे माजी मुख्यमंत्री
  • चिदंबरम सुब्रमण्यम- स्वातंत्र्य सैनिक, माजी केंद्रीय मंत्री
  • लुईस ब्रेल-अंधांसाठी ब्रेल लिपी शोधणारे- आजवर भारतीय नाण्यावर प्रतिमा असलेले एकमेव भारतीय नसलेली व्यक्ती
 • दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्येच (आयआयएमसी) संज्ञापन विद्यापीठ स्थापन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सल्ला प्रक्रिया सुरू केली आहे.
 • माध्यमांशी संबंधित मुद्रित, नभोवाणी, दूरचित्रवाणी, अॅनिमेशन आदी विद्याशाखा या विद्यापीठांतर्गत येतील.
 • विश्वाची निर्मिती ज्या महाविस्फोटामुळे झाली त्याचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक एक प्रयोग करीत असून त्यात एक बलून अंटार्टीकावर पाठवला आहे. त्यात सहा दुर्बिणी आहेत.
 • स्पायटर किंवा सबऑरबायटर फॉर इन्फ्लेशन व द इपॉक ऑफ रिआयनायझेशन या दुर्बीण संच अंटाक्र्टिकाला प्रदक्षिणा घालत असून तेथे अवकाशातील सूक्ष्मलहरी असण्याची शक्यता आहे. या सूक्ष्मलहरी म्हणजे विश्वाची निर्मिती 13.8 अब्ज वर्षांपूर्वी झाली त्यावेळच्या अग्निगोलातील आहेत, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
 • या दुर्बिणी कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूशन ऑफ टेक्नॉलॉजी व प्रिन्स्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केल्या असून त्यात अंधुक होत चाललेल्या सूक्ष्म लहरी टिपणे हा प्रमुख हेतू आहे. विश्वाच्या प्रसरणानंतर फुगीर भाग तयार होत जाऊन स्फोट झाला असावा. स्पायडर ही दुर्बीण सूक्ष्मलहरींचे परीक्षण दोन तरंगलांबीत करणार आहे व त्यात पूर्वीच्या काळातील अवकाश-काळ यांच्या अतिप्राचीन काळातील तरंगातील धूळ नेमकी कशी होती हे समजू शकते. हा प्रयोग वातावरणाच्या वरच्या टप्प्यात केला जाऊ शकतो.
 • बायसेप प्रयोगाचा हा दुसरा भाग असून गेल्या उन्हाळ्यात हा प्रयोग करण्यात आला होता. दक्षिण ध्रुवावरील आकाशातील एका पट्टय़ात प्रसरणाचे पुरावे मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. आंतरतारकीय धुळीमुळे मिळालेल्या संदेशातून हा निष्कर्ष काढण्यात आला होता.
 • या प्रयोगांची मूळ कल्पना मांडणारे अँड्रय़ू लँग यांचे 2010 मध्ये निधन झाले आहे.
 • जनता परिवार विलीनीकरणाच्या दिशेने जात असून, त्याबाबत नेमकी तारीख निश्चित नाही.
 • देशाच्या राजधानीत आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना करण्याची सूचना  25 वर्षांपूर्वी करण्यात आली होती.
 • त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता 31 जानेवारी रोजी त्याची पायाभरणी करणार आहेत.
 • आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र ल्युटेन्स या दिल्लीच्या मध्यस्थानी जनपथ मार्गावर होणार आहे.
 • आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची शिफारस 1990 मध्ये राष्ट्रीय समितीने आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केली होती.
 • त्यावेळी समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी भूषवले होते. समितीने असे सुचवले होते की, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारून त्यात राष्ट्रीय सार्वजनिक वाचनालय व इतर पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात यावा.
 • पासपोर्ट सेवेचे अत्याधुनिकीकरण असणारी 'ई-पासपोर्ट' सेवा पुढील वर्षीपासून प्रत्यक्षात येणार आहे.
 • या शिवाय पासपोर्ट सेवेसाठी बायोमेट्रिक किंवा डिजिटल पद्धती अंमलात आणण्याचाही प्रयत्न होत आहे.
 • जगभरात चीन आणि अमेरिकेनंतर मोठ्या संख्येने पासपोर्ट वितरणात भारताचा तिसरा क्रमांक लागतो.
 • देशांतर्गत पासपोर्ट वितरणात यंदा केरळने दहा लाखांहून अधिक पासपोर्ट अर्जांद्वारे पहिला क्रमांक पटकावला.
 • मतदारयादीत नव्याने नावनोंदणी, बदल किंवा नावे वगळणे या सुविधा एकाच ठिकाणी पुरवण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने राष्ट्रीय स्तरावर एक मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेतला असून ही यादी नॅशनल डेटा सेंटर म्हणूनही ठेवता येणार आहे.
 • आयोगाने मुख्य निवडणूक कार्यालयांना 2 जानेवारीला याबाबतचे निर्देश दिले आहेत.
 • भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी मंगळवारी केंद्रीय मंत्री आणि खासदार रावसाहेब दानवे यांची नियुक्ती करण्यात आली.
 • दानवे हे मराठवाडय़ातील नेते असून, गेली अनेक वर्षे ते जालन्याचे खासदार आहेत आणि राजकारणातील त्यांचा अनुभव दांडगा आहे
 • भगवानगडाचा अमृतमहोत्सवी सोहळा पार पाडला.
 • जवळपास 4500 वर्षांपूर्वी इजिप्तवर राज्य करणारा राजा फारोआ नेफरेफ्रे याची पत्नी असलेल्या इजिप्तच्या अज्ञात राणीचे थडगे मिळाले असल्याचा दावा झेकोस्लोव्हाकियाच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
 • कैरोच्या नैर्ऋत्येकडे असलेल्या अबू-सिर येथे हे थडगे आढळले असून ते नेफरेफ्रे याची आई अथवा पत्नीचे असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 • पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येतील आरोपी जगतारसिंग तारा याला थायलंड पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे थायलंड पोलिसांनी ही कारवाई केली.
 • फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी त्यांच्या सामाजिक संकेतस्थळावर पुस्तकांविषयीचे एक पान समाविष्ट केले आहे.
 • फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या झकरबर्ग यांनी वेगवेगळ्या श्रद्धा, संस्कृती व तंत्रज्ञान याविषयी 2015 मध्ये दर आठवडय़ाला एक पुस्तक वाचायचे ठरवले आहे.
 • झकरबर्ग यांनी त्यासाठी 'अ इयर ऑफ बुक्स' हे पान सुरू केले असून त्यांच्या मित्रांना या प्रकल्पात सहभागी होण्यास सांगितले आहेत. या पानाला एक लाख लाइक्स मिळाले आहेत.
 • या कार्यक्रमात पहिले पुस्तक मोइजेस नइम यांचे 'द एंड पॉवर - फ्रॉम बोर्डरूम्स टू बॅटलफील्ड्स अ‍ॅण्ड चर्चेस टू स्टेट्स व्हाय बिइंग इन-चार्ज इजन्ट व्हॉट इट यूज्ड टू बी' असे आहे
 • 2022 पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर.. या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला असून भविष्य निर्वाह निधी योजनेतील (पीएफ) खातेदारांसाठी स्वस्तातील घरे उभारण्याचा चंग केंद्र सरकारने बांधला आहे. त्याचा लाभ पीएफच्या पाच कोटी खातेदारांना होणार आहे. पीएफच्या एकूण खातेदारांपैकी 70 टक्के खातेदारांची महिनाकाठची मिळकत फक्त 15 हजार रुपये आहे.
 • माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांची हत्या करण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त यांनी दिली.
डाव्या बाजूच्या फेसबुक लाईक ला क्लिक करून तुम्हीही हे वाचले ह्याची नक्की पोच द्या.

आता PDF स्वरूपात वा प्रिंटआउट काढण्यासाठी PrintFriendly ह्या बटणाचा वापर करा.

Print Friendly and PDF